पपई खाण्याचे फायदे व पपई चे औषधी गुण-(The benefits of eating papaya and medicinal properties of papaya)

पपई खाण्याचे खूप फायदे आहेत आणि ते जाणून आपण आश्यर्यचकित व्हाल. पपई हे फळ सगळी कडे उपलब्ध आहे. पपई खाल्ल्याने खूप फायदे होतात. पपई हे आजारपणात देखील खाता येतो आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात  खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. पपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन केले जाते.

हृदय रोगावर फायदेमंद : 

हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अंग आहे. जर आपल्याला हृदया संबंधी काही आजार झाले तर आपले शरीर काम करणे बंद करते. जास्त करून हृदय रोग हा कोलेस्ट्रोल (चरबी ) च्या वाढण्यामुळे होतो. कारण हृदयाच्या रक्तवाहिन्या मध्ये जेंव्हा कोलेस्ट्रोल जमा होतो तेंव्हा हृदया संबंधी आजार होतात. आणि पपई मध्ये खूप असे पोषक तत्व असतात जसे फायबर, विटामिन C आणि एन्टी ऑक्सिडेंट मोठ्या मात्रेत उपलब्ध असतो, ज्यामुळे रक्तात कोलेस्ट्रोल जमा होत नाही.  ज्यामुळे आपल्याला हृदया संबंधी आजार होण्याची संभावना कमी होते.

पपई च्या झाडाचे दोन प्रकार असतात एक नर व दुसरा मादी . यांच्यात फरक ओळखणे सोपे असते, कारण पपई च्या नर झाडाला  फुल येतात आणि मादी पपई च्या झाडाला फुल उगवत नाही. महत्वाचे म्हणजे पपई हे फळ फक्त मादी पपई च्या झाडाला येतात. थंडी आणि पपई च्या झाडा खाली साचलेले पाणी ह्या दोन्ही गोष्टी पपईच्या फळासाठी नुकसान दाई असते.

पचन शक्ती वाढते :

जास्त करून लोकांना झटपट मिळणारे पदार्थ जास्त आवडतात. म्हणून लोक फास्ट फूड कडे आकर्षित होत आहेत. पण त्यांना याचे दुष्परिणाम माहिती नसते.  सतत व जास्त प्रमाणात फास्ट फूड खाल्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. पपई मध्ये अनेक प्रकारचे एन्झाईम्स असतात ज्यामुळे आपली पचन क्रिया चांगली होते आणि आपली पचन शक्ती वाढवण्यास मदत होते.  याच्यात डाईट्रि फायबर उपलब्ध असतो ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते.

पपई फक्त खाण्यासाठी नाही तर इतर अनेक कामांमध्ये उपयोगी पडते. कच्ची पपई भाजी बनवण्यासाठी वापरतात आणि यापासून सलाड पण बनवला जातो. पपई च्या बियांचे खूप औषधी गुण आहेत ज्यामुळे आपल्याला अनेक रोगांपासून बचाव होतो. पपई चा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी  केला जातो. विशेष करून पचन संबंधी औषधे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

आपल्या शरीरात प्रोटीन च्या पचनासाठी पेप्सीन नावाचे एन्जाइम चा स्त्राव होते. हा एन्जाइम पोटात एसिड तयार झाल्यावर सक्रीय होतो. पण पपई खाल्याने एसिड च्या अनुपस्थिती देखील पेप्सीन प्रोटीन पचवायचा करतो.

पपई मध्ये असलेल्या पपेन (चीक) चा उपयोग चिंगम बनवण्यासाठी, कॉस्मेटीक्स, टूथपेस्त, कोंन्ताक लेन्स क्लीनर बनवण्यासाठी उपयोग केला जातो. टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये चीकटवण्याच्या सामान बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.  कच्चा पपईच्या पपेन (चीक)मुळे गर्भपात होऊ शकतो. पपई मध्ये उपलब्ध असलेले खनिजे आणि विटामिन म्हणजे विटामिन A, क्याल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन B1, B3, B5, विटामिन E तसेच विटामिन K, फोलिक, पोटेशियम, कॉपर तसेच फायबर चा चांगला स्त्रोत आहे. तसेच अनेक प्रकारचे एन्टी ऑक्सिडेंट याच्यात उपलब्ध असतात जसे ल्युटेन, जीक्सेनथीन इत्यादी पपई मध्ये उपलब्ध असतात. पपई मध्ये काही मात्रेत प्रोटीन, आणि कार्बोहाड्रेट असतात.

पपई खाल्याने आपल्या शरीराला विटामिन c मिळतो ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवून अनेक आजारांपासून वाचवतो. विटामिन A डोळ्यांसाठी, त्वचेसाठी, म्युकस मेम्ब्रेन साठी आवश्यक असतो. रेटीना मध्ये होणारे मैक्युलर आजारापासून वाचवतो. रोज पपई खाल्याने आपल्या शरीरातील चयापचयन ठीक राहते. सूर्य किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या, थकावट, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे., सांधेदुखी, मांसपेशीनमध्ये वेदना, सफेद केस, कमी दिसणे इत्यादी दुष्प्रभाव आढळून येतात. पपई मध्ये उपलब्ध असलेले एन्टी ऑक्सिडेंट या हानिकारक सूर्य किरणां च्या नुकसाना पासून वाचवते.

डोळ्यांसाठी लाभदायी :

पपई मध्ये अधिक मात्रेत विटामिन A आणि विटामिन C असतात. जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेमंद असतात. वय वाढल्यावर आपली नजर कमी होते, पण पपई च्या नियमित सेवनाने डोळ्यांसाठी फायदा होतो. जर आपल्याला कावीळ झाली असेल तर पपई चे सेवन फायदेमंद असते. तसेच  हिरड्यांमध्ये रक्त येणे व  दातांची कमजोरी दूर करण्यासाठी मदत करते. पपई मुळे आपली पचन क्रिया चांगली होते. आपल्याला पोटाच्या समस्येपासून दूर ठेवतो.

पपई मध्ये असलेले विटामिन c, विटामिन ई आणि बीटा क्यारोटीन सारखे एन्टी ओक्सिडेंट असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि विटामिन मुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. असमयी होणारया त्वचेच्या समस्या पण ठीक करण्यास मदत होते. यामुळे आपण जास्त काळासाठी तरुण दिसतो. पपई मध्ये उपलब्ध असलेले  क्यारोटीन हे  फुफ्फुस व तोंडाच्या कॅन्सर पासून वाचवतो.

पपई मध्ये अनेक प्रकारचे एमिनो एसिड व एन्जाइम असतात ज्यामुळे हिरड्यांमध्ये होणारी सूज आणि जळण संपवण्यास आपली मदत होते.

पपई पुरळ, दाद, खाज आणि तोंडातील फोड घालवण्यासाठी मदत करते. जर कोणाला लखवा मारला असेल पपई च्या बिया वाटून त्या तिळाच्या तेलात मिळवून  उकळवून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर जिथे लकवा मारला असेल त्या ठिकाणी लावा, आपल्याला आराम मिळेल. पिकलेली पपई खाल्याने आपल्या फुफ्फुसाला फायदा मिळतो व आपले पोट साफ राहते.  छोट्या मुलांना अतिसारा पासून देखील वाचवतो आणि त्यांची भूक वाढवतो.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment