केसांना मेहंदी : कृती व पद्धत

१. मेहंदी हे एक आयुर्वेदीक रोप आहे. थंडपणाच्या गुणधर्मामुळे अनेक स्त्रिया डोक्याला मेहंदी लावणे पसंत करतात. मेहंदीने एक नैसर्गिक रंगही केसांवर चढतो.

२. मेहंदी योग्य पद्धतीने लावल्यास त्याचा परिणाम लवकर आणि चांगला दिसून येतो.

३. मेंदी स्थाननि गुणाने ‘केश्य’ म्हणजे केशवर्धक व केशरंजक आहे, तसेच शोथहार दाहप्रशसन व वेदना स्थापनही करते. म्हणूनच एक थंडावा देणारी वनौषधी म्हणून उष्ण कटिबंधात हिचा सर्रास वापर होत होता. हळूहळू ही मेंदी सौंदर्य प्रांतात शिरकाव करती झाली आणि आता तर एखाद्या राणीच्या थाटशत पूर्ण जगभर प्रस्थापित झाली आहे.

४. परदेशातून तर हेना हेअर कंडिशनर व हेना शांपू चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. दरवर्षी भारतातून निर्यात होणाऱ्या मेंदीची टनावारी वाढतच आहे.

५. केसांकरिता मेंदीच्या वापरावे अनेक फायदे आहेत. मुख्यत्वेकरून मेंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी अशीच नियमित लावण्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसांवर एक छान तकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात. ज्याला कंडिशन असे म्हणले जाते. केस अकाली पांढरे होत नाहीत. डोक्याला कोंडा होण्याचा थांबतो व केसांची वाढ होते. तुरळक पांढरे झालेल्या केसांन मेंदी लावून झाकता येते. मात्र पूर्ण किंवा जास्त पांढरे केस असणारे बहुधा रासयनिक डायच लावतात. परंतु त्यांनीही या द्रव्यांचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून १५ दिवसांतून एकदा मेंदी लावावी.

६. चाळीशी उलटल्यानंतर केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आजच्या धावपळीच्या युगात केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शरीरासाठी आवश्यक असणार्‍या पोषक घटकांची कमतरता, एखादा जुना आजार किंवा काहीवेळा औषधे यांच्यामुळेही केस पांढरे होतात.

७. केस पांढरे झाले की मेंदी लावणे हा त्यावरील उपाय आहे. पण कोणती मेंदी लावावी, त्यात कोणकोणत्या वनौषधी असाव्या हे अनेकदा माहित नसते.

८. मेंदीचे मिश्रण संतुलित नसेल तर केस शुष्क होणे आणि पांढरे होण्याचे प्रमाण अजून वाढू शकते. आपण अंदाजानेच मेंदीमध्ये वनौषधी टाकतो. पण हे प्रमाण संतुलित नसेल तर केसांसाठी ते अपायकारक ठरू शकते. जास्त काळ साठवून ठेवलेल्या वनौषधी वापरू नका. कारण त्या केसांना अपायकारक ठरू शकतात.

९. मेंदीत वापरण्यासाठी वनौषधींचे मिश्रण तयार करून घ्या. त्याने पांढर्‍या केसांना गर्द भुरा रंग तर मिळतोच सोबतच केस पांढरे होण्याचे प्रमाण देखील कमी होते. त्यात प्रमुख हरीतकी, विभीतकी, आमलकी, घृतकुमारी, जास्वंद या वनौषधी आहेत.

१०. प्रयोगाची कृती :

– आवश्यक तेवढे पाणी घेऊन त्यात दोन ते तीन चमचे चहा पावडर टाकून उकळवून घ्या.

– हे पाणी गाळून घ्या. पाणी थंड करून त्यात 2-3 चमचे मिश्रण टाका. आवश्यक तेवढी मेंदी टाकून लेप बनवून घ्या.

– हे मिश्रण लोखंडी भांड्यात रात्रभर ठेवून द्या. दुसर्‍या दिवशी सकाळी केसांच्या मुळापासून संपूर्ण केसांना व्यवस्थित लावा.

– दोन ते अडीच तास राहू द्या. हाताला लावतो तीच मेंदी वापरा. ‘केसांना लावायची मेंदी’ या नावाखाली जी मेंदी किंवा हिना मिळते तिचा वापर टाळा कारण यात धोकादायक रसायने असतात.

– त्यामुळे केस पांढरे होण्याचे प्रमाण आणखी वाढते. तसेच केस शुष्क होतात. जास्त दिवस साठा करून ठेवलेली मेंदी वापरू नका. केसांची मेंदी धुण्यापूर्वी थोडा शांपू पाण्यात मिळवून केस धुऊन घ्या.

– चांगल्या परिणामांसाठी साध्या पाण्याने मेंदी धुऊन रात्री तेल लावून ठेवा. सकाळी गरम पाण्याने टॉवेलने वाफ घेऊन केस शांपूने धुवा. मेंदीचा प्रयोग 20 दिवसांपेक्षा कमी अंतराने करू नका. मेंदीचे मिश्रण रात्रभरापेक्षा जास्त काळ ठेवू नका.

११. मेहंदी लावण्याची पद्धत :

१. लोखंडी कढईत पाणी घेउन त्यात चहापावडर किंवा कॉफी मिसळा. पाणी उकळल्यावर ते थंड होऊ द्या आणि मग त्यात मेहंदी भिजवा. केसांना चांगला रंग येतो.

२. काही तास मेहंदी भिजल्यानंतर ती केसांवर लावण्यासाठी कलर लावण्याच्या ब्रशचा उपयोग करा.

३. केसांची एक एक बट घेऊन हळुहळु मेहंदी पुर्ण केसांना लावा.

४. मेहंदी थोडी पातळ असु द्या त्याने मेहंदी केसांना वरवर न लागता मुळाशी जाईल.

५. मेहंदीला शॉवर कॅप अथवा गरम टॉवेलने कव्हर करा.

६. एका तासानंतर मेहंदी हिना शॅम्पुने धुवा.

७. कंडिशनिंग करायचे असल्यास मेहंदी लावतांना आपण त्यात दहीसुद्धा मिसळू शकतात.

१२. अशा प्रकारे आपण पांढरे केसांना कंडिशनिंगसहीत कलरही करु शकतात.

Leave a Comment