बाळंतपणानंतर घ्यायची काळजी

१) बाळाच्या जन्मानंतर लगेच मुलाचे लिंग समजावून घ्यायचा प्रयत्न करू नये. ही काळजी विशेषतः पूर्वीच्या २/३ मुली असणाऱ्यांनी घ्यायची आहे. परत या वेळेही

२) मुलगीच जन्माला आलेली असेल तर एखादे वेळेस लगेच मानसिक ताण पडण्याचा संभव असतो.
बाळाच्या जन्मानंतर सामान्यपणे १० मिनिटापर्यंत वार बाहेर येते. परंतु तशी न आल्यास ती ओढून काढणेचा प्रयत्न करू नये. ही काळजी विशेषतः घरी बाळंतपण होताना घेणे आवश्यक आहे.

३) बाळंतपणात अंगात टाके पडणे हेही नॉर्मल बाळंतपणच आहे.

४) टाके पडले म्हणून अजिबात हालचाल न करणंही चुक आहे.

५) बाळंतपण हा रोग नव्हे बाळंतपणानंतर विश्रांतीची आवश्यकता असते.

६) एक चांगली झोप झाल्यावर जरुर हिंडूफिरू लागावे

७) बाळंतपणानंतर सामान्यपणे ६ तासांनी बाळाला अंगावर पाजायला घ्यावे.

८) त्यांनी खूपच फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती, प्रथिने इ. गोष्टी पहिल्या दुधातून बाळाला पोहचतात. तसेच भरपूर दूध मातेस येणेसाठीही मदत होते.

९) बाळाला अंगावर पाजणेचे आधी व नंतर स्तन धुऊन स्वच्छ करावीत. त्यात दूध साठून राहात असेल तर हातांनी पिळून काढून टाकावे.

१०) बाळंपणानंतर १० दिवस सोयर पाळणेची प्रथा आहे. खरं म्हणजे यामागील उद्देश बाळतीणीस पूर्ण विश्रांती व बाळास फार लोकांनी हाताळू नये हा असावा.

११) ह्या दोन्ही गोष्टी हॉस्पिटल मध्ये बाळंतपण झाले असले तरीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. फार लोकांनी बाळ बघणेसाठी येऊ नये. विशेषतः लहान मुलांना यात खूपच उत्साह दिसून येतो. पण यामुळे मातेची विश्रांती नीट होत नाहीच, शिवाय बाळाला फार हाताळले जाते व सांसर्गिक रोगांच्या जंतूपासून बाळाला इजा होण्याचा संभव वाढतो.

१२) या दहा दिवसात हॉस्पिटलमध्ये बाळंतीणीने नुसतीच विश्रांती हा उद्देश न ठेवता बाळाच्या संगोपनाच्या दृष्टीने बाळाची अंघोळ, पुसणे, पावडर लावणे, नाळेची काळजी, अंगावर पाजणे अशा महत्वांच्या गोष्टींचा सराव नर्स, डॉक्टर यांच्या सहाय्याने करावा म्हणजे घरी गेल्यावर एकदम जड जाणार नाही. तसंच घरी जातेवेळी कुटुंब नियोजनासाठी डॉक्टरकडून सल्ला घ्यावा. दुसऱ्या बाळंतपणात पहिल्या बाळंतपणाच्या अनुभवाचा उपयोग होतो. परंतु पहिलटकरणीस वरील गोष्टींची माहिती असणं आवश्यक ठरतं. या गोष्टी जर नीट लक्षात ठेवल्या तर बाळंतपणातील ‘पण’ जाऊन ती एक गोष्ट वेदनेच्या बदली गोड संवेदना होईल.

Leave a Comment