उन्हाळ्यात कोणती फळे खाल्ली पाहिजेत | 10 Best Summer Foods in Marathi

मित्रानो तुम्हाला जाणवत असेलच उन्हाळा खूप वेगाने वाढत आहे. आणि म्हणूनच ह्या दिवसात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. …

Read more

प्रौंढ व्यक्तीने प्रतिदिनी किती आहार घेतला पाहिजे? :-How Much Food Should adult Eat Every Day?

प्रत्येकाला वाटते आपण निरोगी आणि तंदुरुस्त रहावे. पण काही कारणा मुळे पर्याप्त आहार आणि पर्याप्त आराम न मिळाल्या मुळे आपल्याला अशक्तपणा येतो आणि आजारी पडतो. म्हणून प्रौढ व्यक्तीने रोज किती आहार करावा? आपल्या नुसार प्रत्येक प्रौढ व्यक्तीने निरोगी राहून आपले वजन न वाढून देऊन रोज किती आहार करावा? बरेच जण आपल्याला सल्ला देतात कि जास्त खाल्याने केवळ आपला वजन वाढते. हे बरोबर आहे पण आपण काय खातो, किती खातो आणि कधी खातो या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो.

प्रौंढ व्यक्तीने प्रतिदिनी किती आहार घेतला पाहिजे:

पहिले भरपुर आहार घेणे व नंतर बऱ्याच वेळा साठी उपाशी राहणे यामुळे आपल्याला अधिक भूक लागते. प्रतेक प्रौढ व्यक्तीला आपल्या खाण्या पिण्यावर लक्ष  देणे आवश्यक आहे. काही लोक आपला आहार वेळेवर घेत नाही, असे केल्यामुळे अशक्तपणा येतो. जर आपण आहार ठीक प्रकारे खात नसाल तर काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. सकाळचा नाश्ता केल्याने वजन कमी होतो परंतु कधी आपण याच्या दुष्परीणामाचा कधी विचार केला आहे? सकाळचा नाश्ता खूप आवश्यक आहे .कारण झोपून उठल्या नंतर आपला पोट रीकामा असतो म्हणून आहार घेणे अवश्यक आहे.

प्रत्येक व्यक्तीने  दिवसातून एकदातरी नाश्ता केला पाहिजे आणि नाश्ता न केल्यामुळे एसिडीटी (आंबटपणा) आणि gas च्या समस्या होतात.  अनावश्यक वजन वाढणे या सारख्या समस्या होऊ शकतात. नाश्ता केल्याने अनेक फायदे होतात. कारण ७ – ८ तासांच्या झोपेनंतर आपल्याला विविध कामे करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते,  हि उर्जा आहारा मुळे मिळते. असे म्हणतात कि नाश्ता हा राजा प्रमाणे करावा, दुपारचे जेवण राजकुमारा प्रमाणे करावे, आणि रात्रीचे जेवण भिक्षु प्रमाणे करावे. प्रत्येक भोजन करताना आहाराची मात्रा नियंत्रित करणे आवश्यक आहे.

प्रौंढ व्यक्तीने प्रतिदिनी किती आहार घेतला पाहिजे आणि कधी घेतला पाहिजे:

अनेक अध्ययना नंतर हे समोर आले आहे कि वजन कमी करण्यासाठी रात्री कमी कॅलरी वाला भोजन करावा. याचा असा अर्थ होत नाही कि फक्त नाश्ता केल्याने आपला वजन कमी होतो. दिवसातून ३ वेळा जास्त आहार घेणे किंवा दिवसातून ६ वेळा थोडा थोडा आहार घेणे गरजेचे आहे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींची सवय केली पाहिजे. आपण प्रतिदिनी सेवन केलेल्या कॅलरी ची मात्रा महत्वपूर्ण असते. जर आपण दिवसातून थोड्या थोड्या वेळाने ६ – ७ वेळा आहार घेणे पसंद करत असाल तर तसे करा. जर असा आहार घेऊन आपल्याला भूक लागत असेल तर दिवसातून तीन वेळा जास्त आहार घेत जा.

आपण रोज किती कॅलारी चे सेवन करत आहात या गोष्टीकडे लक्ष द्या, खूप कमी लोकांना माहित असते कि दररोज किती आहार घेतला पाहिजे, आहारात कोणत्या कोणत्या पदार्थाचा समावेश केला पाहिजे, अनावश्यक कॅलारीस नष्ट करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करण्याच्या आधी व नंतर काय खाता याचा परिणाम आपल्या उर्जा पुनर्प्राप्ती प्रक्रिया तसेच मांसपेशींची बनावट, ताकद याच्यावर पडतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण रोज कॅलारीस, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट चे सेवन योग्य मात्रेत करा, या पोषक तत्वांचा स्त्रोत उच्च गुणवत्तेच्या खाद्य पदार्थांमध्ये असतो. दिवसभरात सहा वेळा थोडा थोडा पोषक आहार घेत जा यामुळे आपली पचन शक्ती चांगली होत जाते. आपल्याला भूक कमी लागते आणि रक्ता तील साखर नियंत्रित राहते तसेच आणखीन काही आजार दूर होतात. अध्ययनातून हे समोर आले आहे कि नाश्ता साठी सकाळी ७ – ८ ची वेळ, दुपारच्या खाण्याची वेळ १२ – १ आणि रात्री च्या जेवणाची वेळ ६:३० ते ७ : ३० ची वेळ योग्य असते.

प्रत्येकाला प्रश्न पडतो कि रोज किती आहार केला पहिजे ? यावेळेत काही नाश्ता केला पाहिजे का? ज्यांना आपला वजन कमी करायचा असेल त्यांनी वर सांगितलेल्या वेळे नुसार आहार घेणे महत्वपूर्ण आहे. मिश्रित आहार घेणे म्हणजे ज्याच्यात सगळे पोषक तत्व असतील असा आहार . भूक कमी करण्यासाठी धूम्रपान किंवा दारू यांचा सहारा घेऊ नये. फळ आणि भाज्यांचा सेवन करा. जर आपल्याला गोड आवडत असेल तर आणि आपल्याला मधुमेह नसेल तर आपण कधी कधी चॉकलेट, केक किंवा आईसक्रीम खाऊ शकता. परंतु हे खाल्यामुळे त्यात असलेल्या अतिरिक्त कॅलरीज मुळे वजन वाढते आणि ज्यामुळे मधुमेह ची संभावना वाढते. आपण जेंव्हा तणावात असतो आपल्याला गोड खाण्याची इच्छा वाढते कारण गोड पदार्थांमध्ये आपला मूड ठीक करण्याचे गुण असतात. ताजी फळ आणि भाज्या सलाड च्या रूपाने खाणे फायदेमंद असते. असे म्हणतात कि फळ हे रीकाम्या पोटी खावे कारण अन्य पदार्थान सोबत खाल्याने ते  पोटात कुजतात आणि ज्यामुळे अपचन होते परंतु हे पूर्ण पणे चुकीचे आहे .

रोजच्या आहारात मद्य चा समावेश करने चांगले असते का ? काही लोक असे मानतात कि रोज एक ग्लास वाईन पिणे आरोग्यासाठी चांगले असते. रोज मद्य सेवन केल्याने आपला यकृत खराब होऊ शकतो, विशेष करून महिलांमध्ये रोज मद्यपानाच्या सेवना मुले ब्रेस्ट कॅन्सर होण्याची संभावना जास्त असते. पोलीफेनोल्स हे डार्क चॉकलेट, चहा, डाळिंब आणि ब्लुबेरी मध्ये असतात. आपण सीमित मात्रेत दुध, अंडी आणि मांस मासे यांचे सेवन करू शकता. कोणतेही खाद्य जास्त प्रमाणत खाल्याने ते अति नुकसानदायक ठरते.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!! 

पोटात जंत होण्याची कारणे व यावर उपचार-(Causes of stomach worms and treatments)

कधी कधी लोकांच्या पोटात खूप दुखते आणि याचे काही ना काही दुष्परिणाम असतात. हे पोटात दुखणे ग्यास (आंबटपणा) मुळे होत नाही, कदाचित आपल्या पोटात जंत (किडे) पडले असतील. हे जंत जर शरीरात कुठे ही झाले असतील तर यामुळे आपल्याला इतर रोग होण्याची शक्यता असू शकते. हे जंत उतकान मध्ये किंवा रक्तात होऊ शकतात, आणि हे शरीरात वेगाने पसरतात. पोटात जंत पडण्याचे काय कारण आहे? हे पोटात कसे विकसित होतात? हे परजिवी असतात, फिता कृमी इत्यादी हे परजिवी कोणत्याही आकाराचे असू शकतात या मुळे अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. याच्या वर उपचार ही सोपे आहेत.

पोटात जंत होण्याचे लक्षण खूप सारे आहेत. यात जास्त करून बद्धकोष्ठता होणे, जेवल्यानंतर जेवण चांगल्या प्रकारे न पचणे, सारखे सारखे अतिसार होणे, संडास मध्ये चिकट पणा किंवा रक्त येणे, जेवल्यानंतर लगेच संडासला होणे, पोटात दुखणे व आग होणे, gas (आंबटपणा) आणि सूज चा अनुभव, लवकर थकवा येणे, मुळव्याध होणे, त्वचा रोग एलर्जी, अशक्तपणा ही काही लक्षणे आहेत यामुळे आपल्याला समजेल कि आपल्या पोटात जंत पडले आहेत.

काही जंत लाल रक्त कोशिकांना आपला आहार बनवतात यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. काही जंत आपण केलेला आहार खातात. यामुळे पोटात खाज होणे, चिडचिडेपणा आणि अनिद्रा ची समस्या होते. जंत आपल्या त्वचेत खाज निर्माण करतात. यामुळे आपल्या शरीरात खूप खाज सुटते यामुळे इन्फेक्शन चा धोका वाढतो. जेंव्हा या परर्जीवीन मुळे सूज होते तेंव्हा पांढऱ्या रक्तकोशिका शरीराची सुरक्षा करायला सुरवात करतात यामुळे त्वचेवर व्रण पडतात, शरीरावर पुळ्या होतात आणि पिंपल्स सारख्या समस्या होतात. यामुळे आपल्या केसात कोंडा होतो, त्वचा शुष्क पडते.  पण काही परजीवी आतड्यांच्या (Mucous membrane) ला नुकसान पोचवतात. आयुर्वेदात हि ह्या समस्येवर उपचार आहेत. आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग करून आपण बरे होऊ शकतो.

पोटात किडे (जंत ) होण्याची लक्षणे

पोटात जंत पडण्याची काही कारणे आहेत. याच्यावर उपचार ही सोपे आहेत. त्वचेच्या खाली हालचाल होणे, दाणेदार घाव, निद्रा नाश, मासपेशी व सांध्यांचे दुखणे, रक्त विकार, यौन व प्रजनन समस्या, नीट श्वास घ्यायला समस्या होणे. याच्यावर उपचारा साठी काही मेडीकल परीक्षण आणि योग्य उपचार जरुरी आहे. याचे परीक्षण करते वेळी परंपरागत अंडाणु आणि परजीवी स्टूल टेस्ट केली जाते जे सगळ्यात महत्वपूर्ण आहे.

परंपरागत मळ परीक्षणा मुळे आपल्या मळात परजीवी किंवा त्यांची अंडी आहेत कि नाही समजते. या परीक्षणात तीन वेगवेगळ्या मळाच्या नमुन्यांची तपासणी आवश्यक आहे. सगळ्या नमुन्यांना सूक्ष्मदर्शी ने तपासण्या साठी चिकित्सका कडे पाठवावे. या परजीविंचा एक विशिष्ट जीवन चक्र असतो, ज्यामुळे हे निष्क्रिय वस्तू मध्ये देखील जिवंत राहतात. या पारंपारिक परीक्षणामुळे आपल्याला समजते कि आपल्या पोटात जंत  झालेत कि नाही. या चाचणी मुळे आपण योग्य तो उपचार करू शकतो.

याच्यावर उपाय करण्यासाठी आपल्याला रोज भोपळ्याच्या बिया, अंजीर व तीळा च्या बियांमध्ये एकसाथ मिळवून दिवसातून कमीत कमी २ ते ३ वेळा खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतात. अशावेळी गरम पाणी प्यावा किंवा सील बंद मिनरल पाणी प्यावा, कारण पाण्याद्वारे देखील पोटात जंत होतात. रोज एक अननस खाल्ल्याने पोटासंबंधी विकार बरे होतात.

जेवणाच्या ३० मिनिट आधी किंवा नंतर पपई खा. यावेळी अंतरंग संबंध बनवू नका, आपले कपडे, अंथरूण, गरम पाण्याने धुवा. परजीवी विरोधी आहार करा उदा. मोहरी च्या बिया खा, हात स्वच्छ ठेवा, कॉफी किंवा दारू पिण्याचे टाळा, आल्याची पेस्ट पोटातील जंत मारण्यासाठी एक प्राकृतिक स्त्रोत आहे. आल्याचे तुकडे करा आणि मधात मिळवा, यात थोडासा काळा मीठ टाका. याचे दिवसातून कमीत कमी तीन वेळा सेवन करा. जेंव्हा आपल्या पोटात किडे पडतील तेंव्हा काही पदार्थ खाण्याचे टाळा उदा. साखर, चरबी युक्त पदार्थ, मांस, चिकन, डुक्कर, मेंढी किंवा इतर प्राण्यांचे मांस खाऊ नका कारण या प्राण्यान मध्ये देखील किडे असू शकतात.  काही फळांचा आणि भाज्यांचा सेवन केले पाहिजे उदा. लसून, भेंडी, मटर, मुळा, बटाटा, टोमॅटो , शलजम, बीट इत्यादी आणि फळ जांभूळ, चेरी, द्राक्ष, किवी फळ, लिंबू, टरबूज, संत्रा, पपई, अननस, आलू बुखार, डालिंबाचे साल व त्याची पाने खायला पाहिजेत हे आपल्यासाठी खूप फायदेमंद ठरेल. औषधी वनस्पती मध्ये एजेलिका, राख लौकी बीज, सुपारी, अक्रोय हल्स, झुठी गेंडा, गोल्डन सील चे मूळ तसेच ओव्याच्या उपयोग करा. हे काही उपचार आहेत हे करून आपण या समस्येपासून वाचू शकता.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!! 

पपई खाण्याचे फायदे व पपई चे औषधी गुण-(The benefits of eating papaya and medicinal properties of papaya)

पपई खाण्याचे खूप फायदे आहेत आणि ते जाणून आपण आश्यर्यचकित व्हाल. पपई हे फळ सगळी कडे उपलब्ध आहे. पपई खाल्ल्याने खूप फायदे होतात. पपई हे आजारपणात देखील खाता येतो आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात  खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. पपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन केले जाते.

हृदय रोगावर फायदेमंद : 

हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अंग आहे. जर आपल्याला हृदया संबंधी काही आजार झाले तर आपले शरीर काम करणे बंद करते. जास्त करून हृदय रोग हा कोलेस्ट्रोल (चरबी ) च्या वाढण्यामुळे होतो. कारण हृदयाच्या रक्तवाहिन्या मध्ये जेंव्हा कोलेस्ट्रोल जमा होतो तेंव्हा हृदया संबंधी आजार होतात. आणि पपई मध्ये खूप असे पोषक तत्व असतात जसे फायबर, विटामिन C आणि एन्टी ऑक्सिडेंट मोठ्या मात्रेत उपलब्ध असतो, ज्यामुळे रक्तात कोलेस्ट्रोल जमा होत नाही.  ज्यामुळे आपल्याला हृदया संबंधी आजार होण्याची संभावना कमी होते.

पपई च्या झाडाचे दोन प्रकार असतात एक नर व दुसरा मादी . यांच्यात फरक ओळखणे सोपे असते, कारण पपई च्या नर झाडाला  फुल येतात आणि मादी पपई च्या झाडाला फुल उगवत नाही. महत्वाचे म्हणजे पपई हे फळ फक्त मादी पपई च्या झाडाला येतात. थंडी आणि पपई च्या झाडा खाली साचलेले पाणी ह्या दोन्ही गोष्टी पपईच्या फळासाठी नुकसान दाई असते.

पचन शक्ती वाढते :

जास्त करून लोकांना झटपट मिळणारे पदार्थ जास्त आवडतात. म्हणून लोक फास्ट फूड कडे आकर्षित होत आहेत. पण त्यांना याचे दुष्परिणाम माहिती नसते.  सतत व जास्त प्रमाणात फास्ट फूड खाल्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. पपई मध्ये अनेक प्रकारचे एन्झाईम्स असतात ज्यामुळे आपली पचन क्रिया चांगली होते आणि आपली पचन शक्ती वाढवण्यास मदत होते.  याच्यात डाईट्रि फायबर उपलब्ध असतो ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते.

पपई फक्त खाण्यासाठी नाही तर इतर अनेक कामांमध्ये उपयोगी पडते. कच्ची पपई भाजी बनवण्यासाठी वापरतात आणि यापासून सलाड पण बनवला जातो. पपई च्या बियांचे खूप औषधी गुण आहेत ज्यामुळे आपल्याला अनेक रोगांपासून बचाव होतो. पपई चा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी  केला जातो. विशेष करून पचन संबंधी औषधे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

आपल्या शरीरात प्रोटीन च्या पचनासाठी पेप्सीन नावाचे एन्जाइम चा स्त्राव होते. हा एन्जाइम पोटात एसिड तयार झाल्यावर सक्रीय होतो. पण पपई खाल्याने एसिड च्या अनुपस्थिती देखील पेप्सीन प्रोटीन पचवायचा करतो.

पपई मध्ये असलेल्या पपेन (चीक) चा उपयोग चिंगम बनवण्यासाठी, कॉस्मेटीक्स, टूथपेस्त, कोंन्ताक लेन्स क्लीनर बनवण्यासाठी उपयोग केला जातो. टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये चीकटवण्याच्या सामान बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.  कच्चा पपईच्या पपेन (चीक)मुळे गर्भपात होऊ शकतो. पपई मध्ये उपलब्ध असलेले खनिजे आणि विटामिन म्हणजे विटामिन A, क्याल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन B1, B3, B5, विटामिन E तसेच विटामिन K, फोलिक, पोटेशियम, कॉपर तसेच फायबर चा चांगला स्त्रोत आहे. तसेच अनेक प्रकारचे एन्टी ऑक्सिडेंट याच्यात उपलब्ध असतात जसे ल्युटेन, जीक्सेनथीन इत्यादी पपई मध्ये उपलब्ध असतात. पपई मध्ये काही मात्रेत प्रोटीन, आणि कार्बोहाड्रेट असतात.

पपई खाल्याने आपल्या शरीराला विटामिन c मिळतो ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवून अनेक आजारांपासून वाचवतो. विटामिन A डोळ्यांसाठी, त्वचेसाठी, म्युकस मेम्ब्रेन साठी आवश्यक असतो. रेटीना मध्ये होणारे मैक्युलर आजारापासून वाचवतो. रोज पपई खाल्याने आपल्या शरीरातील चयापचयन ठीक राहते. सूर्य किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या, थकावट, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे., सांधेदुखी, मांसपेशीनमध्ये वेदना, सफेद केस, कमी दिसणे इत्यादी दुष्प्रभाव आढळून येतात. पपई मध्ये उपलब्ध असलेले एन्टी ऑक्सिडेंट या हानिकारक सूर्य किरणां च्या नुकसाना पासून वाचवते.

डोळ्यांसाठी लाभदायी :

पपई मध्ये अधिक मात्रेत विटामिन A आणि विटामिन C असतात. जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेमंद असतात. वय वाढल्यावर आपली नजर कमी होते, पण पपई च्या नियमित सेवनाने डोळ्यांसाठी फायदा होतो. जर आपल्याला कावीळ झाली असेल तर पपई चे सेवन फायदेमंद असते. तसेच  हिरड्यांमध्ये रक्त येणे व  दातांची कमजोरी दूर करण्यासाठी मदत करते. पपई मुळे आपली पचन क्रिया चांगली होते. आपल्याला पोटाच्या समस्येपासून दूर ठेवतो.

पपई मध्ये असलेले विटामिन c, विटामिन ई आणि बीटा क्यारोटीन सारखे एन्टी ओक्सिडेंट असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि विटामिन मुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. असमयी होणारया त्वचेच्या समस्या पण ठीक करण्यास मदत होते. यामुळे आपण जास्त काळासाठी तरुण दिसतो. पपई मध्ये उपलब्ध असलेले  क्यारोटीन हे  फुफ्फुस व तोंडाच्या कॅन्सर पासून वाचवतो.

पपई मध्ये अनेक प्रकारचे एमिनो एसिड व एन्जाइम असतात ज्यामुळे हिरड्यांमध्ये होणारी सूज आणि जळण संपवण्यास आपली मदत होते.

पपई पुरळ, दाद, खाज आणि तोंडातील फोड घालवण्यासाठी मदत करते. जर कोणाला लखवा मारला असेल पपई च्या बिया वाटून त्या तिळाच्या तेलात मिळवून  उकळवून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर जिथे लकवा मारला असेल त्या ठिकाणी लावा, आपल्याला आराम मिळेल. पिकलेली पपई खाल्याने आपल्या फुफ्फुसाला फायदा मिळतो व आपले पोट साफ राहते.  छोट्या मुलांना अतिसारा पासून देखील वाचवतो आणि त्यांची भूक वाढवतो.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

थंड पाणी पिण्याचे नुकसान-(The dangers of drinking cold water)

गर्मी च्या दिवसात लोक सर्वात जास्त थंड पाणी पितात आणि जास्त करून लोक फ्रीज मधील पाणी पितात. बाहेरून आल्या आल्या ते फ्रीज मधील थंड पाणी पितात, थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला आराम मिळतो पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.  सतत थंड पाणी पिण्याने बरेच आजार देखील होतात आणि फ्रीज चा थंड पाणी पिण्याने जास्त नुकसान होतात.

फ्रीज चा थंड पाणी आपली पचन क्रिया बिघडवते. फ्रीज मधील थंड पाणी पिल्यामुळे आपल्या पोटाच्या वाहिन्या ( नसा) आखडतात. ज्यामुळे शरीराला उर्जा प्रदान करणारे तत्व आणि नसा कमजोर होतात. म्हणून आपण फ्रीज मधील थंड पाणी पिण्याचे टाळावे.

थंड पाणी पिण्याचे नुकसान

आपल्या शरीराला चालवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते जी फ्रीज मधील थंड पाणी पिण्यामुळे नष्ट होते आणि त्या ऊर्जेला नेतृत्व करण्यासाठी आपली पचन क्रिया तंदुरुस्त असणे आवश्यक असते. सतत थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला घशाचे आजार होऊ शकतात. सतत थंड पाणी पिण्याने आपल्या गळ्यात म्युकोसा तयार होतो आणि ज्यामुळे आपल्याला सर्दी-जुकाम, कफ, खोकला या सारखे आजर होतात. सततच्या थंड पाण्याच्या सेवनाने आपल्याला हृदया संबंधी आजार होऊ शकतात.

सर्वात आधी आपल्याला आपल्या शरीराच्या तापमाना बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. मग आपल्याला लक्षात येईल कि शरीराच्या तापमाना नुसार आपल्याला कोणत पाणी प्यायला हवे. माणसाच्या शरीराचा तापमान ९८ डिग्री सेल्सियस असतो त्याच्या नुसार शरीरासाठी २० – २२ डिग्री तापमान असलेले पाणी उचित असते. जर आपण याहून जास्त थंड पाणी पित असाल तर हे पाणी पचवायला शरीर जास्त वेळ घेईल, बर्फा चा पाणी पचण्यासाठी ६ तास लागतात तसेच पाणी गरम करून तो पाणी थंड झाल्यावर पिण्याने हा पाणी पचायला ३ तास लागतात व कोमट पाणी तर फक्त १ तासात पचतो व माएग्रेन पासून दूर ठेवतो.

थंड पाणी पिण्याने आपली पचन क्रिया कमजोर होते आणि थंड पाणी पिण्याने शरीरात बल्गम जमा होतो ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते आणि आपल्याला सर्दी, खोकला होतो.

आपल्याला कदाचित माहित नसेल थंड पाणी पिण्याने आपल्याला मुळव्याध सारखी समस्या होते आणि हे खूप धोकादायक आणि वेदनादाई असते. यामुळे फ्रीज मधील थंड पाणी पिण्याचे टाळा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

मधुमेहाच्या पेशंटने हि फळे खाणे टाळले पाहिजेत-(Fruits to avoid by diabetic patients)

जर आपल्याला मधुमेह असेल तर आपण काही फळ खाण्याचे टाळले पाहिजे. जर आपल्या घरात कोणी मधुमेहाचा रोगी असेल तर त्याला आपण बाजारात मिळणारी काही फळे खाण्या पासून रोखले पाहिजे. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्यात रोगी हळू हळू मृत्युच्या वेढ्यात जातो. या आजाराला सायलेंट किलर देखील म्हणतात आणि हा आजार रक्तातील शुगर ( साखरेचे ) चे प्रमाण वाढल्याने होतो. आपल्या देशात मधुमेह हा आजार खूप वेगाने पसरत आहे तसेच हा आजार अनुवांशिक देखील आहे.

जर आपल्याला मधुमेह असेल आणि आपल्याला या आजारापासून वाचायचे असेल तर आपल्या खाण्या पिण्याच्या सवई बदला, कारण जवळ जवळ प्रत्येक आजार हा आपल्या खाण्या पिण्याच्या अनियमित सवई मुळे होतो. यासाठी आपल्या दिनचर्येत थोडासा बदल करावा आणि खाण्या पिण्यावर लक्ष द्यावे. शरीरातील स्वादुपिंडामुळे इन्सुलिन तयार होते जे रक्तातील ग्लुकोसचे (शुगर) चे प्रमाण कमी करते. इन्सुलिनचे कमी प्रमाण किंवा अनुउपस्थिती तसेच शरीराची इन्सुलिन योग्य न वापरण्याच्या क्षमतेमुळे मधुमेह होतो. मधुमेह दोन प्रकारच्या लेवल वर होतो, टाईप १ या प्रकारात स्वादुपिंडचा बीटा पेशी जे इंसुलिन उत्पादनासाठी जबाबदार असतात  त्या पूर्ण पणे नष्ट होतात ज्यामुळे शरीरात इन्सुलिन बनत नाही. पूर्ण जगात या प्रकारचे रोगी फक्त १० % आहेत. टाईप २ यामध्ये मधुमेह ग्रस्त रोग्यांचा रक्तातील शुगर चा स्थर खूप जास्त वाढतो ज्याला नियंत्रित करणे खूप कठीण असते. अशा प्रकारच्या रोग्यांची संख्या जास्त आहे.

मधुमेहाच्या पेशंटने खालिल फळे खाणे टाळले पाहिजेत.

केळा: केळ्यामध्ये १२ ग्राम साखर असते याच प्रमाणे मध्यम आकाराच्या केळ्यात जवळ जवळ ३० ग्राम साखर आणि carbohydrate असतात, यामुळे आपल्या रक्तातील शुगर चे प्रमाण वाढू शकते. आणि मधुमेहाच्या पेशंटला आराम मिळण्याच्या ऐवजी त्रास जास्त वाढेल.

कलिंगड: कलिंगड हा इतर फळांच्या तुलनेत जास्त गोड नसतो कारण १०० ग्राम कलिंगडा मध्ये फक्त ६ ग्राम साखर असते. कलिंगडाच्या आकारात फरक असतो एका कलिंगडा मध्ये ५० ग्राम साखर असते. कलिंगड जर कमी मात्रेत खाल्ला तर त्याचे नुकसान होत नाही.

आंबा: मधुमेहात आंबा खाणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. १०० ग्राम आंब्यात १४ ग्राम साखर असते एवढेच नाही एका आंब्यात ३० ते ५० ग्राम साखर असते. म्हणून मधुमेहात आंबा खाणे धोकादायक ठरू शकते.

अननस: अननस एक आंबट फळ आहे, पण हा देखील आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो कारण याच्यात १०० ग्राम अननसा मध्ये १० ग्राम साखर असते. म्हणून मधुमेहाच्या पेशंटने अननस खाणे टाळावे.

द्राक्ष: द्राक्ष हि आंबट व गोड असतात पण १०० ग्राम द्राक्षा मध्ये १६ ग्राम साखर असते म्हणून मधुमेहाच्या रोग्याने द्राक्ष खाऊ नये.

नासपती: १०० ग्राम नासपती मध्ये १० ग्राम साखर असते. याच्यात पाणी आणि पोषक तत्व चांगल्या मात्रेत असतात पण यामध्ये साखरेची मात्रा जास्त असते म्ह्णून मधुमेहात नासपती खाऊ नये.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

टोमॅटो खाण्याचे फायदे आणि त्यातील औषधी गुण-( Benefits of eating Tomato and its medicinal properties)

आज आपण टोमॅटो चे फायदे व त्याचे औषधी गुण जाणून घेऊयात. टोमॅटो मुळे आपले अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

कॅन्सर पासून बचाव – टोमॅटो मध्ये एन्टी ओक्सिडेंट गुण असतात. जे आपल्या शरीरात कॅन्सर पसरवणाऱ्या सेल्स ची वाढ होऊन देत नाही. जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपला शरीर निरोगी आणि सुरक्षित राहील. कारण टोमॅटो च्या आत असे गुण असतात जे आजार पसरवणाऱ्या जीवनुंशी लढतात आणि आपल्या शरीरात इम्यून सिस्टीम म्हणजेच आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

रक्ताचे उचित संचार – जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारा रक्त योग्य प्रकारे कार्य करतो. जर आपण टोमॅटो खात नसाल तर त्याचा सूप बनवून पिऊ शकता तसेच भाजी मध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरातील रक्त संचारन योग्य प्रकारे चालेल. आपला रक्त अजून लाल गडद होईल.

डोळ्यांसाठी उपयुक्त – जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटो चे रोज सेवन करा आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटो मध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात.

सांधेदुखी वर गुणकारी – टोमॅटो मध्ये केरोटीन नावाचे एक तत्व असते. जो आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करतो. जर आपल्याला सांधेदुखी चा त्रास असेल किंवा संधिवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅटो चे सेवन करायला सुरवात करा. कारण यात असलेले औषधी गुण आपला साधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करेल.

वजन कमी करण्यासाठी – टोमॅटो मध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते आणि टोमॅटो मध्ये फायबर हि उचित मात्रेत असतो. तर आपण रोज टोमॅटो चा सेवन करत असाल तर आपला वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपण निरोगी व तंदुरुस्त राहाल. जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रोल ची मात्रा वाढली असेल तर वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी रोज टोमॅटो चे सेवन करा तसेच आपण टोमॅटो चा सलाड हि बनवू शकता.

पोटातील जंत – जर आपल्याला पोटा संबंधी समस्या असतील किंवा आपल्या पोटात जंत झाले असतील तर टोमॅटो कापून त्यात हिंग घालून त्याचे सेवन करा, आपल्याला फायदा होईल. किंवा कच्चा टोमॅटो कापून त्यात काळी मिरी पावडर टाकून २ ते ३ दिवस याचे सेवन करत असाल तर हे आपल्यासाठी लाभदायी ठरेल. आणि आपल्याला gas ची समस्या होणार नाही. तसेच अस्वस्थ व अतिसार सारख्या समस्या देखील होणार नाहीत.

तर आपल्याला समजलेच असेल टोमॅटो हा किती गुणकारी आहे व यात किती औषधी गुण आहेत आणि आयुर्वेदात हि याच्या बद्दल लिहिले आहे. आपण स्वतःला तंदुरुस्त व निरोगी ठेवण्यासाठी रोज टोमॅटो चे सेवन करा.   

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

जाडेपणा वर घरगुती उपचार-(Home remedies for weight loss)

जाडेपणा हि सगळ्यांसाठीच एक समस्या आहे यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा लोक आपल्यावर हसतात. जाडेपणा मुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात चरबी साठल्यामुळे आपण जाडे होतो. आज आपण जाडेपणा वर घरगुती उपचार पाहूयात ज्यामुळे आपला वाढलेला वजन कमी करण्यास मदत होईल. आपली खराब जीवनशैली, आपल्या खाण्या पिण्याच्या सवई उदा. जास्त वसायुक्त (fatty) पदार्थ खाणे, जास्त प्रमाणात दारू पिणे, शारीरिक श्रम कमी करणे,  तेलकट पदार्थ खाणे, व्यायाम न करणे, कमी झोपणे आणि अनुवांशिक तसेच हार्मोनल समस्यांमुळे पोटाची चरबी वाढणे यामुळे आपण जाडे होतो.

जाडेपणा वर उपचार करणे आवश्यक आहे कारण यामुळे आपल्याला इतर आजार देखील होतात उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदया संबंधी विकार इत्यादी आणि या समस्या निवारणासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत व आपल्या खाण्या पिण्याच्या सवई मध्ये बदलाव करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आपल्याला नियमित व्यायाम व योगा करणे आवश्यक आहे. कारण असे केल्यामुळे आपण निरोगी व तंदुरुस्त होऊ तसेच याच्यावर काही घरगुती उपचार देखील आहेत.

लाल मिरची  – कदाचित आपल्याला माहित नसेल लाल मिरची जाडेपणा कमी करण्यासाठी उपयोगी आहे. तसेच आपला वजन कमी करण्यासाठी फायदेमंद आहे. कारण लाल मिरची मध्ये Capsaicin हा एक घटक तत्व असतो जो आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट करतो जे उर्जा खपत वाढवण्यासाठी जरुरी असतो. ज्यामुळे आपली क्रिया पण ठीक राहते. रोज आपण लाल मिरची चा चहा बनवून प्या असे आपण काही दिवसांसाठी करा.  एक ग्लास पाण्यात थोडी लाल मिरची टाका आणि चहा बनवा आणि हळू हळू याची मात्रा १ चमचा एवढी वाढवा आणि जास्त लाभासाठी याच्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा. असा चहा रोज कमीत कमी १ महिन्यासाठी प्या. तसेच आपल्या जेवणात आलं , काळी मिरी, राई यांचा वापर करा असे केल्याने आपल्याला फायदा होईल.

लिंबू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. लिंबाचा रस आपला जाडेपणा कमी करण्यासाठी खूप फायदेमंद असतो. याच्यामुळे आपली पचन क्रिया ठीक होते आणि विषहरण ची प्रक्रिया वाढवतो, ज्यामुळे आपली पचन क्रिया मजबूत होते. म्हत्वाचे म्हणजे जाडेपणा कमी करण्यासाठी आपली पचन क्रिया चांगली असणे आवश्यक आहे. कारण यामुळे आपली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पोषक तत्व प्रदान करतात आणि याच्यात आपला मेटाबोलीज्म कमी करणारे विषाणू पदार्थ शरीरातून बाहेर काढतात. ३ चमचे लिंबाचा रस, १ चमचा मध आणि अर्धा चमचा काळी मिरी ची पावडर १ ग्लास पाण्यात चांगल्या प्रकारे मिळवून घ्या आणि रोज याचे सकाळी रिकाम्यापोटी सेवन करा. असे आपण ३ – ४ आठवड्यांपर्यंत करा आपला जाडेपणा कमी होण्यास मदत होईल.

एलोवेरा (कोरफड ) जसा आपल्या केसांसाठी व त्वचेसाठी फायदेमंद असतो तसाच आपला जाडेपणा कमी करण्यासाठी देखील उपयोगी आहे. कारण हा आपल्या मेटाबोलीजमला (चयापचयन)  उत्तेजित करतो आणि उर्जेची खपत वाढवतो आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतो. याच्यात नैसर्गिक कॉलेजन प्रोटीन असतात जे शरीरातील प्रोटीन सोखण्यासाठी ज्यादा मेहनत करून घेतात. ज्यामुळे पचन तंत्र क्रिया तंदुरुस्त होते आणि पोटातील विषाणू पदार्थ देखील बाहेर निघतात. ज्यामुळे आपल्या शरीरात रोग होण्याही शक्यता कमी होते. याच्यासाठी आपल्याला एक ताजा एलोवेरा (कोरफड )चा पाना मधून त्याचा गर काढा आणि त्याच्यात एक कप पाणी मिळवा किंवा संत्राच्या रस किंवा द्राक्षांचा रस देखील मिळवू शकता. आणि एलोवेरा ४ मिनिटांसाठी असेच राहूद्या आणि नंतर याचे सेवन करा असे केल्याने आपल्याला लवकर फरक जाणवेल.

सफरचंद आपल्याला अनेक प्रकारे फायदा पोचवतो जर आपण apple vinegar चा उपयोग करत असाल तर आपल्याला जाडेपणा कमी करण्यास मदत होईल. याच्यासाठी आपण एक कच्या सफरचंदाचा vinegar करू शकता यामुळे जाडेपणा कमी होतो आणि आपल्याला त्वरित उर्जा मिळते.  यामुळे आपल्या शरीरात वाढलेली चरबी नियंत्रणात राहते. एक चमचा apple vinegar एक ग्लास पाण्यात मिळवा आणि याचा सेवन आपण रिकाम्या पोटी करत असाल तर आपली चरबी कमी होईल.

आपण एक चमचा apple vinegar आणि एक लिंबाचा रस एक ग्लास पाण्या सोबत मिळवून देखील सेवन करू शकता हे देखील आपल्या साठी फायदेमंद ठरेल. apple vinegar चा उपयोग उचित मात्रेत करा कारण याच्या जास्त सेवनाने आपल्या शरीरातील पोट्याशियम चा स्थर व हाडांमधील खनिज पदार्थान मधील घनत्व कमी होऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून apple vinegar चा वापर योग्य मात्रेत व योग्य त्या सल्ल्याने करा.

मध आणि दालचिनी आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे जर आपण याचा उपयोग करत असाल तर आपल्याला जाडेपणाची समस्या कमी होऊ शकते. कारण यापासून बनवलेला चहा पिण्याने आपला मेटाबोलीजम चांगल्या प्रकारे चालतो. उर्जा वाढते व शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर पडतात आणि आपली पचन क्रिया चांगली होते. ज्यामुळे आपण जेवण चांगल्या प्रकारे पचवू शकतो. हा एक चंगला उपाय आहे.

दालचिनी इन्सुलिन शी लढून भूक कमी करतो ज्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. याच्यासाठी १ कप गरम पाणी घ्या त्यात अडीच चमचा दालचिनी पावडर मिळवा आणि त्यात एक चमचा शुद्ध मध मिळवा आणि यातील अर्धा मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी खा आणि उरलेला अर्धा मिश्रण रात्री झोपण्याच्या आधी घ्या हा आपला जाडेपणा कमी करण्यासाठी एक सरळ व सोपा घरगुती उपाय आहे. आणि त्याच बरोबर नियमित व्यायाम व योग करणे तेवढेच आवश्यक आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

गर्भावस्थेत दुसऱ्या महिन्यात काय खावे व काय खाऊ नये-(What to eat and what not to eat during second trimester of pregnancy)

गर्भावस्थेत खाण्या पिण्याबद्दल खूप काही बोलले जाते कारण, गर्भ धारण केलेली स्त्री जो भोजन खाते त्यामुळे बाळाचे संगोपन होते. जर स्त्री चे खानपान ठीक असेल तर तिचा शिशु पण निरोगी राहतो. बऱ्याचदा विचारले जाते गर्भावस्थेत काय खाल्ले पाहिजे व काय नाही खाल्ले पाहिजे तसेच कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे.

गर्भवती झाल्यावर गर्भावस्था पाचव्या आठवड्यात सुरु होते आणि खूप साऱ्या महिला अश्या असतात ज्यांच्यात गर्भावस्थेची लक्षणे पहिल्या महिन्यात दिसू लागतात. अशा वेळी आहार सगळ्यात महत्वपूर्ण आहे कारण यामुळेच आपला होणारा बाळ तंदुरुस्त होतो. गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात काय खाल्ले पाहिजे, तिसऱ्या महिन्यात काय खाल्ले पाहिजे? ह्या काळात आजारी पडल्यासारखे वाटते ज्यामुळे आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही पण तरी देखील आपल्याला पोषक आहार घेतला पाहिजे.

किवी चे फायदे  यावेळी किवी हा फळ रोज खाल्ला पाहिजे. अशा वेळी किवी चे  खूप महत्व आहे. यावेळी बाळाची न्यूरल ट्यूब (मज्जासंथा) विकसित व्हयाला सुरुवात होते आणि नंतर बाळाच डोक, पाठीचा कणा आणि तंत्रीकांचा विकास होऊ लागतो. तसेच गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यात होणारा परिवर्तन याच्या सोबत बाळाचा संचार तंत्र आणि हृदय विकसित होतात. म्हणून गर्भधारणेच्या दुसऱ्या आठवड्यात आहार खूप महत्वाचा असतो. यावेळी आहाराकडे विशेष लक्ष दिला पाहिजे.

गर्भधारणेच्या सुरवातीच्या दिवसात काय खाल्ले पाहिजे? आपल्याला फोलिक ऍसिड किंवा फॉलेट जे एक व्हिटामिन बी आहे हे गर्भवती महिलेस खूप फायदेमंद आहे आणि गर्भधारणेच्या सुरवातीच्या आठवड्यात फोलिक ऍसिड घेणे खूप आवश्यक आहे. कारण हे न्यूरल ट्यूब विकसित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतो. जर आपण फोलिक ऍसिड घेत नसाल तर न्यूरल ट्यूब योग्य प्रकारे विकसित होत नाही किंवा बाळ वेळेच्या आधीच जन्माला येतो. यामुळे आपल्याला व बाळाच्या जीवाला धोका असतो.

गर्भावस्थेत आहार कसा असावा

गर्भवती महिलेला आपल्या शरीरात आयन  ची कमी होऊन न देणे महत्वाचे आहे, कारण आपली रक्त पुरवठा करणारी यंत्रणा बाळा पर्यंत पण रक्त संचार करते. जर आपण आयन  ठीक घेत नसाल तर आपल्याला थकल्या सारखे वाटेल आणि अशक्तपणा पण येईल. आपल्याला जेंव्हा समजेल कि आपण गर्भवती आहोत तेंव्हा पासुन रोज २७ मिलीग्राम आयन घ्यायला सुरवात करा आणि अशा फळांचा सेवन करा ज्याच्यात सगळ्यात जास्त आयन असते. गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात बाळाचा विकास सुरु होतो.  

कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी मदत कारतो. जर शरीरात कॅल्शियम ची मात्रा कमी असेल तर हाडांसंबंधी आजार होतात आणि दुसऱ्या महिन्यात बाळाच्या हाडांचा विकास सुरु होतो. यामुळे शरीरात कॅल्शियम ची मात्रा वाढवणे खूप आवश्यक आहे. यासाठी रोज १००० मिलीग्राम कॅल्शियम घेणे आवश्यक आहे. यासाठी दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा सेवन जास्त करा. आणि दुग्ध पदार्थान सोबत पालेभाज्यांचा सेवन जास्तीत जास्त करा. जर आपण कॅल्शियम चा सेवन नाही करत तर आपला शरीर आपल्या हाडांन मधून कॅल्शियम घ्यायला सुरवात करतो. ज्यामुळे हाड कमजोर होतात आणि यामुळे आपल्या हाडांन मध्ये आणि सांध्या मध्ये वेदना होतात. त्यामुळे कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.

प्रोटीन आपल्या शरीराला ऊर्जा देण्याच काम करतात आणि प्रोटीन युक्त भोजन केल्याने शरीर मजबूत आणि निरोगी बनतो. यामुळे गर्भवती महिलेला सगळ्यात जास्त आपल्या आहारात प्रोटीन घेतले पाहिजेत आणि प्रोटीन युक्त भाज्या व फळांच सेवन केल पाहिजे, कारण प्रोटीन मुळे शरीर मजबूत बनतो आणि आपला बाळ देखील निरोगी राहतो तसेच मांसपेशीच्या विकासात मदत होते. प्रोटीन मुळे बाळापर्यंत आवश्यक रक्त पुरवठा होतो अशावेळी आपले वजन देखील वाढते म्हणून कमी fat वाला पनीर आणि मासे खा कारण यामध्ये अधिक प्रोटीन असतात आणि आपल्याला रोज ७५ ते १०० ग्राम प्रोटीन चा सेवन करायला हवा.

मिट स्प्रेड लीस्तीरिया हे लाल मास गर्भावस्थेत बिलकुल खायला नाही पाहिजे कारण यामुळे आपल्या बाळावर वाईट परिणाम होतात आणि मास किंव्हा  लाल मास खाल्याने त्याच्या वाढीवर परिणाम होतो. यामुळे या दिवसात मास खाणे टाळले पाहिजे. सोबत चीज ब्री व  चीज चे सेवन करू नका कारण याच्यात ई कोलाय bacteria असतो यांच्या सेवनाने इन्फेक्शन किंवा अन्य जटीलतनचा धोका असतो. यावेळी आयर्न ची कमी पूर्ण करण्यासाठी आपण लिव्हर चा सेवन करू शकता पण याच जास्त सेवन करू नका कारण यामध्ये रेटीनल असते यामुळे गर्भपात चा धोका असतो.

आपल्याला माहितच असेल दारू चे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि अशावेळी दारू चे सेवन करू नये. अंडी खाणे ठीक असते आणि फायदेमंद असते पण कच्चे अंडे आणि अर्धवट शिजलेली अंडी खाल्याने आपल्याला नुकसान होऊ शकतो. म्हणून याचा सेवन करू नका. अंडी उकडून खा आणि जास्त अंडी खाऊ नका, दिवसातून जास्तीत जास्त दोन आणि गर्भावस्थेत आपल्या आहार बद्दल डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!! 

किशमिश (मनुके) खाण्याचे फायदे-(Benefits of eating raisins)

मनुके खायला सगळ्यांनाच आवडते आणि मनुके हे ड्राय फ्रुट (सुखा मेवा) च्या श्रेणीत येतो. मनुके बनवण्यासाठी द्राक्ष सुकवली जातात, पण याच्यात द्राक्षातले सर्व गुण तसेच राहतात यामुळे याच्या सेवनाने आपल्याला बरेच फायदे होतात. मनुक्यांमध्ये भरपूर मात्रेत आयन , पोट्याशियम, कॅल्शिअम , मॅग्नेशिअम आणि फायबर असते. तसेच यात दुधात उपलब्ध असलेले सर्व तत्व असतात. यामुळे याच्या सेवनाने आपण निरोगी राहतो. मनुके खाणे जेवढे फायदेमंद असते, याच्या पेक्षा मनुक्याच पाणी पिण्याने जास्त लाभ होतो. आपण जर रोज मनुक्यांचा पाणी पीत असाल तर आपला बऱ्याच रोगांपासून बचाव होईल.

मनुके खाण्याचे फायदे

१) न्युट्रीशियन मूल्य वाढतात. म्हणून जास्त लाभ मिळवण्यासाठी मनुके भिजवून ठेवा व खा. यासाठी आपण ८ ते १२ मनुके घ्या व एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवत ठेवा. आणि सकाळी उठल्यावर हे भिजवलेले मनुके वाटून घ्या आणि रिकाम्या पोटी याचे सेवन करा आणि हा पाणी पिल्यामुळे आपली लिव्हर ची समस्या दूर होईल.

२) मनुक्यांमध्ये नैसर्गिकरीत्या  साखर उचित मात्रेत असते. द्राक्ष हि काळी, सोनेरी व हिरव्या रंगाची असतात, ज्यामुळे मनुक्यांचा रंग पण वेगळा असतो. मनुक्यांच्या उपयोग अनेक अन्नपदार्थान मध्ये केला जातो तसेच मिठाई मध्ये देखील केला जातो.

३) द्राक्षांच्या रसाचा उपयोग अनेक प्रकारचे हेल्थ टॉनिक बनवण्यासाठी केला जातो, मनुक्यां मध्ये क्यालरीज प्रचलित मात्रेत असतात. याचे सेवन ठराविक मात्रेत करावे. मनुके खाण्याचे खूप फायदे आहेत. मनुके खाल्यामुळे आपल्या पचन संबंधी समस्या दूर होते. यात फायबर प्रचलित मात्रेत असते जे पचन करण्यास मदत करते.

४) मनुक्यांचा पाणी पिण्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे प्रतिकारक क्षमता वाढते. आणि जर आपण मनुके थंडीच्या दिवसात दररोज सेवन करत असाल तर आपल्या शरीरात bacteriya संक्रमण नाही होत. जर आपल्या श्वासा मधून दुर्गंध येत असेल तर मनुक्यांमुळे आपल्या श्वासातील दुर्गंध दूर करण्यासाठी मदत होते. कारण मनुक्यांमध्ये antibacterical गुण असतात ज्यामुळे आपल्या श्वासातील दुर्गंध दूर व्हायला मदत होते.

५) हाडांची मजबुती वाढवण्यासाठी मनुके महत्वाची भूमिका बजावतात कारण यात कॅल्शिअम आणि माक्रो न्युट्रीशन असतात ज्यामुळे हाड निरोगी आणि मजबूत बनतात. मनुक्यांच्या सेवनाने आपल्या शरीरात रक्ताची कमी, अशक्तपणा सारख्या समस्या दूर होतात. मनुक्यांमध्ये आयन प्रचलित मात्रेत असते ज्यामुळे आपल्या शरीरात रक्त तयार होण्यास मदत होते आणि आपली हाडे देखील मजबूत होतात.

६) मनुक्यांच्या सेवनाने आपला लिव्हर ठीक राहतो, जर आपण रोज मनुके भिजवून त्याच्या पाण्याचे सेवन करत असाल तर आपला लिव्हर स्वस्थ राहतो. यामुळे आपल्या शरीरातील हानिकारक पदार्थ फिल्टर करून बाहेर काढायला मदत करतो. मनुक्यांच्या सेवनाने हृदया संबंधी आजार दूर राहतात. मनुक्यां मध्ये पोषक तत्व प्रचलित मात्रेत असतात यामुळे आपली कोलेस्ट्रोल ची मात्रा कमी करते आणि आपल्याला हृदया संबंधी आजारांपासून बचाव करतो.

शारीरिक ऊर्जेसाठी मनुकांचा सेवन करा

मनुके खाल्यामुळे आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते कारण यामध्ये (fructose) आणि ग्लुकोज ची मात्रा खूप असते. ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा चे संचारन त्वरित होते. मनुक्यांचा पाणी पिण्याने आपली किडनी स्वस्थ राहते आणि संक्रमण पासून देखील दूर राहते आणि किडनी स्वस्थ असेल तर आपण देखील स्वस्थ राहतो कारण किडनी आपल्या शरीरातून विषक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!