डोळ्यांसाठी कोणती काळजी घ्यावी | Eye Care Tips In Marathi

१. सिगारेट ओढू नये

२. डोळ्यासाठी उन्हाच्या चष्म्याचा वापर करा. फॅशन म्हणून नव्हे, तर सुर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल वापरावा.

३. भरपूर पाणी प्यावे. आपला डोळा पाण्यासारख्या पदार्थाने वेढलेला आहे. आपण जितके वेळा पापणी उघडझाप करतो, तितके वेळा धुळीचे कण व इतर गोष्टी डोळ्यात जात असतात पण हा पातळ पदार्थ आपल्या डोळ्याचे सतत रक्षण करत असतो व डोळ्याला कोरडेपण जाणवू देत नाही

४. भडक रंगाच्या भाज्यांचे सलाड आहारात नक्कीच असावे. जसे पालक, बीट, कोथिंबीर, गाजर इ. हे सलाड अनेक गोष्टी एकत्र करून खावे. उदाहरणार्थ भाजी + फळे + थोडा सुकामेवा + कडधान्य + ऑलिव्ह तेल इत्यादी एकत्र खावे

५. डोळ्यांना कटाक्षाने आराम द्यावा. यासाठी 20-20-20 चा नियम पाळावा. दर 20 मिनिटांनी 20 फुट लांबीची वस्तू, 20 सेकंदांसाठी पाहावी यामुळे काम करताना डोळ्यावर येणारा ताण हलका होतो व डोळ्याचे आरोग्य राखले जाते.

६. डोळे अधूनमधून, विशेषतः बाहेरून आल्यावर थंड पाण्याने धुवावेत.

७. कधी कधी धुळीची ऍलर्जी निर्माण होऊ शकते, त्यामुळे वरचेवर डोळे लाल होणे, खाज सुटणे असे त्रास होऊ शकतात. यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार केले पाहिजेत.

८. डोळे येणे हाही एक नेहमी होणारा साथीचा आजार आहे. त्यात डोळे लाल होणे, डोळ्यातून चिकट घाण येणे असे त्रास होतात. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे रूग्णाने आपला रूमाल, टॉवेल वगैरे वस्तू वेगळ्या ठेवाव्यात आणि इतर लोकांच्या संपर्कात येणे टाळावे. दुकानदाराला विचारून औषधं घेऊ नयेत. डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा.

९. आहारात गाजर, पालक, मुळा यांचा समावेश असावा. त्यातून अ जीवनसत्व मिळतं.

१०. पुस्तक वाचताना ३३ सेमी अंतरावर असावं. त्यावर पुरेसा उजेड असावा.

११. डोळ्यांना मार लागणे किंवा अणकुचीदार वस्तूने इजा होणे हाही नेहमी घडणारा प्रकार आहे. त्यात डोळ्याच्या रेटिनाला धक्का लागू शकतो. त्यामुळे डोळ्याला मार लागलेल्या सर्व गोष्टींनी काहीही त्रास होत नसला तरी डोळे तपासून घेणं गरजेचं आहे.

१२. सूर्यग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहणं म्हणजे डोळे कायमचे अधू करून घेणं होय. त्यामुळे सूर्यग्रहण तज्ज्ञांनी सांगितलेल्या दुर्बिणीतूनच पाहावे. नुसत्या डोळ्यांनी, काचेतून किंवा आरशातून बघू नये.

१३. रासायनिक द्रव्यं डोळ्यात गेल्यास डोळ्यांच्या पृष्ठभागावर बराच परिणाम होऊ शकतो. अशा वेळेस मिळेल त्या पाण्याने तातडीने डोळे धुणे गरजेचे असते. कमीतकमी एक लिटर पाणी डोळे धुण्यासाठी वापरण्यात यावं. त्यानंतर लगेच डॉक्टरला दाखवण्यात यावं.

१४. जवळच्या किंवा दूरच्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्हाला चष्म्याची गरज भासते का? कदाचित दोन्हीसाठी तुम्हाला चष्मा लागत असेल. तुम्हाला चष्म्याची गरज भासो वा न भासो, तुम्ही दर एक ते दोन वर्षांनी तुमचे डोळे तपासून घ्यायला हवे.

१५. डोळ्यांच्या आजारांचा धोका असणा-या लोकांनी वरचेवर डोळे तपासले पाहिजेत. उदा. मधुमेह झालेल्या प्रौढांनी वार्षिक तपासणी करावी. डोळयाच्या आजारांची कौटुंबिक पार्श्वभूमी असणा-यांनी आणि पूर्वी डोळयाला इजा झाली असलेल्यांनी सुद्धा वरचेवर डोळे तपासून घ्यावेत.

१६. पुढील लक्षण आढळल्यास तुम्हाला चष्म्याची गरज भासु शकते

– वस्तू पाहण्यासाठी डोळे बारीक किंवा तिरळे करणे.

– वस्तु अस्पष्ट/ धुरकट दिसणे

– एखादी गोष्ट वाचण्यासाठी तुम्हाला ती वस्तू खूप लांब किंवा चेह-याच्या खूप जवळ धरावी लागणे.

१७. तुम्हाला चष्म्याची गरज असल्यास, पुढील गोष्टी तुम्ही कराव्यात

– डॉक्टरकड़े जा आणि योग्य चष्मा निवडा.

– तुमचे डोळे ग्लॉकोमा, मोतीबिंदू किंवा इतर आजारासाठी तपासून घ्या.

१८. मेडीकेअर किंवा इतर विमा योजना

– चष्मा विकत घेण्यासाठी काही सूट देतात का? याची माहिती मिळवा. पैसे वाचविण्याच्या इतर पर्यायांसंबंधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Comment