हृदयविकार | Tips To Avoid Heart Attack In Marathi

1) सध्याच्या काळात निर्माण झालेले जीवनशैलीशी संबंधित असलेले विकार कमी करायचे असतील तर जीवनशैली बदलावी लागते. अर्थात याला काही पर्याय नाही. कारण आजारांचे कारण जीवनशैली हेच आहे. म्हणूनच जीवनशैली बदलण्याशिवाय काही पर्याय नाही असे सांगितले जाते आणि ते शक्य नसल्याचे लोकही बोलतात.
जीवनशैली ही अनेक गोष्टींशी निगडित असते. विशेषतः खाणेपिणे आणि वागणे यांना जीवनशैलीत महत्त्व असते. मनोकायिक विकार टाळण्यासाठी खाणेपिणे आणि वागण्याच्या सवयी बदलण्याचा सल्ला दिला तर ते अवघड असल्याचे लक्षात येते. मात्र आता तज्ञांनी जीवनशैलीतले काही सोपे बदल सूचित करायला सुरूवात केली आहे.

2) या गोष्टींमुळे आरोग्याचे अनेक प्रश्ना सुटू शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.

3) त्यामुळे सात ते आठ तासांची शांत झोप आणि दररोज ३० ते ६० मिनिटांचा व्यायाम एवढ्या गोष्टी केल्या तरी हृदयविकार आपल्यापासून दूर राहतो. अर्थात या गोष्टी सांगायला सोप्या असल्या तरी प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवताना अनेक प्रकारचे अडथळे येतात आणि हे अडथळेच विकारांना बळकट करतात.

ह्दयविकार टाळण्यासाठी –

1) व्यायाम – व्यायामाचे दृश्य आणि अदृश्य असे दोन प्रकारचे फायदे असतात. दृश्य फायद्यात शरिराचे वजन घटलेले दिसून येते तर अदृश्य फायद्यात शरिराची रोगप्रतिकारशक्ती आणि ताकद वाढते. व्यायामाने शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होते. ह्दयाची गती वाढणे, श्वास्च्छोवास फास्ट होणे, घाम येणे हे उत्तम व्यायाम केल्याचे लक्षण आहे. ह्दयरोग्यांना व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर आर्वजून देतात.

2) आहारात बदल – आपले आरोग्य हे पुर्णपणे आपल्या आहारावर अवलंबून आहे. ह्दयरोग्यांनी आपल्या मनाला आवर घालत आहारात बदल करणे खुप गरजेचे आहे. शहरी भारतीयांच्या आहारात चरबीयुक्त पदार्थ जसे की जंक फुड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे.
रक्तातील चरबी कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. माणसाने कमी कॅलरिजचा आहार घ्यावा. आहारात जितक्या कॅलरिज असतील त्या कॅलरीजमधील ५० ते ६० टक्के कॅलरीज फॅट्सपासून मिळाल्या पाहिजेत

3) धुम्रपान – धुम्रपानाने संबंध शरीराला नुकसान पोहोचते. स्मोकिंग करणाऱ्यांमध्ये हार्ट डिसीज, लकवा मारणे, पायाच्या आर्टरिज बंद होऊन गँग्रीन होणे असे अनेक रोग होतात. तेव्हा धुम्रपान,तंबाखु, गुटखा बंद करणे हा प्राथमिक प्रतिबंधातील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.

4) रोज रात्री साधारण सात ते आठ तास झोप

5) किमान ३० ते ६० मिनिटे व्यायाम

6) हे टाळा –

१, रेड मीट, डेअरी प्रॉडक्टस, जंक फुड, चिप्स, बटाटावडा, बर्गर, पावभाजीसारखे पदार्थ
२. भारतीय मिठाई
३. मद्य आणि शीतपेय
४. कुकिंग मिडियम म्हणून तेल आणि तुपाचा वापर

7) हे घ्या-

१. ताजी फळ, ताजी भाज्या, मोड आलेले कडधान्य, उसळी
२. शेलफिश सोडून इतर मासे

Leave a Comment