तंबाखू

तंबाखू चे शारीरिक दुष्परिणाम

1. निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते लाळेतून, श्वासातून रक्तात मिसळते. त्याचा परिणाम हृदय, फुप्फुस, जठर आणि रक्तवाहिन्यांवर होतो.

2. रक्तवाहिन्यांवर होणा-या त्याच्या परिणामांमुळे पुढे अनेक अवयव बिघडतात. (उदा. बोटे काळी पडून झडणे.) निकोटीन जिथे जिथे प्रत्यक्ष लागते (ओठ, जीभ, गाल,श्वासनलिका) तिथे कॅन्सर होऊ शकतो.

3. श्वसनमार्गातला कॅन्सर आणि धूम्रपानाचा अगदी निकट संबंध आहे .धूम्रपान करणा-यांना कॅन्सर होण्याचे प्रमाण इतरांच्या मानाने खूपच जास्त आहे.

4. गरोदरपणी धूम्रपान केल्यास गर्भावर प्रतिकूल परिणाम होऊन बाळे कमी वजनाची निपजतात

5. तंबाखू च्या धुळीत काम करणा-या कामगारांना सतत तंबाखू छातीत जाऊन फुप्फुसाचे आजार जडतात (व्यवसायजन्य आजार). एकाच वेळी जास्त तंबाखू – धूळ छातीत गेली तर अचानक मृत्यूही ओढवू शकतो. अशा वेळी लाळ सुटणे, जुलाब, घाम येणे, पोटात खूप जळजळ, मळमळ, उलटया, चक्कर इ. दुष्परिणाम दिसतात. डोळयाच्या बाहुल्या आधी बारीक व मग मोठया होतात. याबरोबर स्नायूंवर परिणाम होतो (अशक्तपणा,स्नायू उडणे) व शेवटी मृत्यू येऊ शकतो.

6. खरे तर दारूपेक्षा अधिक नुकसान तंबाखू ने (विशेषतः धूम्रपानाने) होते. कुटुंबाचा रोजचा तंबाखू चा खर्च एकदोन रुपयांपासून वीस-पंचवीस रुपयांपर्यंत जाऊ शकतो. गरीब कुटुंबात हे मोठेच संकट असते. सिगारेटपेक्षा विडी स्वस्त असली तरी विडी- जास्त गरीब असल्याने नुकसान होतेच.

7. धूम्रपानाची सवय सर्वसाधारणपणे विशीआधी किंवा विशीमध्ये लागते. बहुतेक वेळा इतरांचे पाहून किंवा मित्राचा आग्रह किंवा केवळ गंमत म्हणून सुरुवात होते. हळूहळू सवय लागते. धूम्रपानात इतर मादक पदार्थ मिसळून घेण्याचे प्रमाणही वाढत आहे.

8. धूम्रपान ही एक गलिच्छ व आजारी करणारी सवय आहे हे लहानपणापासून मनावर ठसवले पाहिजे. धूम्रपानाने दात पिवळे पडतात. तोंडाला दुर्गंधी येते. अनेक आजार होतात, पैसे तर जातातच. हे सर्व मुलांच्या मनावर ठसवणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *