बाटलीने दूध पाजण्याची पद्धत

१) बाटलीने दूध पाजताना बाळाला मांडीवर घ्यावे. बाळाचे डोकं डाव्या कोपऱ्यावर थोडेसं उंच ठेवावे. शक्यतोवर बाळाला मांडीवर दूध पाजावे.

२) बाटली अशा तऱ्हेने धरावी की बुचामध्ये दूध भरलेलं असेल. दूध फार गरम असू नये. दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन पाठीवरून हात फिरवावा. बाळाने ढेकर दिल्यावर त्याला झोपवावे.

३) ढेकर न देता तसेच झोपवल्यास बाळाला उलटी होण्याची शक्यता असते. बुचाचे छिद्र बरोबर नसल्यास ( लहान किंवा फार मोठे ) बाळाला दूध पिण्यास त्रास होतो.

४) बुचाचं छिद्र मोठे असल्यास बाळाला ठसका लागण्याचा संभव असतो. दुधाची भरलेली बाटली जात उलटी केली तर दूध थेंबाथेंबाने गळले पाहिजे. त्याची धार लागता कामा नये.

Leave a Comment