गरोदरपणातील कामे व विश्रांती

१) गरोदरपणात स्वयंपाक करणे, झाडलोट करणे, भांडी करणे अशी सहज करता येण्याजोगी कामे करावीत.

२) गरोदरपणात जड उचलणे, जड ढकलणे, शिडीवर चढणे अशी कुठलीही कामे करू नयेत. जड ओझी वाहू नयेत. पाण्याचा हंडा वर उचलणे किंवा डोक्यावरून आणणे टाळावे.

३) अतिश्रमाची व पोटावर ताण पडतील अशी कामे टाळावीत. कमी श्रमाची कामे करावीत.

४) गरोदरपणी थोडातरी व्यायाम रोज करावा. बाळंतपण सुलभ होण्यासाठी व्यायाम चांगला ठरतो.

५) मोकळ्या हवेत फिरायला जाणे अधिक चांगले. काही सोपी योगासने तज्ञांच्या सल्ल्याने करावीत.

६) गरोदर मातेने दुपारी दोन तास तरी आणि रात्री ८ ते ९ तास शांत झोप/विश्रांती घ्यावी. मन प्रसन्न व ताजेतवाने राहते. झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपावे.

७) गरोदर मातेने नेहमी आनंदी राहावे. कुठलेही दडपण किंवा ताण घेऊ नये.

Leave a Comment