दारू
दारूचे शारीरिक परिणाम
1. – अल्प प्रमाणात घेतल्यास मद्यार्क हे भूक वाढवणारे, उब आणणारे, छाती साफ करणारे, रक्तवाहिन्या सैलावणारे रसायन आहे. माणसाला झोपेत ‘ढकलण्यासाठी’ त्याचा वापर पुरातन काळापासून झाला आहे. पोटात घेतल्यानंतर मद्यार्क जठरातून रक्तात पसरते आणि काही मिनिटांतच त्याचा परिणाम जाणवतो.
2. मेंदूवर त्याचा शामक (थंडावणारा) परिणाम होतो आणि सुरुवातीस विचार संथावणे,तरंगणे, हलके वाटणे, इ. परिणाम जाणवतो. ब-याच लोकांना एवढाच परिणाम अपेक्षित असतो आणि इथे ते थांबूही शकतात.
3. जखमा निर्जंतूक करण्यासाठी दारू वापरण्याची पध्दत पूर्वीपासून आहे.
4. पण मद्यार्क हा जातीने मादक पदार्थ आहे. (मद्य म्हणजेच मादक) त्याचे शरीराला व्यसन लागते. हळूहळू त्याच ‘सुखद’ परिणामांसाठी त्याचे प्रमाण वाढवावे लागते. याचा अर्थ असा की स्वतःचे किंवा इतरांचे नियंत्रण नसल्यास दारूचे हळूहळू व्यसन लागत जाते. हे प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. पण अनेक जणांना मात्र व्यसन लागते हे लक्षात असू द्या.