बाळाला कधी पाजावे ?

१) बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्यातासातच स्तनपान करावे. फक्त सिझेरियन झाले असल्यास आईची भूल उतरल्यावर म्हणजेच चार तासांनी लगेचच स्तनपान करावे.

२) नवजात बालकास रोग होण्याची भीती जास्त असते. बाळ जन्माला येते त्याचवेळी त्याला चोखण्याची क्रिया माहित असते. पहिल्या तसत त्याची चोखण्याची शक्ती जास्त असते.

३) नंतर ती थोडी कमी होते. जन्मानंतर मूल सुमारे पहिला तासभर जागे असते. मग ते झोपी जाते. म्हणून मुलाला जन्मानंतर अर्ध्या तासातच आईने अंगावर पाजावे त्यामुळे गर्भाशय पुन्हा मुळ आकारात यायलाही मदत होते.

Leave a Comment