ताजंतवानं दिसण्यासाठी | To feel and appear fresh tips in Marathi

1) रोज स्वच्छ अंघोळ करा. नियमितपणे केस धुवा आणि चेहरा धुण्यासाठी चांगल्या क्लिंजर किंवा फेसवॉशचा वापर करा.

2) केस नियमितपणे ट्रिम करून घ्या. यामुळे ते दिसतीलही छान आणि केसांची वाढही झपाट्याने होईल.

3) मेक-अप करायचा असेल तर लाइट आणि नैसर्गिक शेड्सचा वापर करा.

4) दिवसा सनस्क्रीन लावूनच घराबाहेर पडा. कोणताही मौसम असला तरी सनस्क्रीन टाळू नका.

5) ताजी फळं आणि भाज्या यांचा आहारात समावेश करा. नियमितपणे फळं आणि भाज्या खा. भरपूर पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातील आणि तुमच्या त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळेल.

6) कायम हसत राहा. आनंदी, उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मूड चांगला राहील. तुमच्या चांगल्या मूडचं प्रतिबिंब चेहर्यावर पडल्याशिवाय राहणार नाही.

7) रात्री शांत आणि भरपूर झोप घ्या. कारण चांगल्या झोपेमुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता. झोप नीट झाली नाही तर चिडचिड होते. तुम्ही कितीही महागडे उपाय केले, महागड्या स्पामध्ये गेलात तरीही अपुर्या झोपेमुळे तुमचा चेहरा तजेलदार दिसणार नाही. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *