नखांना डिझायनर बनवण्यासाठी वापरा या ट्रेंडी स्टाइल

१. महिला सुंदर दिसण्यासाठी ब-याच गोष्टींचा वापर करत असतात. त्यामध्ये केस आकर्षक करणे असो वा चेह-यावरील चमक वाढवण्यासाठीचे केलेले उपाय असो. त्यासाठी त्या वेग-वेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करत असतात. मुलींना लांब नखे ठेवणे देखील आवडते. विशेष म्हणजे चेह-याच्या मेकअपप्रमाणेच त्या नखांची काळजी घेत असतात. बहुतेक मुलींना नखांना देखील वेगवेगळे नेल आर्ट करण्याची आवड असते.

२. पूर्वी महिला त्यांच्या नखांना रंगीबेरंगी नेल पॉलिश लावत होत्या. पण नखांवर कोणत्याही प्रकारची डिझाइन तयार करण्याची पध्दत नव्हती. आता हाताची नखे आकर्षित दिसावी यासाठी मुली वेगवेगळ्या डिझाइन्स असलेल्या नेल पॉलिशचा वापर करताना दिसू लागल्या आहेत.यामध्ये नखांवर वेगवेगळे कलर, स्टिकर व शायनिंग स्टोन याचा वापर करून नेल आर्ट बनवले जात आहे.

३. रेनबो राइन्स्टोन नेल आर्ट :

– हे खुप शाइन करणारे असे नेल आर्ट आहे. हे डिझाइन नखांवर एक ग्लिटर बॉम सारखे दिसते. या नेल आर्टमध्ये राइन्स्टोन्सला रेनबोच्या आकारात लावले जातात. तसेच नखांना रंगीत बनवण्यासाठी रंग-बेरंगी राइन्स्टोनचा वापर केला जातो.

४. लेडी बग नेल आर्ट :

– हे एक ग्लॅमरस नेल आर्ट आहे. या डिझाइनमध्ये नखावर कोणत्याही रंगाची नेलपेंट लावण्यात येते. नंतर त्यावर ब्लॅक कलरने एक लाइन नखाच्या मधोमध बनवली जाते. तसेच नखांवर ब्लॅक कलरने छोटे-छोटे डॉट बनवले जातात.

५. स्प्रिंग फ्लॉवर नेल आर्ट विथ राइन्स्टोन :

– हे एक ब्राइट नेल आर्ट आहे. यामध्ये फुलांची डिझाइन तयार करण्यात येते. उन्हाळ्यात आणि वसंत ऋतूमध्ये अशा प्रकारची डिझाइन नखावर उठून दिसते. हे डिझाइन बनवण्यासाठी नखांवर ब्राइट कलरचा वापर करण्यात येतो. तसेच तुम्ही यावर फुल असणारी स्टिकर्स देखील चिटकवू शकता. या नंतर यावर नेल पॉलिशच्या कलरचे राइन्स्टोन लावल्यास नखे आणखीन उठावदार दिसण्यास मदत होते.

६. फ्लॉवर शेप राइन्स्टोन नेल आर्ट :

– या नेल आर्टमध्ये नखे सिंपल आणि क्लिन दिसतात. अशा प्रकारची डिझाइन बनवण्यासाठी पहिले नखांवरती पिंक कलरची नेल पॉलिस लावण्यात येते. यानंतर त्यावर फुलांच्या आकाराचे राइन्स्टोन लावले जातात. विशेष म्हणजे तुम्ही हे राइन्स्टोन नखांवर कुठेही लावले तरी अतिशय सुंदर दिसतात.

७. राइन्स्टोन फ्रेंच टिप नेल आर्ट :

– हे नेल आर्ट सगळ्यात सोपे असे आर्ट आहे. हे नेल आर्ट बवण्यासाठी ट्रांन्सपरंट नेल पॉलिश, नेल ग्लू अथवा कोणत्याही आकारातील आरशाचे राइन्सटोनची गरज असते. नखांवर ट्रांन्सपरट नेल पॉलिश लावल्यानंतर यावर राइन्स्टोन लावावे.

८. डायमंड शेप राइन्स्टोन नेल आर्ट :

– हे खुपच सुंदर असे नेल आर्ट आहे. या डिझाइनमध्ये सिल्वर ग्लिटर आणि मोठे, गोल आकाराचे राइन्स्टोन लावले जातात. यामध्ये राइन्स्टोन हे नखांच्या मधोमध लावले जातात. बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत छोट्या-छोट्या मोत्यांची आउटलाइन करण्यात येते. मोत्यांच्या आउटलाइनमुळे ही डिझाइन हुबेहुब डायमंड सारखीच दिसते.

Leave a Comment