हात सुंदर आणि मुलायम करण्यासाठी घरगुती टिप्स

१. कोणत्या महिलेला सुंदर दिसायला आवडत नाही. आणि त्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन बरेच उपाय करतो. पण तुम्ही कधी तुमच्या हातांकडे लक्ष दिलंय का? तुम्हाला तुमच्या हाताची त्वचा सुंदर, चमकदार हवी आहे, तर मग हे घरगुती उपाय करा.

२. तुमच्या हाताची त्वचा खरखरीत असेल तर गरम पाण्यात हात ठेवा आणि हात सुकवून त्यावर बदाम तेल लावा. तसेच हातावर जास्त रेषा असतील तर बटाट्याचा रस हातावर घासा.

३. उन्हामुळे तुमच्या हाताचा वरचा भाग काळा झाला असेल तर एक चमचा काकडीचा रस, एक चमचा टॉमेटोचा रस त्यात ३-४ थेंब लिंबाचा रस घालून मिक्षण एकत्र करा. आणि हातावर लावा अस दररोज केल्याने हात गोरे, मऊ होतील.

५. अर्ध लिंबू कापा हातावर एक चमचा साखर ठेऊन घासा, जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही, तोपर्यंत करा. असं केल्याने हाताचा खरखरीतपणा, काळेपणा दूर होतो.

६. रात्री झोपताना एक चमचा दूध मलईमध्ये २-३ थेंब लिंबाचा रस किंवा ग्लिसरीन घालून ते हातावर लावल्याने त्वचा सुंदर आणि स्वच्छ होते.

७. हाताची आणि नखांची काळजी घेण्यासाठी दररोज पौष्टीक आहार घ्यावा.

८. खरखरीत हात मऊ करण्यासाठी एक मोठा चमचा दही, त्यात एक छोटा चमचा बदाम पावडर घालून त्याचे मित्रण हाताला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने हात धुवून टाका.

Leave a Comment