नाक वाहण्याच्या समस्येवर उपचार-(Remedies for a Runny Nose )

थंडीच्या दिवसात जेंव्हा नाक वाहू लागते तेंव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, यामुळे आपल्याला नीट झोप लागत नाही. आपले कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नाही आणि यामुळे दुसऱ्यांना देखील त्रास होतो. या समस्येवर काही घरगुती उपचार आहेत. यांच्या उपयोगाने आपले वाहते नाक ठीक होईल व आपल्याला बरे वाटेल.

वातावरणात झालेल्या बदला मुळे होणारया आजारांवर हळद खूप फायदेमंद आहे. सर्दी मध्ये हळद जाळून तिचा धूर घ्या, यामुळे आपल्याला तत्काळ आराम मिळेल. जर सर्दी मुळे आपले नाक बंद असेल तर दालचिनी, काळी मिरी, इलायची आणि जीरा  समान मात्रेत घेऊन एका सुती कापडात बांधून घ्या आणि याचा वास घ्या यामुळे आपल्याला खूप फायदा होईल. थंडीच्या दिवसात आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते जसे सर्दी, खोकला आणि नाकातून पाणी येणे म्हणजेच नाक वाहणे या समस्याना सामोरे जावे लागते. सर्दी एक सामान्य आजार आहे पण वेळेवर उपचार नाही घेतला तर हा आजार गंभीर होऊ शकतो. सर्दी मुळे ताप येणे, डोके दुखी व अंग दुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

सर्दी मुळे आपला नाक कधी कधी बंद होते ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि आपल्याला काम करताना देखील समस्या होतात. जेंव्हा आपला नाक बंद होते तेंव्हा खूप त्रास होतो. ताप येणे, अंगदुखी होते  यामुळे याच्यावर पक्का उपाय करणे आवश्यक आहे. जर आपल्याला याच्यावर उपचार करायचा असेल तर आपल्याला घरात उपलब्ध असलेल्या काही वस्तूंचा उपयोग करायला हवा ज्यामुळे आपल्याला लवकर आराम मिळेल.

लसुन चा उपयोग करून आपण स्वतः उपचार करू शकतो. लसनामध्ये एन्टीबायोटीक गुण असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद असतात. जर कोणाचा नाक सर्दी मुळे बंद झाला असेल किंवा नाकातून पाणी येत असेल तर यासाठी लसुन खूप फायदेमंद आहे. आपण लसणाच्या पाकळ्या व हळदी पूड पाण्यात उकळून घ्या, हे शिजल्यावर थंड होऊन द्या आणि थंड झाल्यावर याचे सेवन करा. असे केल्याने आपली बंद नाकाची समस्या दूर होईल आणि जर नाकातून पाणी येत असेल तर ते हि थांबेल.

सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने गरारा करा. कारण यात लवणीय गुण असतो. हा उपाय करण्यासाठी १ कप कोमट पाण्यात १ चमचा मीठ टाकून तो घोळून घ्या, या पाण्याने ३० सेकंदा साठी गरारे करा, आपल्याला आराम मिळेल. यामुळे नाक वाहण्याची समस्या दूर होईल, आपल्या घशाची खव खव देखील दूर होईल.  नाक वाहण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण राईच्या तेलाचा वापर करा. राईच्या तेलाचा वास खूप प्रभावी असतो. राईच्या तेलाचा वास घेतल्याने आपली नाक वाहण्याची समस्या दूर होईल आणि आपल्याला श्वास घ्यायला त्रास होणार नाही तसेच आपले नाक साफ होईल.

१. एक चमचा राईचा तेल वाटीत घेऊन १० सेकंद मायक्रोवेव मध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर एक एक थेंब आपल्या नाकात टाका यामुळे आपल्याला खूप फायदा होईल.

२. दोन चमचे सुक्या ओव्याचा बारीक चुरा करा आणि साफ फडक्यात बांधून ठेवा. हि पोटली नाकावर ठेवून श्वास घ्या, जेंव्हा जेंव्हा नाक वाहेल तेंव्हा हि पोटली नाकावर ठेऊन श्वास घ्या.

३. एका कपात १ ते ४ चमचे हळद टाका व एक कप पाणी उकळून घ्या.  या पाण्यात हळद मिळवा आणि १० मिनीटानंतर हळद गाळून घ्या आणि हा पाणी प्या. जो पर्यंत आपली नाक गळण्याची समस्या दूर नाही होत तो पर्यंत असे दिवसातून २ वेळा  पाणी प्या, यामुळे आपल्याला आराम मिळेल.

४. आळ्यामध्ये खूप सारे ऐन्टिसेप्टिक गुण असतात. जर आपण आलायुक्त चहाचे सेवन कराल तर आपल्याला खूप फायदा होईल . एक कपात ३ तुकडे आल्याचे टाका आणि एक कप गरम पाणी टाका, याच्यात दालचिनी पण टाका आणि हे चांगल्या प्रकारे उकल्यावर हे पाणी गरमा गरम प्या यामुळे आपला वाहणारा नाक ठीक होईल आणि आपल्या घश्या संबंधी आजार देखील ठीक होतील. असे दिवसातून कमीत कमी २ ते ३ वेळा करा, आपल्यासाठी फायदेमंद ठरेल.

५. मेथीच्या फायदयनबद्दल आपल्याला माहिती असेलच. याचा उपयोग बऱ्याच काळा पासून होत आहे. मेथी मध्ये खूप सारे औषधी गुण आहेत याच्यात आयन ची मात्रा खूप असते आणि आयन आपल्या शरीरासाठी फायदेमंद असते. जर कोणाला सर्दी जुकाम झाला असेल आणि यामुळे नाक बंद झाली असेल तर, किंवा नाकातून पाणी येत असेल तर, अश्यावेळी मेथी आपल्याला खूप लाभ पोचवते.

६. हळदीची पावडर पाण्यात मिसळवून उकळून घ्या आणि थंड झाल्यावर याचे सेवन करा आपल्याला फायदा होईल.

साधारणतः सर्दी हि १ आठवड्यात ठीक होते पण खाण्या-पिण्याच्या सवई मुळे सावध राहिले पाहिजे. जर सर्दी झाली असेल तर याच्यावर उपचार घेतले पाहिजेत. घटसर्प झाल्यावर अमलतास च्या काढ्याने गरारा करा असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. तुळस आणि आल थंडी मध्ये लाभदायक असते . तुळशी मध्ये खूप उपचारी गुण असतात, हे जुकाम आणि ताप यामध्ये खूप कारगर असते आणि नाक वाहण्याच्या समस्येवर देखील फायदेमंद आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment