अफू

1. लहान मुलांना जास्त रडू नये म्हणून, अफू देऊन शांत केले जाते. मुलांना असे झोपवून काही आईबाप कामावर निघून जातात. या पध्दतीने मूल हळूहळू क्षीण होऊन कुपोषित होते. जास्त मात्रा झाल्यास डोळयांच्या बाहुल्या अगदी बारीक होतात. ही याची मुख्य खूण आहे. याबरोबर रक्ताभिसरण कमी झाल्याने त्वचा, जीभ, ओठ निळसर दिसतात आणि सर्वत्र खाज सुटते.

2. हे अफूपासूनच बनवलेले अत्यंत मादक द्रव्य आहे. शुध्द स्वरूपात ते पांढरे असते. अफू/गर्द खाल्ली जाते किंवा ओढली जाते. हेरॉईन ओढले जाते किंवा इंजेक्शनवाटे घेतले जाते.

3. गर्द – हेरॉईनमुळे तीन पाय-यांत परिणाम होतात. आधी त्या व्यक्तीस उत्तेजित वाटते, उल्हास वाटतो, त्याची बडबड वाढते व एकूण अवस्था’पोचल्याची’ असते. व्यसन या अवस्थेसाठीच केले जाते. पुढच्या पायरीत खूप पेंग व झोप येते. या अवस्थेत डोळयांच्या बाहुल्या लहान होतात व त्वचेवर/ओठावर निळसर झाक येते, तसेच त्वचेला जागजागी खाज सुटते. तिस-या पायरीत अगदी गाढ झोप, (उठवून उठत नाही अशी) शरीराचे तपमान उतरून हातपाय थंडगार पडणे, नाडी व श्वसन मंदावणे, इ. परिणाम दिसतात. या पायरीवर मृत्यू येऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *