एंजायटी म्हणजे काय, लक्षण, कारणे आणि उपचार | Anxiety meaning in marathi

एंजायटी आजार किंवा एंजायटी म्हणजे काय, लक्षण, कारणे आणि उपचार

एंजायटी काय असते? | What is Anxiety in Marathi

What is Anxiety in Marathi
What is Anxiety in Marathi

एंजायटी म्हणजे चिंता करणे होय. हा एक मानसिक आजार आहे ज्यात व्यक्तीला लगेच बेचैन वाटायला लागते आणि त्यासोबत अनेक नाकारात्म विचार, चिंता, काळजी आणि भीतीचा सामना करावा लागतो. यामध्ये त्या व्यक्तीला अचानक हात कापणे, घाम येणे असे लक्षणे दिसून येतात. जर वेळेवर याचा इलाज केला नाही तर हे तुमच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. यामुळे एखाद्याला मृत्यू देखीक येऊ शकतो कारण याचा परिणाम सरळ तुमच्या हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर होत असतो. यामध्ये कदाचित ग्रासलेल्या व्यक्तीला जास्त त्रास झाला तर तो व्यक्ती स्वतःचे काही बरे वाईट देखील करून घेऊ शकतो.

एंजायटी आजाराचे भारतातील आकडेवारी

● तुम्ही आकडा ऐकून हैराण होऊन जाल की भारतातील अनेक महानगरांमधील जवळपास 15.20% लोक हे एंजायटी तर 1517 % लोक हे डिप्रेशन या आजाराने त्रस्त आहेत.

● याचे सर्वात मोठे कारण हेच आहे की झोप पूर्ण होत नाहीये. जवळपास 50% असे लोक आहेत जे त्यांची झोप देखील पूर्ण घेत नाही येत.

● एक स्टडी सांगते की झोप पूर्ण न झाल्याने शरीरात जवळपास 86% रोग वाढतात आणि यात डिप्रेशन आणि एंजायटी यांचा नंबर सर्वात वर लागतो.

● जे सर्व देश सध्या विकसित आहेत किंवा विकसनशील स्थितीत आहेत त्यांतील युवा वर्गात ही समस्या प्रकर्षाने जाणवते आहे.

● पुरुषांपेक्षा महिलांमध्ये एंजायटी होण्याचे प्रमाण हे जास्त बघायला मिळत आहे.

● एक स्टडी सांगते की जवळपास 8% युवा हे एंजायटी आणि डिप्रेशन ने ग्रस्त आहेत. यातील खूप कमी लोकांना ही गोष्ट लक्षात येऊन त्यावर काहीतरी उपाय योजना सुरू केली जाते.

साधारण चिंता काय असतात?

आपल्या दैनंदिन जीवनात काही समस्या अशा असतात त्यामुळे आपल्याला एंजायटी आणि डिप्रेशन यांचा सामना करावा लागतो. कधी कधी तर याचे होणारे परिणाम हे भयानक असू शकतात.

● प्रत्येक महिन्याला बिल भरणे किंवा कर्जाचे हफ्ते भरण्याचे टेन्शन असते.
● नोकरी मधील समस्या किंवा परीक्षेच्या आधी होणारी बेचैनी.
● स्टेज डेरिंग नसणे किंवा एखाद्या घोळक्यात बोलण्यास घाबरणे.
● भीती वाटणे किंवा एखाद्या गोष्टीचा फोबिया असणे. अनेकांना उंचीची भिती वाटते किंवा कुत्रा चावेल अशी भीती वाटत असते. अपघात होईल अशी भीती वाटणे
● एखाद्याच्या मृत्यूनंतर होणारे दुःख

एंजायटी ची लक्षणे काय आहेत? | Symptoms of Anxiety in Marathi

तुम्हाला वाटणारी काळजी किंवा चिंता केव्हां एंजायटी आजाराचे रुप घेईल हे सांगणे तसे खूप जास्त अवघड आहे. परंतु एखादी अशी गोष्ट असेल जी खूप दिवसांपासून समस्या बनून उभी आहे तर मग तुमची चिंता तेव्हा एंजायटी मध्ये बदललेली असते. अशा काळात तुम्ही सर्वात आधी एखाद्या मानस रोग तज्ञांची मदत घ्यायला हवी. तुम्ही वेडे आहात असा त्याचा अर्थ नाहीये, तुम्हाला लवकर बरे व्हायचे असेल तर मग तुम्हाला हे पाऊल उचलावेच लागणार आहे.

एंजायटी डिसऑर्डर अनेक प्रकारचे असतात मात्र त्यांची काही सर्वसामान्य लक्षणे देखील आहेत.
● हृदयाची धकधक वाढणे
● श्वास घ्यायला अचानक त्रास होणे
● नसांमध्ये तणाव वाढणे
● छाती मध्ये दुखणे किंवा छाती दबल्यासारखी जानवणे
● एखाद्याप्रति खूप जास्त ओढ निर्माण होणे किंवा त्याचा लळा लागणे
● एखाद्या गोष्टीसाठी गरज नसताना किंवा तथ्य नसताना आग्रह धरणे.

एंजायटी ची कारणे काय आहेत? | Anxiety disorder in marathi

Anxiety disorder in marathi
Anxiety disorder in marathi

मेडिकल फॅमिली हिस्टरी

ज्या कुटुंबामध्ये आधी पासूनच मानसिक आरोग्याविषयी समस्या आहेत किंवा आधी इतिहासात कोणालातरी हा आजार असेल तर मग तुम्हाला तो आजार होण्याची शक्यता आहे. ओसीडी सारखे आजार एंजायटी मध्ये येतात आणि ते देखील कुटुंबाच्या इतिहासावर अवलंबुन असतात.

सतत टेंशन देणाऱ्या घटना

ऑफिस मध्ये असलेला त्रास किंवा तणाव, आपल्या जवळील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे, गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप होणे यासारख्या गोष्टींमुळे देखीक तुम्हाला एंजायटी सारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

आरोग्यविषयक समस्या

शरीराशी संबंधित कोणताही रोग जसे की थायरॉईड, दमा, शुगर, किंवा कोणताही हृदयासंबंधी आजार यामुळे एंजायटी होऊ शकते. जे लोक सतत तणावात असतात त्यांना या रोगाचा सामना करावा लागू शकतो. जर एखादा व्यक्ती खूप लांब कालावधी पासून डिप्रेशन आणि टेन्शन मध्ये असेल तर त्याच्याकडून होणाऱ्या कामात अनेक बदल होतात आणि त्याला त्याचे पूर्ण मन त्या कामात रमविता येत नाही.

धूम्रपान करणे

कोणत्याही प्रकारच्या दुःखाचा सामना करण्यासाठी अनेक लोक सतत फक्त नशेच्या आहारी जात असतात. यामध्ये लोक दारू पितात, गांजा, अफीम किंवा सिगारेट सारख्या पदार्थांचे सेवन करतात. मात्र यातून तुमची चिंता किंवा टेन्शन कमी होत नाही किंवा एंजायटी मधून तुमचा बचाव होत नाही. उलट सेवनाने तुम्हाला एंजायटी होण्याची शक्यता वाढते आणि एकदा नशा संपली की मग तुम्हाला अधिक जास्त एंजायटी जाणवायला सुरुवात होते.

पर्सनॅलिटी संबंधित समस्या

अनेक लोक प्रत्येक गोष्ट अगदी योग्य आणि काटेकोर पद्धतीने करायला बघत असतात आणि त्यामुळे त्यांना समाज परफेक्शनिस्ट म्हणून ओळखतात. जर एखाद्या दिवशी त्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट चांगली झाली नाही तर मग मात्र त्याला टेन्शन येते किंवा त्याला बाहेरच्या समाजाचा दबाव जाणवायला लागतो आणि तो व्यक्ती एंजायटी आजाराचा शिकार होऊ शकतो.

एंजायटी आजारावर उपाय (उपचार)

एंजायटी या आजारापासून सुटका मिळविता येते. परंतु या आजाराला खूप हलक्यात घ्यायला नको. तुम्हाला जर अशी काही लक्षणे आढळली तर मग लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले आहे. डिप्रेशन एंजायटी यांच्या पासून सुटकारा मिळवायचा असेल तर औषधे आणि कौन्सिलिंग यांची मदत तुम्हाला घ्यावी लागणार आहे.

सायकोथिरपी वापरा

एंजायटी पासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही सायकोथिरपीची मदत घेऊ शकता. आज पर्यंत आलेल्या अनुभवानुसार सायकोथिरपी एंजायटी घालविण्यासाठी खूप गुणकारी ठरलेली आहे. या थेरपी मध्ये मनावर नियंत्रण ठेवायला शिकविले जाते. वेळेवर काम करायला आणि मन लावून काम करायला तुम्हाला यातून सांगितले जाते.

एंजायटी ग्रस्त व्यक्तीला एकटे सोडू नका

जर एखादा व्यक्ती एंजायटी किंवा डिप्रेशन ने त्रस्त असेल तर तुमचा सतत हा प्रयत्न असायला हवा की त्याला एकटे कधीच सोडू नका. पूर्ण झोप घ्या कारण अर्धी झोप एंजायटी वाढण्यास कारणीभूत ठरत असते.

चांगला आहार घ्या

ताजी फळे, भाज्या आणि कडधान्य यांचे मुबलक प्रमाणात सेवन करा. फॅट चे प्रमाण जास्त असलेले अन्न घ्या. याशिवाय जेवण अगदी वेळेवर आणि पूर्ण करत जा. घाईत जेवण सोडून जाऊ नका. याशिवाय बाहेरील जेवण जसे जंक फूड, फास्ट फूड किंवा तेलकट पदार्थ यांचे सेवन टाळा.

जेवणाची वेळ ठरवा

कोणत्याही वेळेला आणि कधीही जेवण करण्याची जर तुमची सवय असेल ना तर ती पहिले बदला. अनियमित वेळेला जेवण केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. यापैकी एक आजार म्हणजे एंजायटी देखील आहे त्यामुळे जेवणाची वेळ आणि जेवण यांच्याविषयी कधीही कॉम्प्रमाईज करू नका.

गाणी ऐका

गाणी किंवा म्युझिक फक्त तुमचे टेन्शन कमी करत नाही तर त्याला पूर्णपणे नष्ट करते. गाणी ऐकल्याने रक्तदाब, हार्ट रेट आणि तणाव हे सर्व आजार दूर होतात. त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी एंजायटी सारख्या समस्या जाणवतील तेव्हा तुम्हाला जे संगीत आवडते ते ऐका जेणेकरून तुम्ही लवकर त्या एंजायटी मधून बाहेर याल.

नियमित व्यायाम करा

कमीत कमी 30 मिनिट तरी दररोज व्यायाम करत जा. सकाळी आणि संध्याकाळी थोडेफार फिरण्याची सवय लावा. तुमच्या दैनंदिन जीवनात योग सूरु करता आला तर त्याला नक्की महत्व द्या.

निष्कर्ष | Conclusion

एंजायटी हा सध्याच्या काळात प्रकर्षांने जाणवणारा आजार आहे. या समस्येवर निष्काळजीपणा न करता उपचार घेणे सर्वात महत्वाचे आहे. एंजायटी या आजारात सर्वात मोठी समस्या तर ही आहे की त्याची स्टेज कोणती आहे हे मात्र आपल्याला कळत नाही. त्यामुळे ही समस्या कधी गंभीर होईल हे सांगणे कठीण असते. एखाद्याला ही समस्या जाणवायला सुरुवात झाली किंवा लक्षणे दिसायला लागली की लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले असते.

मित्रांनो मला अशा आहे Anxiety meaning in marathi वर आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल वर तुमचे एंजायटी संबंधीचे सर्व शंका दूर झाल्या असतील.

Leave a Comment