डोळ्यांचे सौदर्य | डोळे मेकअप टिप्स

१. डोळे हा चेहऱ्यांचा नाजुक आणि मेकअपसाठी महत्त्वपूर्ण भाग आहे. डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी खूप वेळ लागतो. परंतु योग्य पध्दतीने कमी वेळेत मेकअप करुन त्यांचे सौंदर्य वाढवता येते.

२. डोळ्यांच्या दोन्हीं पापण्यांवर काजळ लाऊन त्यावर पांढरे आयलाईनर लावल्यास डोळे आधिक आकर्षित आणि मोठे दिसतात. यासाठी तुम्ही विविध प्रकारचे काजळही वापरू शकता. नंतर डोळ्यांच्या दोन्हीं पापण्याजवळ मॉइस्चराइजर लावा. यामुळे डोळे उठावदार दिसतात. आणि मेकअप आधिक वेळ राहतो.

३. डोळ्यांच्या पापण्यांवर प्रथम आयशॅडो आणि नंतर आयलाईनर लावा. आणि पापण्या १५ सेकंद बंद ठेवा. काजळ लावा आणि ते सुकण्यासाठी पुन्हा डोळे बंद करुन उघडा आणि पहा डोळे किती आकर्षित आणि उठावदार दिसतात.

४. मोठे डोळे दिसण्यासाठी प्रथम आयशॅडो लावा. नंतर फक्त वरच्या पापणीवर काळ्या रंगाचे आयशॅडोचा उपयोग करा. नंतर आयलाईनर लाऊन २० सेकंद पापण्या बंद करा. आणि नंतर काजळ लावा. पुन्हा थोडा वेळ पापण्या बंद करुन ठेवा. अशा पद्धतीने कमी वेळेतही डोळ्यांचा मेकअप करुन सौंदर्य वाढवता येते.

५. चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांच्या सौंदर्यावर अवलंबून असते. यामुळे सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचेही सौंदर्य खुलवायला हवे. विशेषत: आय प्रायमर, हायलाइटर, मस्कारा आणि अशा अनेक गोष्टींच्या साह्याने आपल्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढविता येऊ शकते. मग कसे वाढवाचे डोळ्यांचे सौंदर्य हे जाणून घेण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत.

६. आय प्रायमर : आय शॅडोचा रंग गडद होण्यासाठी डोळ्यांचा मेकअप सुरू करण्यापूर्वी आय प्रायमर लावणे आवश्यक आहे. यामुळे पापण्या मऊ होतात व डोळ्यावरील मेकअप दीर्घकाळ टिकतो.

७. हायलाइटर : डोळे अधिक आकर्षक दिसण्यासाठी भुवयांवरील हाडावर हायलाइटर लावा. यामुळे डोळ्यांना सुंदर आकारही मिळतो व सुंदर दिसतात.

८. मस्कारा : डोळ्यांना बाहेरच्या दिशेने व वरच्या बाजूने मस्कारा लावल्यास डोळे टपोरे दिसण्यास मदत होते. यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होते.

९. आय लाइनर : डोळ्यांना हटके लूक देण्यासाठी आयलाइनरची भूमिका महत्त्वाची ठरते, यासाठी वेगवेगळ्या शेपच्या आयलायनरची निवड करु शकता.

१०. कोल पेन्सिल : बहुतेक महिला कोल पेन्सिलचा वापर करतात, मात्र आपले डोळे बदामासारखे टपोरे असतील तरच कोल पेन्सिल लावा, अन्यथा लावू नका, नाहीतर आपले डोळे छोटे दिसतील आणि आपल्या सौंदर्यात बाधा ठरेल.

Leave a Comment