दात पांढरे शुभ्र करण्यासाठी

१. दात शुभ्र असणे फार गरजेचे आहे. काही जण इतरांविषयी दाताच्या रंगावरून निष्कर्ष काढतात. म्हणून हे उपाय करा आणि पांढरे शुभ्र दात ठेवा.

२. जेवल्यानंतर अनेकदा दातांमध्ये अन्नकण अडकतात. मात्र हे अन्नकण पिनने, काडीने कधीही काढू नका. यामुळे दातांना इजा होऊ शकते. त्यामुळे असे उपाय करू नका.

३. मोसमी फळे किंवा कच्च्या भाज्यांचा आहारात समावेश करा. कारण, शरीराला पौष्टिक सत्व देण्यासोबतच ते दातही पांढरे करतात.

४. गरम खाणे खाल्ल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका. यामुळे जबड्यावर परिणाम होतो. काही वेळेस दात हलू लागतात.

४. दातांच्या मजबूतीसाठी आपल्या आहारात कॅल्शिअम आणि क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. संत्रे, मोसंबी यांसारखी फळे आणि आवळा, दही, पनीर, नारळ, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा.

५. महिलांनी मासिक पाळीच्या काळात दातांची खास काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या काळात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम दातांवरही होऊ शकतो.

६. जेवल्यावर किंवा काहीही खाल्यानंतर चूळ भरण्याची सवय नक्की घालून घ्या. यामुळं दातात अडकलेले अन्नकण निघून जाण्यास मदत होते आणि दात साफ राहतात. तसंच तोंड उघडल्यावर येणारा अन्नाचा वासही चूळ भरल्यानंतर निघून जातो.

७. खूप लोकांना ऑफिसमध्ये काम करताना सतत चहा, कॉफी पिण्याची सवय असते. पण याच चहा कॉफीमुळं दातांची चमक कमी होते. तसंच त्यावर काळपट थर जमू लागतो. त्यामुळे चहा, कॉफीची प्रमाण कमी करा आणि आपल्या दातांची मूळ चमक तशीच ठेवा.

८. दातांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी फायबरयुक्त फळं तसंच गाजर खाणं फारच उपयुक्त ठरतं. यामुळं फक्त दातच तंदुरूस्त रहात नाहीत तर हिरड्याही मजबूत बनतात.

९. ताज्या श्वासासाठी लंवंग, वेलची किंवा बडिशोप खाणं फायदेशीर ठरतं. यामुळं श्वासाला येणारा दुर्गंध निघून जातो.

१०. तोंडाच्या सफाईसाठी पाणी हा एक महत्वपूर्ण घटक आहे. पाणी तोंडात धरून त्यानं जोरजोरात चूळ भरली तर ते माऊथवॉशसारखे कार्य करतं आणि विषाणूंना तोंडाबाहेर फेकायला मदत होते.

Leave a Comment