वक्रासन

1) वक्रासन बसून करायचे आसन आहे. ‘वक्र’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘वाकडा’ असा आहे. हे आसन केल्यामुळे पाठीच्या कण्याला आराम मिळतो.

2) दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून दोन्ही हात बगलेत ठेवावेत. तसेच ताठ बसून नजर समोर ठेवावी उजवा पाय हळूहळू गुडघ्याकडे वळवताना डावा पाय गुडघ्यापासून अगदी सरळ ठेवावा. नंतर उजवा हात मागे घेऊन जा. हात पाठीच्या कण्याला समांतर ठेवा. थोड्या वेळानंतर डावा पाय गुडघ्याकडे वळवून हे आसन पूर्ण करा.

3) त्यानंतर डाव्या हाताला उजव्या पायाच्या गुडघ्याकडे वाकडे करून जमिनीवर ठेवा. नंतर मान हळूहळू मागच्या बाजूला वळवत जावून पूर्णपणे मागे पाहण्याचा प्रयत्न करा.

4) उजवा पाय गुडघ्यात वळवताना डावा पाय सरळ ठेवणे आवश्यक आहे. मागे ठेवलेला हात काखेपासून सरळ ठेवत पाठीच्या कण्यापासून 6 ते 9 इंचाच्या दरम्यान ठेवा. पोट आणि कमरेचा आजार असलेल्यांनी योग च‍िकित्सकाचा सल्ला घ्यावा.

5) अशा प्रकारचे आसन केल्यामुळे किडनी, मुत्रपिंड यांचे आजार बरे व्हायला मदत होते. शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मानेची दुखणीही बरी होतात.

Leave a Comment