ठसका लागणे

1) जी माणसे भरभर खातात किंवा अन्न तोंडात असताना बोलतात त्यांना ठसका लागायची शक्यता असू शकते. त्या पेक्षा हळू आणि व्यवस्थित चर्वण करून जेवणा-यांमधे आणि अन्न तोंडात असताना कमी बोलणा-यांमधे ठसका लागायची शक्यता कमी असते.

2) मुलांना ठसका लागायची शक्यता जास्त असते का?
होय; कारण मुलांना नीट कसे जेवायचे, व्यवस्थित चावायचे कसे, ह्या गोष्टींची सवय व्हायला वेळ लागतो. किंवा त्यांना खेळणी किंवा नाण्यासारख्या वस्तू तोंडात घालायची सवय असते. त्यामुळेही ठसका लागू शकतो.

3) वयोवृद्ध माणसांना ठसका लागायची शक्यता जास्त असते का?
होय. कारण वयोवृद्ध व्यक्तींची लाळग्रंथी नेहमी कार्यरत असतेच असे नाही. आणि त्या उलट तरुणांची लाळग्रंथी खूपच चांगले काम करते.

4) अन्नचा ठसका लागण्यापासून बचाव कसा होतो?
घशातील पटजीभ (एपिग्लोटिस) ही श्वासनलिकेचे दरवाजे उघडण्या-मिटण्याचे काम करते. त्यामुळे अन्न हे फुफ्फुसात, श्वासनलिकेत, जाऊ शकत नाही, आणि अन्नाचा ठसका लागण्यापासून आपला बचाव होतो.

Leave a Comment