ताबडतोब डॉक्टरी सल्ला केव्हा घ्यावा ?

१) जास्त प्रमाणात उलट्या होणं.

२) चक्कर येणं

३) फार अशक्तपणा वाटणं.

४) अंगावर पांढरे पाणी किंवा लाल जाणं.

५) पोटात दुखणं

६) कंबर एकसारखी दुखणं.

७) लघवीचा त्रास होणं.

वरील लक्षणं निर्माण झाल्यास ताबडतोब डॉक्टरी सल्ला घ्यावा. शेवटच्या पाळीची तारीख माहिती असणं आवश्यक आहे. साधरणपणे त्या दिलेल्या तारखेच्या ७ दिवस अलिकडे किंवा पलीकडे ७० ते ८० टक्के स्त्रियांचं बाळंतपण होतं. बाळंपणाची तारीख माहिती असली म्हणजे प्रवास, रजा, घर सांभाळण किंवा मुलांना सांभाळणं अशा गोष्टींची व्यवस्था करता येते.

Leave a Comment