दातांना मजबूत बनविण्यासाठी उपाय

१. दात हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा, पण काहीसा दुर्लक्षित अवयव. दातांशिवाय आयुष्य जगणे फार कठीण आहे. दात कमकुवत किंवा दुखत असल्यास आहार घेणे अवघड होऊन बसते. यामुळे दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच योग्य गोष्टींचे सेवन दातांच्या मजबुतीसाठी गरजेचे आहे.

२. कच्चा कांदा : जर तुम्ही तोंडाचा वास येईल म्हणून कच्चा कांदा खाण्याचे टाळत असाल तर हा चुकीचा समज आहे. कारण दातांसाठी कच्चा कांदा फार लाभदायक आहे. कच्च्या कांद्यामुळे दातांना नुकसान पोहोचवणारे किटाणू नष्ट होतात.

३. संत्र्याचे ज्यूस : दररोज एक ग्लास संत्र्याचे ज्यूस पिल्यास शरीराला व्हिटॅमिन ‘सी’ आणि कॅल्शिअम मिळते. यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात तसेच बॉडी एनर्जी संतुलित राहते.

४. ओवा : दररोज जेवण झाल्यानंतर थोडासा ओवा खाणे दातांसाठी लाभदायक आहे.

५. चीज : चीज आणि पनीर दातांसाठी खूप फायदेशीर आहे. चीज आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते, जे दातांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे. तुमचे दात किडले असतील तर दररोज चीज किंवा पनीरचा एक छोटासा तुकडा खावा. दातांची कीड दूर होऊ लागेल.

६. कोको : कोको दातांसाठी खूप पोषक मानले जाते. यामधील उपस्थित असलेल्या तत्वांमुळे हिरड्या सुजणे आणि दाड किडण्याचा धोका राहत नाही. तुमचा संपूर्ण दिवस स्ट्रेसमध्ये जात असेल तर संध्याकाळी चॉकलेटचा एक तुकडा खाल्यास रिलॅक्स वाटेल आणि दातांच्या आजारातून मुक्ती मिळेल.

७. किवी : किवी फळ व्हिटॅमिन ‘सी’चे एक उत्तम स्रोत आहे. शरीरात संतुलित मात्रामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असेल तर कोलेजन (त्वचेत असलेले एक प्रकारचे प्रोटिन)चा स्तर कायम राहतो. ज्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहतात.

८. नाशपती : नाशपती एक रेशेदार फळ असून हे दातांची स्वच्छता तसेच त्यांना शुभ्र आणि मजबूत करण्याचे काम करते.

९. सफरचंद : हिरड्या आणि दात मजबूत करण्यासाठी दररोज एक सफरचंद खाणे चांगले आहे. सफरचंद खाल्याने दातांची स्वच्छता होते. तोंडातील लाळेमध्ये वृद्धी होते ज्यामुळे दातांमध्ये कीड निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया नष्ट होतात.

१०. तीळ : तीळ चावून खाणे दातांसाठी लाभदायक आहे. तिळामधील असणा-या कॅल्शिअममुळे दात मजबूत होतात तसेच दातांमध्ये जमा झालेले प्लाक, कॅल्क्युलस, अन्नकण या सर्वांपासून मुक्तता मिळते.

११. दुध : दररोज एक ग्लास दुध पिल्याने दातांना खूप लाभ होतो. दात मजबूत आणि पांढरे होतात. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते.

१२. शुगर फ्री चिंगम : शुगर फ्री चिंगम चावून खाणे दातांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. शुगर फ्री चिंगम खाल्याने हिरड्या साफ होतात आणि दातांचा व्यायाम होतो.

१३. पाणी प्या – दररोज कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने फक्त शरीरातील विषारी तत्व बाहेर पडत नाहीत तर दात किडण्याची समस्या निर्माण दूर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *