प्राणायाम करताना घ्यायची काळजी
1) प्रथम हे प्राणायाम ज्ञानी गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावा.
2) प्रथम श्वास कसा घ्यावा व कसा सोडावा याचा अभ्यास करावा.
3) हा प्राणायाम करताना प्रथम श्वासांची तयारी करावी. म्हणजेच एक नाक बंद करून दुस-या नाकाने श्वास घेणे व सोडणे, तसेच दुस-या नाकपुडीनेही करावे.
4) प्राणायाम करताना कंफर्टेबल आसनात बसून करावं.
5) प्राणायाम करताना घाई करू नये.
6) फक्त वाचून प्राणायाम करू नये. जाणत्या योग गुरूंच्या मदतीने किंवा त्याच्या साहाय्याने त्यांच्या समोर
करावा.
7) थकवा येईपर्यंत प्राणायाम करू नये.
8) प्राणायाम करताना श्वासोच्छ्वास अत्यंत सावकाश करावा असे पतंजलीने सांगितले आहे. असे केल्याने मन स्थिर व शांत होते.
9) प्राणायामसाठी जागा हवेशीर व शांत असावी.
10) प्राणायाम केल्यानंतर लगेच स्नान करू नये. अध्र्या तासानंतर करावे.