प्राणायामचे प्रकार- 5) भ्रामरी

1) ‘भ्रामरी’ हा शब्द ‘भ्रमर’ या शब्दावरून आला आहे. हा प्राणायाम ‘ॐकार’ने केला जातो. हा आवाज भुंग्याच्या आवाजासारखा असल्याने या प्राणायामास ‘भ्रामरी’ असं नाव पडलं.

2) पद्मासनात अथवा मांडी घालून बसावं. दोन्ही नाकातून जोराने श्वास आत खेचा आणि बाहेर काढा. घाम येईपर्यंत ही क्रिया करावी.
शेवटी नाकाद्वारे शक्य तितका दीर्घ श्वास घ्या आणि जितका वेळ श्वास रोखता येईल तितका वेळ रोखून ठेवावा. नंतर दोन्ही नाकपुडयांद्वारे श्वास बाहेर सोडा.

3) सुरुवातीला जसजसा तुम्ही जोराने श्वास घ्याल तशीच तुमच्या रक्ताभिसरणाची गती वाढते आणि शरीरात उष्णता वाढत जाते. परंतु शेवटी घाम सुटल्यावर शरीर थंड पडते.

4) या प्राणायामामुळे मन व चित्त प्रसन्न राहते.

5) विशेष नोंद : अनुलोम प्राणायामचा सराव केल्याशिवाय या प्राणायामापासून फारसा फायदा होणार नाही

Leave a Comment