व्यसन मुक्ती

1. व्यसनमुक्ती हे त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठेच आव्हान असते आणि चिकाटीने प्रयत्न केला तरच यात यश येऊ शकते. जेव्हा सवय प्राथमिक अवस्थेत असते तेव्हा ती सोडणे सगळयात सोपे असते, नंतर ते अवघड होत जाते.

2. आधी त्या व्यक्तीला वेगळे काढून त्या पदार्थाचा पुरवठा बंद करणे, यासाठी खास संस्था असल्या तर त्यांचा उपयोग करावा. पदार्थ न घेतल्याने जे शारीरिक-मानसिक त्रास होतात त्यांवर उपचार करावे लागतात. नाहीतर पदार्थाची ओढ लागणे व अपयश येणे सहज शक्य आहे.

3. व्यसन थांबल्यानंतर आयुष्यात थोडी पोकळी निर्माण होते. ती भरून काढण्यासाठी मन रिझवतील असे कार्यक्रम लागतात. – उदा. खेळ, गाणी, भजन,इ. शक्यतो हे कार्यक्रम सामूहिक असावेत म्हणजे सगळयांबरोबर लवकर प्रगती होते. योगाभ्यासाचा यात चांगला उपयोग होतो.

4. व्यायाम, अभ्यास, व्यवसाय मार्गदर्शन, इत्यादी इतर जीवनोपयोगी अभ्यासाची व्यसन सुटायला मदत होते.

5. व्यसन पूर्ण सुटल्यानंतर पुन्हापुन्हा तपासणीसाठी बोलावून लक्ष ठेवणे, तसेच तो पदार्थ परत उपलब्ध होणार नाही याची काळजी घ्यावी.

6. तो पदार्थ जवळपास मिळू नये अशी व्यवस्था झाली नाही तर एवढे प्रयत्न वाया जाण्याची दाट शक्यता नेहमीच असते हे लक्षात घ्यायला हवे.

Leave a Comment