घसा दुखण्याचे कारण

१. घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे ऍलर्जीक ऱ्हायनायटिस.

२. अनेकांना ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.

३. जे धूम्रपान करीत नाहीत, (passive smoking) त्यांनाही त्रास होऊ शकतो.

४. डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.

५. काही औषधांमध्ये उदा- सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.

६. योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.

७. काही रुग्णांना घशात गाठ असण्याची भावना होऊ शकते. आवाज बसतो, स्वरयंत्रणेचा दाह होतो, स्वरयंत्रणेच्या कूर्चा सूजतात.

८. अगदी घरगुती उपचारांमध्ये वाफारा घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे करता येते.

९. विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.

१०. मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, प्लिहा सूजणे, अति लाळ गळणे असा त्रास होत असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *