पादहस्तासन

1) पादहस्तासन करताना आपल्या दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्याला पकडावे लागते. त्यामुळे या आसनाचे नाव पदहस्तासन पडले आहे.

2) पद्धत : पादहस्तासन उभे राहून केले जाते. सुरवातीला सरळ ताठ रेषेत सावधान स्थितीत उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात हळू हळू खांद्यापर्यंत वर उचलून त्यांना डोक्याच्या दिशेने सरळ करून ताठ ठेवावे. या स्थितीत खांदे कानांना टेकले पाहिजे.

3) त्यानंतर दोन्ही हात समांतर ठेवून कमरेपासून पुढच्या बाजूने झुकावे तेव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की, आपले दोन्ही हात हे आपल्या कानांना चिकटलेले असावे. कमरेपासून जमिनीकडे झुकत असताना श्वाच्छोश्वास घेण्याची क्रिया ही सुरूच ठेवली पाहिजे. या स्थितीत दोन्ही पायांचे गुडघे ताठ ठेवून दोन्ही हातांचे पंजे व बोटांनी पायांच्या घोटींना घट्ट पकडावे व डोक्याला गुडघ्यांच्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत श्वाच्छोश्वासाची क्रियाही सुरूच ठेवावी. या पद्धतीला सूर्य नमस्काराची तिसरी स्थिती देखील म्हटले जाते.

4) आपल्या सोयीनुसार 30-40 सेकंद या अवस्थेत राहावे. पुन्हा पूर्व स्थितीत येण्यासाठी हळूहळू दोन्ही हात वर उचलून विश्राम स्थितीत ताठ उभे राहावे. काही वेळेनंतर पुन्हा पादहस्तासनाची क्रिया करावी. 5 ते 7 वेळा केल्याने शरीरावर त्याच प्रतिकूल परिणाम जाणवतो.

5) सावधगिरी : पाठीच्या मणका व पोटाचे गंभीर विकार असणार्यांना पादहस्तासन करणे वज्र आहे.

6) फायदे : मूत्रप्रक्रिया, गर्भाषय व जननेंद्रियांसाठी पादहस्तासन फायदेशीर आहे. तसेच पचनक्रिया ही सुरळीत चालते. पाठीचे व पायांचे स्नायू बळकट होतात. पोटाचे विकार ही दूर होतात.

Leave a Comment