लहान मुलांचे दात येतेवेळी घेण्याची खबरदारी | Tips for baby tooth care in Marathi

लहान मुलांचे दात येतेवेळी घेण्याची खबरदारी | Tips for baby tooth care in Marathi

लहान बाळांच्या बाबतीत पालकांची जबाबदारी खूप पटीने वाढते कारण ते फक्त त्यांचाच विचार न करता लहान मुलांची काळजी घेण्याला प्राधान्य देतात कारण लहान मुले स्वःताची काळजी घेऊ शकत नाही. आपण पालक असल्याने मुलांमधे चांगल्या सवयी लावण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी असते. अगदी सुरुवातीलाच काही गोष्टींची काळजी घेणे म्हणजेच मुलांचे दात येतेवेळी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. मुलांचे दात निघते वेळी काळजी पहिल्यापासूनच घेतली पाहिजे कारण पूर्ण दात येण्यास दोन वर्षांहून जास्त काळ लागतो. असे केल्यास दाताच्या संदर्भातील समस्या नाहीशा होतात. दातांची काळजी खालीलप्रकारे घ्यावी

जेव्हा बाळाला छातीवरचे दूध पाजले जाते तेव्हा रात्री बाळाला झोपवण्यापूर्वी आणि दूध पाजल्यानंतर हातामधे एक स्वच्छ मऊ कपडा घेऊन त्याच्या हिरडया हलक्या हातांनी स्वच्छ कराव्यात असे केल्याने तोंड स्वच्छ राहते व वास येत नाही आणि दात येणाच्या प्रक्रियेवर कुठलाही अपाय होत नाही. प्रत्येक वेळी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की बाळाच्या तोंडात दूधाचे कण शिल्लक राहिल्याने कॅविटी व उग्र वासाची समस्या होऊ शकते.

जोपर्यंत बाळाचे पूर्ण दात येतात तोपर्यंत मूल समजूतदार झालेले असते त्यावेळी पालकांनी मुलाला दाताची काळजी घेण्यास शिकवावे व हे करणे किती महत्वाचे आहे हे समजावून देणे. प्रत्येक वेळी खाल्यानंतर दात व तोंड़ स्वच्छ करण्यास सांगावे.

मला आशा आहे, या लेखामधून तुम्हाला लहान मुलांचे दात येतेवेळी घेण्याची खबरदारी कशी घ्यायची हे समजले असेल. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment