प्राणायामचे प्रकार- 4) भस्त्रिका

1) या प्राणायामात लोहाराच्या भात्याप्रमाणे जोरात हवा आत घेतली जाते व बाहेर फेकली जाते म्हणून या प्राणायामास ‘भस्त्रिका’ असं म्हणतात. लोहार ज्याप्रमाणे त्याचा भाता जोरजोराने चालवतो त्याचप्रमाणे श्वास हा झपाटय़ाने घेतला जातो. कपालभाती व उज्जायी प्राणायामाचं मिश्रण यात दिसून येतं. कुंभकाच्या सर्व प्रकारांत भस्त्रिका अधिक लाभदायी आहे.

2) पद्मासनात अथवा मांडी घालून बसावं. पाठ, मान डोके ताठ ठेवावेत. हात गुडघ्यावर किंवा मांडीवर ठेवा. तोंड बंद ठेवा. लोहाराच्या भात्याप्रमाणे जलद व जोराने श्वास घ्या व तितक्याच जोराने श्वास

3) सोडा. तसेच फुप्फुसाचे आकुंचन करा आणि नंतर फुलवा. हा प्राणायाम करताना मगरीच्या आवाजासारखा फस, फस.. फस.. असा आवाज येईल. श्वास घेताना झपाटय़ाने व जलद आत घ्यावा, व तसेच सोडावा म्हणजेच पूरक व रेचक याने भस्त्रिकाचे एक पूर्ण आवर्तन होईल.

4) हे आवर्तन पूर्ण होईल तेव्हा दीर्घ श्वास घ्यावा. जमेल तेवढय़ा वेळ श्वास रोखून ठेवावा. त्यानंतर संपूर्ण श्वास बाहेर सोडायचा. प्रत्येक आवर्तनानंतर थोडा वेळ आराम करावा व सामान्य श्वासोच्छ्वास करावा. यामुळे फुप्फुसांना थोडा आराम मिळतो. शक्यतो प्रथम एकच आवर्तन करावे.थंडीमध्ये हा प्राणायाम सकाळ-संध्याकाळ करावा. उन्हाळय़ात फक्त सकाळच्या थंड वेळीच हा प्राणायाम करावा.

5) या प्राणायाममुळे गळय़ाची सूज कमी येते. कफ नाहीसा होतो. नाक व छातीत होणारा त्रास बरा होतो. तसेच दम व क्षय यासारखे आजार बरे होतात. या प्राणायामुळे कफ, पित्त व वायूने होणारा त्रास नाहीसा होतो.
शरीराला उष्णतेची आवश्यकता असल्यास हा प्राणायाम करावा. शरीरात त्वरित उष्णता निर्माण होते.

Leave a Comment