सौदंर्य दातांचे

1) कुठल्याही सौंदर्य स्पर्धा पाहताना प्रथम क्रमांकाच्या किंवा इतर सौंदर्यवतींचे मुकुट किंवा झगमगते कपडे पाहताना त्यांचे विलोभनीय स्मित मन आकर्षून घेते. त्यांचे व्यक्तित्व त्यांच्या हसण्यातून प्रकट होताना दिसते . स्वच्छ असे चमकते दात सर्वांचे मन मोहून टाकतात .

2) दात सुंदर , पांढरेशुभ्र असतील तर व्यक्तीचा चेहरा मोहक वाटतो . पण दाताकडे लक्ष दिले नाही तर कोरीव ओठ व इतर मेकअप फिका वाटतो . म्हणूनच दात चमकदार , पांढरेशुभ्र ठेवले पाहिजेत .

3) छान चवीचे पदार्थ खायला सर्वांनाच खूप आवडतात , पण नंतर चूळ भरणे , माऊथवॉशने गुळण्या करणे , दिवसा व रात्री ब्रश करणे या साध्या व सोप्या गोष्टी करण्याचा आळस येतो . काही छोटया गोष्टींची काळजी घेतली तर दात मजबूत , बळकट व चमकदार होतात .

4) ब्रश काही महिन्यांनी बदलावा . दंतवैद्याने सुचवलेला ब्रश वापरावा .

5) हिरड्यांवरून हलक्या हाताने पेस्ट चोळून मसाज करावा . रक्ताभिसरण सुधारून दातावरील कीटक साफ होतात .

6) श्वास दुर्गंधी किंवा मूखदुर्गंधी पचन क्रिया व्यवस्थित होत नसल्यामुळे सुरु होते . सारखा लवंग किंवा वेलची तोंडात धरण्याऐवजी दंतवैद्याकडे जाऊन उपचार करावे .

7) दात किडणे , पडणे या गोष्टींसाठी घरगुती उपचार करू नये .

8) फळे , स्यालड दातांना बळकटी देतात . सफरचंद जेवणानंतर खाल्लं तर ब्रशप्रमाणे काम करत . पौष्टिक घटक , लाळ जास्त सुटून दातांना लाभदायक करणे , आम्ल निर्जंतुकपणाचं काम करणे इ. साठी सफरचंद रोज खावं . द्राक्षामुळे दात किडत नाहीत उलट हिरड्या व दात मजबूत होतात .

8) पालक आणि गाजराचा रस पायरीया बरा करतो .

9) आहारात कोंड्यासकट पोळी , भाकरी , भाज्या , फळे , दुध , दही घ्यावे .

10) काही जरी खाल्ले तरी चूळ भरण्याची सवय लावून घ्यावी .

11) मेकअप करण्याच्या आधी दात स्वच्छ घासावेत .

12) वर्ष-सहा महिन्यांनी दंतवैद्याकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावे .

Leave a Comment