नखांवर नेलआर्टचा प्रयोग

१. शारीरिक सौंदर्यात हात व नखांचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

२. नखे सुंदर दिसावीत म्हणून आधी केवळ नेलपेंटचा वापर केला जात होता. पण काळ बदलला असून लांब व टोकदार नखांना नवा लूक देण्यासाठी नेल आर्टचा वापर केला जाताना दिसतो.

३. नेल आर्टच्या माध्यमातून नखांना वेगवेगळ्या डिझाइन, चमक आणि स्टोन्स लावून सजविले जाते.

४. मॉल्सच्या व्यतिरिक्त ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा नेल आर्ट स्पेशालिस्ट असतात. कॉलेजमध्ये जाणार्‍या तरूणींपासून तर वयस्कर महिला आपला ड्रेस व साडीला मॅचिंग नेल आर्टचा वापर करत असतात.

५. नेल आर्ट केल्याने साधारण दिसणार्‍या महिलांमध्ये ट्रेडी लुक येतो. पण हे करण्यात सर्वात जास्त लक्ष ठेवण्यासारखे म्हणजे नेल पेंटच्या ब्रांड नेहमी चांगला असावा, नाहीतर नख पिवळे पडून लवकर तुटतात.

६. नखांना रंगवताना नेहमी त्यात रंगांचा वापर केला पाहिजे. मात्र त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. आजच्या फॅशनेबल युगात नेल आर्टसोबत नेल ज्वेलरीसुद्धा वापरली जाते.

Leave a Comment