मधुमेह | What Is Diabetes In Marathi

मधुमेह म्हणजे डायबेटिस या रोगामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त होते व यामुळे रूग्ण बेशुध्द पडु शकतो. मधुमेहावर उपचार न केल्यास कालांतराने व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण फारच वाढते. खूप डोके दुखणे, छातीत धडधडणे, भीती वाटणे, थरकाप होणे, मळमळणे, खूप भूक लागणे, चक्कर येणे, डोळयाला अंधारी येणे इत्यादी परिणाम रक्तातील साखर कमी झाल्याने होतात.

प्रथमोपचार :

– साखर कमी झालेल्या व्यक्तीत वरीलपैकी लक्षण आढळल्यास त्याला साखर खायला दयावी. मात्र ती व्यक्ती बेशुध्द झालेली असेल तर तोंडावाटे काहीही देऊ नये.

– बेशुध्द रूग्णास विशिष्ट स्थितीमध्ये झोपवा आणि त्याची श्वासनलिका मोकळी असल्याची खात्री करा.

– ताबडतोब डॉक्टरांना बोलवावे.

Leave a Comment