अँडमिट कधी व्हावे

१) सामान्यपणे याला ‘कळा चालू झाल्यावर अॅडमिट व्हावे’ असं उत्तर आहे. पण इतरही काही लक्षणं दिसली, तर अॅडमिट होणं आवश्यक असते.

२) बाळंतपणाची दिलेली तारीख उलटून गेल्यावर

३) बाळाची हालचाल कमी किंवा बंद झाल्यास.

४) अंगावर लाल जाऊ लागल्यास.

५) अंगावर पाणी जाऊ लागल्यास

६) पायावर व चेहऱ्यावर खूप सूज आल्यास.

७) चक्कर, अंधेरी येत असेल तर

८) सर्व खेड्यांमध्ये डॉक्टरची सोय होणं कठीण असतं. त्यामुळॆ गरोदरपणी वेळोवेळी तपासणी करून घेणं अवघड जातं.

९) गरोदरपणी विशेषता ७ व्या महिन्यानंतर दोनदा किंवा निदान एकदातरी डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी.

१०) यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कॉटेज हॉस्पिटल अशा दवाखान्याची सोय निदान तालुक्याच्या गावी तरी सामान्यतः असते.

११) यामुळे बाळंतपण घरी होणे शक्य आहे का ? याचा अंदाज येतो.

१२) तसेच शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताचं प्रमाण, रक्ताचा गट, लघवी इत्यादी तपासण्या करून घेणं आवश्यक आहे

१३) अॅडमिट होण्यासाठी जाण्याच्याचेळी पोट भरून जड आहार घेऊ नये. याउलट हलका आहार, पातळ पदार्थ घ्यावेत. कळा चालू असताना बऱ्याच वेळी उलटी होण्याचा संभव असतो. तसेच भूल देण्याचा प्रसंग आलाच तर पोटभर खाल्लेलं असल्यास उलटी होऊन खूपच त्रास होतो.

१४) बाळंतपणाच्या वेळी स्वतः शांत राहून डॉक्टरना तपासणीच्या वेळी सहकार्य करावं. तपासणी करतांना, एनिमा देताना किंवा प्रत्येक कळेबरोबर थोडाबहुत त्रास हा प्रत्येक स्त्रीस होतच असतो. पण अशावेळी आरडाओरडा करून कोणताच फायदा न होता त्यातच शक्ती कामी लागते व प्रत्यक्ष कळा देणेच्या वेळी शक्ती उरत नाही.

१५) बाळंतपणाच्या प्रथम अवस्थेत कळा देणे इष्ट नसते. त्यामुळे श्रम तर वाया जातातच, पण पुढे गर्भाशयाची पिशवी योनीतून बाहेर येणेची शक्यता वाढते. म्हणून डॉक्टरनी सांगेपर्यंत कळा घेऊन जोर करू नये. तसंच उकीडवं बसून किंवा उभ्याने कळा घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पाठीवर जोपून पाय पोटाशी घेऊन कळा घ्याव्यात.

१६) बाळंतपणात वरचेवर थोडे थोडे पाणी, चहा, सरबत अशी द्रव्ये घ्यावीत. तसेच वरचेवर लघवीला जाऊन मूत्राशय रिकामे ठेवावे. म्हणजे बाळ नीट येतात व बाळंतपण जास्त सोपे होते.

१७) बाळंतपणाच्या वेळी नेहमी स्वच्छ पॅड घ्यावे.

Leave a Comment