जिभेच्या स्वच्छतेसाठी उपाय

१. जीभ आपल्या शरीराचा एक महत्वपूर्ण अंग आहे. ही खाण्याची चव ओळखण्यासोबतच बोलण्यासाठी मदत करते. परंतु जीभेच्या स्वच्छतेकडे लोकांचे लक्ष जात नाही.

२. गुलाबी कलरची जीभ स्वच्छतेची ओळख असते. परंतु तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने जीभ पांढरी होते, जी श्वासाच्या घाण वासाचे कारणसुध्दा बनते. पांढरा कलर जीभेवर जमण्यामागचे कारण खराब जेवण, बॅक्टेरिया आणि डेड सेल्स असु शकतात.

३. या व्यतिरिक्त डिहायड्रेशन, तोंड सुकणे, अल्कोहोल आणि सिगारेटचा वापरसुध्दा असु शकते. टंक क्लीनर ऐवजी जीभ स्वच्छ करण्याच्याकोण – कोणत्या पध्दती आहेत, ज्याचा वापर करुन या समस्यांपासुन सुटका केली जाऊ शकते जाणुन घेऊया.

४. मीठ : मीठ जीभेवर जमलेल्या घाणीला काढण्यासाठी चांगला उपाय आहे. मीठाचा खारटपणा जीभेवरील घाण आणि डेड सेल्स दूर करते. सोबतच याचे अँटीसेप्टीक गुण बॅक्टेरिया दूर करुन श्वासाच्या वासाची समस्या दूर करते.

पध्दत :

– जीभेवर थोडे मीठ टाकुन त्याला ब्रशच्या साहाय्याने थोडे स्क्रब करा. यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करा. एक आठवडाभर दिवसातुन दोन वेळा असे करा.

– याव्यतिरिक्त एक चमचा मीठ कोमट पाण्यात मिळवा आणि गुळण्या करा. याचा परिणामसुध्दा लवकर पाहायला मिळतो.

५. प्रोबॉयोटिक्स : जीभेवरील कँडीडा फंगसच्या कारणामुळे जमलेल्या पांढ-या थराला काढण्यासाठी प्रोबॉयोटिगचा वापर फायदेशीर आहे. प्रोबॉयोटिक्समध्ये एल.एसिडोफिलस आणि बी. लॅक्टिस असते. जे तोंडाच्या बॅक्टेरिया आणि फंगसला दूर करते.

पध्दत : थोड्या पाण्यात प्रोबॉयोटिक्स कॅप्सूलला घोळुन घ्या. ब्रश करतांना या मिश्रणाला माउथवॉश सारखे वापरा. यानंतर एक ग्लास पाणी प्या. आठवड्यात रोज एकदा याचा वापर करा. याव्यतिरिक्त दही आपल्या आहारात घ्या.

६. व्हीजीटेबल ग्लिसरीन : जीभेवर जमलेल्या घाण थराला काढण्यासाठी व्हीजीटेबल ग्लिसरीन एक चांगला उपाय आहे. यामुळे तोंडाचा कोरडेपणा आणि श्वासाचा वास दूर होतो.

पध्दत :

– जीभे वर थोडे व्हीजीटेबल ग्लिसरीन ठेवा.

– मुलायम ब्रिस्टल असलेल्या ब्रशने हळु-हळू ब्रश करा. कोमट पाण्याने गुळणा करा.

– रोज दोन वेळा वापर केल्याने जीभ गुलाबी होईल.

७. तेल : तेलाचा वापर तोंडाच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. यासोबतच ते शरिराच्या अनेक टॉक्सिकला दूर करते. याच्या वापराने जीभ स्वच्छ आणि गुलाबी होते.

पध्दत :

– सकाळी ब्रश करण्याआधी थोडे खोब-याचे तेल तोंडात टाका आणि चांगल्या प्रकारे गुळण्या करा.

– याचा वापर करा जो पर्यंत याचा कलर पांढरा होत नाही. कोमट पाण्याने गुळण्या करा.

– तोंडाच्या स्वच्छतेसाठी दिवसातुन दोन वेळा याचा वापर पुरेसा आहे.

८. अॅलोवेरा ज्यूस : अॅलोवेराच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि हिंलिंग पावर स्किन केसांसाठीच नाही तर तोंडाच्या समस्येला चांगले करते. अँटी-माइक्रोबाइल असल्या कारणाने हे बॅक्टेरीया दूर करते, यामुळे श्वासाचा वास दूर होतो.

पध्दत :

– एक चमचा अॅलोवेरा ज्यूस तोंडात काही मिनिट ठेवा. हे बाहेर काढल्यानंतर एक चमचा अॅलोवेरा ज्युस प्या.

– दोन आठवड्याच्या वापरा नंतर फरक जाणवेल.

९. हायड्रोजन पेरॉक्साइड : हायड्रोजन पेरॉक्साइडमध्ये असलेले अँटीबॅक्टेरिया एलिमेंट जीभेवरील बॅक्टेरीयाला नष्ट करतात. ज्यामुळे जीभ पिंक दिसते. यासोबतच दात पांढरे होतात. याचा वापर करातांना खास लक्ष ठेवले पाहीजे की फक्त ५ टक्के हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर करावा.

पध्दत :

– हायड्रोजन पेरॉक्साइडचे खुप कमी प्रमाण ठेऊन जीभेवर स्क्रब करा.

– कोमट पाण्याने गुळण्या करा. दिवसातुन तीन-चार वेळा करा.

१०. हळद : जीभेच्या स्वच्छतेसाठी हळद खुप फायदेशीर आहे. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि जमलेला थर नष्ट होतो.

पध्दत :

– अर्धा चमचा हळदीच्या पावडरमध्ये लींबूचे काही थेंब मिळवुन पेस्ट करा. या पेस्टने जिभ घासा. कोमट पाण्याने गुळण्या करा.

– याव्यतीरिक्त अर्धा चमचा हळद पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळा आणि चांगल्या प्रकारे गुळण्या करा. जीभ गुलाबी होईल.

११. बेकिंग सोडा : बेकिंग सोडा जीभेच्या स्वच्छतेसाठी स्वस्त आणि फायदेशीर पर्याय आहे. याचा एक्सफोलिएलटिंग गुण जीभेच्या घाणीच्या थराला नष्ट करते.

पध्दत :

– बेकिंग सोडा आणि लिंबु मिळवुन याची पेस्ट तयार करा आणि या पेस्टने चांगले ब्रश करा. नंतर तोंडाला पाण्याने स्वच्छ करा.

– याव्यतिरिक्त अर्धा चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिळवुन त्या पाण्याने गुळण्या करा.

Leave a Comment