अक्रोड खाण्याचे आयुर्वेदिक फायदे- ( Benefits of eating Walnut)

अक्रोड आणि अक्रोड चा तेल आपल्या साठी खूप फायदेमंद आहे. अक्रोड ला इंग्लिश मध्ये walnut म्हणतात. अक्रोड हे एक ड्राय फ्रुट (सुका मेवा) आहे. अक्रोड हा आपल्या मेंदूसाठी खूप लाभदायी असतो, म्हणून अक्रोड ला ब्रेन फूड म्हणतात. यामुळे आपल्या मेंदूची शक्ती वाढायला मदत मिळते. हा एक स्वास्थ वर्धक पदार्थ आहे. अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादीं मध्ये केला जातो. लहान मुलांना खास करून अक्रोड खायला दिले जाते, कारण हे मेंदू व शरीरासाठी खूप फायदेमंद आहे.

अक्रोड व अक्रोड च्या तेलाचा उपयोगामुळे केस लांब, दाट आणि काळे होण्यास मदत होते. यामुळे आपली त्वचा स्वस्थ व कोमल बनते आणि अजून अनेक प्रकारे अक्रोड आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. तज्ञांच्या नुसार हे एक ड्राय फ्रुट असून देखील याच्यात खूप कमी मात्रेत सोडियम असते, तसेच कोलेस्ट्रोल चे प्रमाण देखील कमी असते. या मध्ये भरपूर मात्रेत omega-3 fatty acid असतात. हे शरीरासाठी खूप फायदेमंद असतात.

अक्रोड मध्ये खूप प्रकारचे विटामिन असतात जसे कि विटामिन A, विटामिन B, विटामिन c, विटामिन B12, विटामिन D म्हणून याला विटामीन चा राजा म्हणतात. अक्रोड मध्ये खूप मात्रेत प्रोटीन असते तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, फॉंस्फरस, कॉपर, सेलेनियम अधिक मात्रेत असतात. अक्रोड मध्ये एन्टीऑक्सिडेंत तत्व व nutrients भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात.

अक्रोड चा सेवन सकाळी संध्याकाळी केल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या विकारांपासून मुक्ती मिळते. अक्रोड आपल्या मेंदूसाठी खूप फायदेमंद असतात. अक्रोड हा जवळ जवळ आपल्या मेंदुसारखाच दिसतो. अक्रोड खाण्यामुळे आपला बौदधिक पातळी (IQ)  वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते ज्यामुळे ताण तणाव कमी होतो व आपली स्मरण शक्ती वाढते.  अक्रोड मध्ये शक्तिशाली न्युरो प्रोटेक्टीव कंपाऊंड सारखे विटामिन E, मेल्यानीन, omega-3 fatty acid आणि एन्टी ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे आपल्या मेंदूला सुरक्षा मिळते तसेच आपण तंदुरुस्त राहतो.

अक्रोड हे सगळ्यांसाठी लाभदायक असतो, हे आपल्या मेंदूसाठी च लाभदायक आहे असे नाही. अक्रोड हे आपल्या हृदयासाठी देखील लाभदायक आहे. यामुळे आपले हृदय निरोगी राहते व आपल्या हृदया संबंधी आजार बरे करायला मदत मिळते. म्हणून अक्रोड चा सेवन करायला सुरवात करा कारण अक्रोड च्या सेवना मुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल (चरबी ) कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रोल ची मात्रा नियंत्रणात राहते व त्यामुळे आपल्या हृदयाला खूप फायदा होतो. अक्रोड मध्ये उपलब्ध असलेले omega 3 fatty acid, अल्फा लिनोलेनिक एसिड असतो यामुळे आपला हृदय स्वस्थ रूपाने चालतो आणि यामुळे रक्त संचार चांगल्या प्रकारे होतो. अक्रोड मुळे पुरुषांची शुक्राणूंची कमतरता सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते . कारण अक्रोडला आयुर्वेदात एक शक्तिशाली काम उत्तेजना वाढवणारा पदार्थ मानला जातो. यामुळे पुरुषाला मर्दानी शक्ती मिळते. त्यांची सेक्स करण्याची क्षमता वाढते आणि अक्रोड च्या सेवनामुळे शुक्राणूंची गती आणि त्यांची गुणवत्ता वाढते. वीर्य देखील जाड होतो. जर आपल्याला अशी कोणती समस्या असेल तर आपल्याला अक्रोड प्रतिदिन मधा सोबत रोज गरम दुधात मिळवून एक महिन्यासाठी घ्या. यामुळे आपल्याला चमत्कारी फायदे होतील आपली सेक्स शक्ती वाढेल. अक्रोड मुळे आपला मधुमेह देखील कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत होते . जर आपण रोज अक्रोड चे सेवन करत असाल तर आपला डायबेटीज नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. आपला वाढलेला वजन देखील कमी होण्यास मदत होईल.

अक्रोडला एक एन्टी कॅन्सर फूड देखील मानला जातो. कारण याच्यात एन्टी ऑक्सिडेंत घटक असतो. अमेरिकेतील एका युनिवर्सिटी च्या नुसार अक्रोड च्या सेवनाने कॅन्सर (कर्करोग) पासून बचाव करण्यास मदत होते. यामुळे प्रोस्टेट व ब्रेस्ट कॅन्सर चा धोका कमी होतो. यामुळे आपला वजन देखील कमी होण्यास मदत होते एवढेच नाही तर ज्यांचा वजन खूप कमी आहे त्यांचा वजन वाढायला देखील मदत होते.

अक्रोड मध्ये फायबर चांगल्या मात्रेत असतो ज्यामुळे आपली भूक कमी होते व जास्त खाण्यापासून रोखत यामुळे आपले अतिरिक्त वजन वाढत नाही. अक्रोड मध्ये असलेल्या फायबर मुळे आपल्या पोटा संबंधी समस्या जश्या बध्कोष्टता व आंबटपणा कमी होतात. आपल्या पोटाची चांगल्या प्रकारे सफाई होते. यामुळे आपला पोट निरोगी राहतो व आपली पचन शक्ती सुधारते.

अक्रोड च्या सेवनाने आपला बुद्धी तल्लख होते. त्याच बरोबर मानसिक तणाव, अवसाद कमी करतो. जर आपल्याला देखील मानसिक रूपाने स्वस्थ आणि तंदुरुस्त व्हायचे असेल, आपली बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर आजपासूनच अक्रोड खायला सुरवात करा. याच्यात उपलब्ध असलेल्या omega 3 fatty acid मुळे आपल्या शरीरात होणारी बेचैनी संपते. उच्च प्रतिसाद, मूड खराब होण्या सारख्या समस्या दूर होतात.

अक्रोड च्या सेवनाने आपण तणाव मुक्त होतो, तणाव मुक्त झाल्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते. ज्यांना चांगली झोप लागते त्याचा मेंदू तल्लख होतो व शरीराला आराम मिळतो व मेंदूलाही आराम मिळतो, म्हणून रोज झोपण्याच्या आधी दुधासोबत अक्रोड खायला सुरवात करा. अक्रोड च्या सेवनाने आपला शरीर आंतरिक रूपाने मजबूत होतो. कारण याच्यात उपलब्ध असलेले fatty एसिड मुळे आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढून आपल्या हाडांना पर्याप्त मात्रेत कॅल्शियम पुरवतो, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. कॅल्शियम आपल्या हाडांसाठी खूप फायदेमंद आहे.

अक्रोड ची साल काढून अक्रोड खाऊ नये कारण अक्रोड च्या सालात ९० % एन्टी ऑक्सिडेंत असतात. अक्रोड साला सकट खाल्यामुळे सालातील पोष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. आणि हे पोष्टिक तत्व आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी फायदेमंद असतात. अक्रोड मध्ये विटामिन्स, एन्टीऑक्सिडेंत मिनरल, प्रोटीन आणि SECL fatty एसिड असतात जे आपल्या त्वचेची देखभाल करतात. अक्रोड च्या सेवनामुळे आपल्या शरीराचे अंग मजबूत होतात, अक्रोड खाल्यामुळे आपली त्वचा चमकदार होते.

आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा, काळे डाग आणि सुरकुत्या नाहीश्या होतात ज्यामुळे आपण जास्त काळा पर्यत तंदुरुस्त दिसतो. अक्रोड च्या तेलात मॉइस्चरायझिंग गुणवत्ता असते ज्यामुळे आपली त्वचा शुष्क होत नाही आणि आपली त्वचा कोमल राहते. जर आपण अक्रोड च तेल आपल्या डोळ्यांच्या खाली लावत असाल तर डार्क सर्कल व काळे डाग व स्पॉट दूर होतात.

जर आपल्याला आपली त्वचा चमकदार व गोरी बनवायची असेल तर ४ अक्रोड २ चमचे ओटमील च्या सोबत दुधाच्या मलईत चागल्या प्रकारे मिळवून याची पेस्ट बनवा आणि याच्यात थोडा ऑलिव तेल मिळवा आणि हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. हि पेस्ट अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर लाऊन ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे आपल्या त्वचेत चमक येईल. व आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर होतील.

त्वचे सोबत अक्रोड आपल्या केसांना देखील लांब सडक, दाट आणि मजबूत बनवतो. आजकाल च्या वातावरणात प्रदुषणाची मात्रा खूप वाढली आहे आपली जीवनशैली खराब झाली आहे. आपण केसांसाठी केमिकल युक्त शॅम्पू चा वापर करतो ज्यामुळे आपले केस हे कमकुवत होतात. हि समस्या दूर करण्यासाठी आपण केसांमध्ये अक्रोड च्या तेलाचा वापर करा यामुळे आपले केस दाट, लांब व चमकदार होतील. कारण अक्रोड मध्ये उपलब्ध असलेले पोटिशियम, ओमेगा ३, ६, 9 आणि DFA (डेनियाल फ्याटी एसिड) आपल्या केसांना लांब, सुंदर व दाट बनवतील आणि यामुळे आपली केस गळण्याची समस्या दूर होईल.

अक्रोड चे औषधी गुण

अक्रोड मध्ये खूप औषधी गुण आहेत जे आपल्या शरीराला सुंदर आणि मजबूत बनवतात.

शरीरावर ज्या ठिकाणी आपल्याला वेदना, आग होत असेल, आणि सुज आली असेल त्या ठिकाणी अक्रोड च्या सालाचा लेप लावा आपल्याला बरे वाटेल.

अक्रोड ची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात.

रोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणार्या सफेद डागांची समस्या दूर होते.

जर आपण प्रतिदिन ५ अक्रोड १५ ते २० मनुक्यासोबत घेत असाल तर आपली अनिद्रेची समस्या दूर होईल.

अक्रोड जर रोज खाल्ले तर आपल्या लिव्हर संबंधित समस्या, थायराईड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज सारख्या समस्या दूर राहतील. आपण नियमित पणे अक्रोड चे सेवन करा आपल्याला याचा फायदा होईल.

 जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!.

पेन किलरमुळे (वेदनाशामक गोळ्यांमुळे) होणारे नुकसान- (Side effects Of Pain Killer)

पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध. आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे. सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल. पण या गोळ्या घेतल्याने कायम स्वरूपी इलाज होत नाही तो तात्पुरता असतो आणि बऱ्याच जणांना हे माहित नसते कि पुढे जाऊन त्यांना या वेदना नाशक गोळ्यांचे वाईट दुष्परिणाम होऊ शकतात.

जास्त करून लोक वेदना नाशक गोळ्या का घेतात ?

जेंव्हा आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना असहनीय होतात तेंव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर घेतो. कारण या गोळ्यांमुळे लगेचच आराम मिळतो आणि हळू हळू आपल्याला या गोळ्यांची सवय लागते, या गोळ्या जर आपण सतत घेत असू तर आपल्याला हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते.

पेन किलर गोळ्यांमुळे होणारे नुकसान

  • पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्या मुळे आपण वयस्कर दिसू लागतो.
  • रिकाम्या पोटी कधीही अशा गोळ्या घेऊ नका कारण यामुळे किडनी (मूत्रपिंड) संबंधी समस्या होऊ शकतात.
  • रोज घेतल्याने यकृत सबंधी समस्या उद्भवतात.
  • अशा गोळ्या रोज घेतल्याने आपल्याला घाबरल्या सारखे होते, निद्रानाश होते, तसेच अस्वस्थता वाढते.
  • पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब देखील कमी होतो.

काही खास गोष्टी लक्षात ठेऊन आपण पेन किलर घेऊ शकता

  • जेवल्यावर ३० मिनिटां नंतर ह्या गोळ्या घ्या.
  • पेन किलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा.
  • जर वेदना सारख्या सारख्या आणि असहनीय होत असतील तर डॉक्टर चा सल्ला घ्या.
  • पेन किलर नेहमी पाण्या सोबतच घेतल्या पाहिजेत
  • पेन किलर च्या गोळ्या ह्या  नेहमी डॉक्टर च्या सल्याने घेतल्या पाहिजेत.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

 

अश्वगंधा चे फायदे व नुकसान-(Advantages and disadvantages of Ashwagandha)

अश्वगंधा एक गुणकारी औषध आहे आणि हे आयुर्वेदिक आहे यामुळे खुप उपयोगी आहे. अश्वगंधा मुळे अनेक आजार ठीक करण्यासाठी मदत …

Read more

आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती -( Ayurvedic Health Tips)

आयुर्वेदिक आरोग्य टिप्स : – आयुर्वेदाचा हा आजपासून नाही तर प्राचीन काळापासून निरंतर वापर केला जात आहे, आयुर्वेद हा तेंव्हा पण मानवी आरोग्यासाठी उपयोगी होता आणि आजच्या आधुनिक काळातही आयुर्वेदाचा वापर केला जातो, आयुर्वेदाचा उपयोग केवळ आपल्या शरीरावरील त्वचे साठी नाही तर अंतर्गत शरीरात उपचार करण्यासाठी वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधांचा वापर केवळ भारतातच नव्हे तर विदेशामध्ये ही केला जातो. कारण आयुर्वेदात अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती असते.

आजच्या प्रगतशील युगात आधुनिक जीवन शैली ही पुरुषांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पाडत आहे, यामुळे पुरुषांना आपल्या आरोग्या संबंधी आधीच सावध व्हायला पाहिजे. याच्या आधी त्यांची आधुनिक जीवन पद्धती तसेच खान्यापिण्याच्या सवई मुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. जर तुम्ही आताच तुमच्या आरोग्य संबंधी जागरूक नाही झालात तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या आजाराला सामोरे जावे लागेल

पुरुषांसाठी आयुर्वेदिक आरोग्य टिप्स  

जंक फूड च्या सततच्या सेवनाने शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते, जर जंक फूड आपल्या रोजच्या जेवणाचा भाग असेल तर आपल्याला हे खाण्याचे लवकरात लवकर कमी केले पाहिजे. आपल्याला आपल्या खाण्यामध्ये २ केळी जरूर खायला हवीत, केळी खाल्याने आपली दिवसभराची ऊर्जा कायम राहील आणि हृदयाच्या अनेक आजारा पासून आपल्याला दूर ठेवेल. जर आपण पॅक फूड नेहमी खात असाल तर हि सवय आपल्याला बदलली पाहिजे.

व्यायाम किंवा चालण्याचा व्यायाम केल्या शिवाय आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकत नाही. जर आपल्याला तंदुरुस्त रहायचे असेल तर नियमित व्यायाम करा. तसेच चालण्याचा व्यायाम करा. सोडायुक्त कोल्ड ड्रिंक, कॉफी, लाल मासं, तेलकट पदार्थ यांचे सेवन कमी करा व कधी कधीच सेवन करा, कारण यांच्या नियमित सेवनाने आपल्याला नुकसानच होईल. जेवना मध्ये चांगल्या तेलाचा वापर करावा. अश्या पदार्थाचे नियमित सेवनाने आपले वजन वाढेल आणि वाढलेले वजन पुरुषांच्या योन क्षमतेवर नकारात्मक प्रभाव होतो. म्हणून जास्त वजन वाढून देऊ नका, जर व्यायाम शाळेत जायला आपल्याकडे वेळ नसेल तर घरी व्यायाम करा, लिफ्ट चा वापर टाळा, नियमित चालण्याचा वापर करा. ऑफिस, बाजारात चालत जाणे शक्य असेल तर चालत जा किंवा सायकलचा वापर करा. आहारात ताज्या फळांचा तसेच ताज्या भाज्यांचा वापर करावा, यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. सकाळी नाश्ता जरूर करा, रात्रीचा आहार कमी व हलका करावा, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून व्यायाम करावा.

सलाड व अंकुरित कडधान्यांचा वापर जेवणात करावा, जेवणात चपाती व भात एकाच वेळी खाऊ नये.

आयुर्वेदिक टिप्स

अनेक असे आयुर्वेदिक औषध आहेत ज्यामुळे आपण आपले आरोग्य सुधारू शकतो तसेच आपले शरीर मजबूत करू शकतो. आयुर्वेद हा खूप सोपा व कमी खर्चिक उपाय आहे. आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत यामुळे केवळ आपले शरीर तंदुरुस्त होत नाही तर आपले मन देखील शांत रहाते. अंघोळीच्या आधी तेल मालिश केल्याने डीमेंशिया च्या उपचाराचा महत्वपूर्ण मदत होते, एनिमा सारखे अन्यकर्म शरीराला आतून स्वच्छ करणाऱ्या प्रक्रियेला मदत करते. अनेक आयुर्वेदिक संस्था ब्राम्हणी, अश्वगंधा, इतर मुख्य आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून शांतीदायक औषध व डीमेंशिया च्या उपचार साठी औषध विकसित करत आहेत. भृंगराज चा आयुर्वेदात खूप महत्व आहे कारण याने आपले केस सुंदर व घनदाट बनतात भृंगराज तेलाचा वापर करून केसांची मालिश करा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

कोल्ड्रिंक पिण्याचे फायदे आणि तोटे -(Advantages and Disadvantages of drinking cold drinks)

कोल्ड्रिंक प्यायला सगळ्यांनाच आवडते, खासकरून गरमीच्या दिवसात सगळेच कोल्ड्रिंक पितात. कोल्ड्रिंक सगळ्याच दुकानांमध्ये उपलब्ध असतात. गरमीच्या दिवसांत कोल्ड्रिंक पिल्याने आपल्याला खूप बरे वाटते. हल्ली कोल्ड्रिंक ची अनेक उत्पादन बाजारात मिळतात उदा. पेप्सी, कोकाकोला, स्प्राईट, माझा, लिम्का ई. कोल्ड्रिंक आपण मोठ्या आवडीने पितो आणि गर्मी च्या दिवसात कोल्ड्रिंक पिल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. कोल्ड्रिंक चे जसे काही फायदे आहेत तसेच कोल्ड्रिंक जास्त प्रमाणत पिल्याने त्याचे तोटे देखील होतात.

कोल्ड्रिंक चे काही फायदे

कोल्ड्रिंक मध्ये ४ मिलीग्राम सोडियम, २ मिलीग्राम पोटयाशीयम, १० ग्राम कार्बोहाड्रेट, ९ ग्राम साखर आणि ०.१ ग्राम प्रोटीन आणि ८ मिलीग्राम  caffeine ची मात्रा असते हे आपल्यासाठी चांगले असते. कोल्ड्रिंक नेहमी प्यायचे नाही कधीकधी प्यायचं, जर कोल्ड्रिंक आपण नेहमी पीत असाल तर पुढे जाऊन त्याचे तोटे देखील होतात.

कोल्ड्रिंक मध्ये caffeine असते जे आपल्या शरीराची मज्जासंस्था ठीक ठेवण्यात मदत करते, आपल्या फुफ्फुसान मध्ये Fatty Acid तयार होऊन देत नाही, आपल्याला ताजेतवाने ठेवते.

कोल्ड्रिंक मध्ये सोडियम असते जे मानवी शरीरातील काही कार्ये नियमन करतो, शरीरातील पाणी धरून ठेवते, स्नायू cramp कमी करते, शरीरात इलेक्ट्रोलाइट ला नियंत्रित करतो, सोडियम या भागात जरुरी असते.

कोल्ड्रिंक मध्ये कार्बोनेट पाण्याचा वापर होतो हे पोटात होणाऱ्या ग्यासवर उपयोगी असते.

जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक पिण्याचे नुकसान    

कोल्ड्रिंक मध्ये एसिड असते आणि हे आपल्या दातांसाठी नुकसान पोचवणारे असते, यातील फोस्फोरिक एसिड आपली हाड कमजोर करतात, कोल्ड्रिंक जास्त पिल्याने वजन जास्त वाढते, कोल्ड्रिंक मुळे वजन वाढल्या मुळे आपण जाडे होतो. नेहमी नेहमी सेवन केल्याने आपल्याला caffeine ची लत लागेल जास्त सेवन केल्याने आपला स्वभाव चिडचिडा होईल, जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर कोल्ड्रिंक पिऊ नका, सतत प्यायल्याने आपल्याला ग्यास ची समस्या होईल निद्रानाश सारखी समस्या होईल, इतर अन्नपदार्थांच्या तुलनेत यात २०० पट साखरेचा वापर केला जातो. कोल्ड्रिंक च्या सततच्या सेवनाने आपल्याला मायग्रेन, Memory Loss, emotional disorder, कमी दिसणे, कमी ऐकू येणे, श्वाश घ्यायला त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

खजूर खाण्याचे फायदे-( Benefits of eating dates)

खजूरा मध्ये खूप पोषक तत्व असतात, खजूर हे शरीरासाठी चांगले असते, त्यामुळे लोक खजूर आवडीने खातात.

खजूरामध्ये असलेले पोषक तत्व

खजूरा मध्ये विविधप्रकारचे जीवनसत्वे असतात. तसेच खनिजे, फायबर, तेल, कॅल्शियम, सल्फर, पोटाशियम, पोस्फोरास ,मॅग्नीस , कॉपर आणि मॅग्निशिम यांसारखे तत्व असतात, हे तत्व आपल्या आरोग्या साठी व शरीरासाठी उपयोगी असतात.

खजूरामुळे होणारे फायदे  benefits Of Date Palm:

१ ) बद्धकोष्ठतेच पासून बचाव

बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, त्यांच्या साठी खजूर हे एक प्रकारे वरदान आहे. खजूर रात्र भर पाण्यात भिजून ठेऊन ते सकाळी खाल्याने त्याचा आपल्याला चांगला लाभ होतो, खजूरामध्ये सॉयुबल फाइबर असतात यामुळे हे बद्धकोष्ठतेवर खूप फायदेमंद असतात.

२) वजन वाढवण्यासाठी उपयोगी

आपल्याला आपले वजन वाढवायचे असतील तर खजूर हे खूप फायदेमंद ठरतात, खजूरामध्ये प्रोटीन, विटामीन्स तत्व व शुगर असते, १ किलो खजूरामध्ये ३००० कॅलरीस असतात, खजूर रोज नियमितपणे खाल्याने आपल्याला याचे फायदे होतील.

३) कॅन्सर पासून बचाव – Cure Of Cancer   

कॅन्सर सारखा आजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि कॅन्सर ला आटोक्यात आण्यासाठी अनेक संशोधन हि केले जात आहेत. एका संशोधनात असे आढळून आले आहे कि खजूर खाल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा चा धोका तसेच त्याचा प्रभाव कमी होतो. खजूर हा सगळ्यांसाठी लाभदायी आहे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसतात, म्हणून आपण खजुराचे रोज सेवन करा, यामुळे आपल्याला खूप फायदे होतील.

४) हृद्या संबंधी होणाऱ्या आजारांसाठी फायदेमंद  

खजूर रात्रभर पाण्यात भिजऊन ठेवा व सकाळी भिजवलेला खजूराचा चुरा करून खा, हे हृदयासाठी उपयोगी आहे. याच्यात पोट्याशियम असते, हे हृदय झटका व इतर हृदय संबंधी होणाऱ्या आजारांचा धोका कमी करतो. खजूर खाल्याने आपला कोलेस्ट्रोल नियंत्रित राहते.

५) अशक्तपणा दूर होतो  

अशक्तपणा खास करून महिलां मध्ये आढळते. ज्या लोकांना अशक्तपणा असतो ते लोक रक्त दान करू शकत नाहीत. ज्या लोकांना अशक्तपणा असतो त्यांच्या साठी खजूर कूप फायदेमंद आहे, खजूरा मध्ये आयन मोठ्या प्रमाणात असतात. खजूर खाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे स्थर सुधारते. खजूर खाल्याने आपल्याला ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, यामुळे थकावट व सुस्थी दूर होते.

खजुराचे फायदे तसेच इतर आजारांवर गुणकारी

  • खजूर रोज खाल्याने आपल्याला हाडांसंबंधी त्रास होणार नाही, यामुळे हाडे मजबूत होतात.
  • नियमित पणे खजूर खाल्याने कोणत्याही प्रकारची एलर्जी होत नाही.
  • खजूर खाल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते, आपल्याला ऊर्जा मिळते.
  • Sexual Weakness पासून पण आपला बचाव करतो, कोणत्याही प्रकारची Weakness होत नाही.
  • खजूर नशे पासून बचाव करतो.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

गरम पाणी पिण्याचे फायदे-(Benefits of drinking Hot water)

गरम पाण्याचे फायदे

गरम पाणी पिणे हे आरोग्यासाठी खूप फायदेमंद असते. आयुर्वेद आणि विज्ञान देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पावसाळ्यात जास्त करून पाण्या संबंधी आजार होतात आणि पसरतात. खासकरून पोटाचे आजार होतात, म्हणून डॉक्टर देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात ज्या प्रमाणे वातावरणात बदल होतो त्या प्रमाणे पाणी प्यावा.

गरम पाणी पिण्याचे फायदे

जास्त करून लोक गरम पाणी पीत नाहीत कारण त्यांना गरम पाण्याचे फायदे माहीत नसतात. गरम पाणी आपल्या आरोग्या साठी खूप फायदेशीर असते, यामुळे आपले अनेक आजारांपासून बचाव होते. बऱ्याच देशांमध्ये पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला जातो. डॉक्टरांच्या नुसार चांगल्या आरोग्यासाठी आपण दिवसातून कमीत कमी ८ – १० ग्लास पाणी प्यायला हवे. पण जर आपण दिवसातून ३ वेळा गरम पाणी पीत असाल तर याचे आपल्याला खूप फायदे होतील, गरम पाणी आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवते व आपले आरोग्य चांगले ठेवते. गरम पाणी पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते, याचे आपल्या त्वचेवर देखील चांगले फायदे होतात, अजून खूप फायदे आहेत.

आपले वजन वाढतच असेल आणि किती ही प्रयत्न केले तरी कमी हो नसेल तर गरम पाण्यात मध आणि लिंबू पिळून सतत ३ महिने हे प्या. आपल्याला याचा खूप फायदा होईल आणि हळू हळू आपल्याला फरक जाणवेल. कारण गरम पाणी आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढून देत नाही आणि चरबी हळूहळू कमी करतो. म्हणून डॉक्टर देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. जेवल्यानंतर १ कप गरम पाणी पिण्यास सुरवात करा याचा आपल्याला फायदा होईल.

आपल्याला कधीकधी जाणवते कि जरावेळ उन्हात किवा थंडीत बाहेर गेल्यावर सर्द्दी खोकला होता. याच्यावर जास्त काही करण्याची गरज नाही. आपण रोज ३ ग्लास गरम पाणी पीत जा, असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. कधी कधी बेमोसम आपल्याला सर्दी खोकला होतो अशावेळी गरम पाणी पिल्याने सर्द्दी खोकला जातो. गरम पाणी पिल्याने घश्या संबंधी आजार दूर होतात उदा. घश्यात खवखवणे, कफ, आवाज बसणे  ई.

महिलांनी गरम पाण्याचा पिण्यासाठी वापर जास्तीत जास्त करावा, कारण पाळी मुळे  महिलांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते, यावेळी गरम पाण्याने पोटाला शेक दिल्याने आराम मिळतो. यावेळी थोडे थोडे गरम पाणी पीत जा.

गरम पाणी पिल्याने शरीरात (detoxification) निर्विशीकरण होते आणि शरीराचे शुद्धीकरण करून शरीरातील अशुद्धी दूर करते. गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढते त्यामुळे घाम येतो. घाम आल्याने शरीरातील अशुद्धी दूर होतात. गरम पाण्यामुळे पोटा संबंधी विकार दूर होतात, आणि ज्यांना ग्यास आणि बध्कोष्टता होते त्यांना गरम पाणी पिणे खूप फायदेमंद आहे. म्हणून दिवसातून २ – ३ वेळा तरी गरम पाणी प्या.

चेहऱ्यावर पडणाऱ्या सुर्कुत्यामुळे आपण चिंतीत असतो. पण हि एक नैसर्गीक बाब आहे. परंतु इतरांच्या तुलनेत जास्त व लवकर चेहरयावर सुरकुत्या येत असतील तर हि चिंतेची बाब आहे हि समस्या दूर करायची असेल तर त्यासाठी गरम पाणी प्यायला सुरवात करा. काही दिवसातच आपल्याला फरक जाणवेल, आपली त्वचा चमकदार होईल, चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील आणि आपल्या चेहऱ्याचा रंग निखरेल.

आपले शरीर दुखत असेल तर आपल्याला गरम पाण्याचा सेवन केला पाहिजे, गरम पाणी पिल्याने आपली डोकेदुखी व पोटदुखी आणि शरीराचे दुखणे या समस्यांपासून आराम मिळेल. आपल्या त्वचे संबंधी समस्या होणार नाहीत, गरम पाणी पिल्याने आपल्या त्वचेत ओलावा (Moisture) राहतो. त्यामुळे त्वचेच्या रोगांपासून बचाव होतो. याच्या व्यतिरिक्त गरम पाणी केसांसाठी खूप फायदेमंद असतो. यामुळे केसांचा चमकदार पणा वाढतो तसेच केसांच्या वाढीसाठी फायदेमंद आहे. गरम पाणी पिल्याने पाचन क्रिया सुधारते, जेवल्यानंतर एक कप गरम पाणी पीत जा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

लसूण व मधाचे फायदे | Benefits of Garlic and Honey in Marathi

लसूण व मधाचे फायदे | Benefits of Garlic and Honey in Marathi

मध आणि लसूण  एकत्र करून खाल्ल्याने अनेक फायदे होतात. रिकाम्या पोटी लसून खाल्याने देखील भरपूर फायदे होतात, लसणावर केलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे कि लसून हे  Antibiotics  तसेच Anti-Septic औषध म्हणून वापरले जाऊ शकतो. याचे सेवन केल्याने आपल्या शरीरात उद्भवणाऱ्या अनेक रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. लसूण  खाल्याने आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते, लसूण आणि मध खाल्याचे भरपूर फायदे आहेत ते जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल.

लसणावर केलेल्या प्रयोगात हे सिद्ध झाले आहे कि यामध्ये अनेक रोग प्रतिकारक शक्ती आहेत, लसूण  जेवणामध्ये टाकल्याने जेवणाचा स्वाद वाढतो. त्यामुळे याला मसाल्यांचा राजा म्हणतात, प्राचीन काळापासून लसून हे एक प्रभावी व गुणकारी औषध मानले जाते. लसूण जेवणाचा स्वाद वाढवतो त्याच बरोबर शरीराला लाभ दायक आहे, याच्या मुळे आपण हृदयविकार या सारख्या गंभीर आजारांवर आळा घालू शकतो. हृदयविकाराचा झटका याचे मुख्य कारण रक्तदाब हे आहे. या आजारावर योग्य ते उपचार न केल्याने मृत्यू हि ओढू शकतो. आयुर्वेद व डॉक्टरांच्या नुसार लसूण  हे उच्च रक्तदाबावर  नियंत्रण ठेवण्यास मदत करते तसेच शरीरात (Detox) निर्विशीकरण करण्यास मदत करतो यामुळे शरीरातील थकावट दूर होते आणि पोटा संबंधी समस्या दूर करतात.

लसून मध्ये असलेले Anti-oxidant आपल्या शरीराला Oxidative Damage पासून वाचवते, तसेच लसूण  शरीरातून  हानिकारक रासायनिक बाहेर काढण्यास मदत करते. मधुमेह, अवसाद (Depression) आणि कर्करोग (cancer) सारखे आजार रोखण्यास मदत करते, लसून हे खूप पौष्टिक असते याच्यात खूप कमी कॅलरीज असतात. लसूण  हे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे.

सकाळी रिकाम्या पोटी लसून व मध खाल्याचे फायदे

३० ते ३५ ग्राम लसणा मध्ये २३% मॅगनीज तसेच १७% vitamin B 6 असतो. Vitamin E तसेच कॅल्शियम, आयन, पोटॅशियम या सारखे महत्वपूर्ण तत्व असतात, लसूण आणि मध याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत, जे आपल्याला स्वस्थ बनवतात तसेच यांच्यामध्ये रोगप्रतिकारक प्रणाली असल्या मुळे रोगांपासून बचाव होतो.

लसूण  आणि मधाचे फायदे अनेक आहेत हे आपल्या शरीराला सर्दी व ताप खोकल्या पासून बचाव करतात, तसेच पोटाचे आजार बद्धकोष्ठता – अतिसार यासारख्या रोगांशी लढण्यास मदत करतात तसेच आपली पाचन क्रिया मजबूत व स्वस्थ बनवतात. तसेच शरीरात वाढलेले कोलेस्टेरॉल चे प्रमाण नियंत्रित राहते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका सारख्या गंभीर आजारान पासून दूर राहण्यास मदत मिळते. लसून आणि मध एकत्र करून खाल्याने आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढण्यास मदत होते, लसून आणि मध यांचे मिश्रण खाल्याने आपल्याला (Fungal Infection) बुरशीजन्य संसर्ग पासून वाचवते. घश्यात होणारी खव खव दूर होते, घश्यात होणारी सूज तसेच संक्रमण दूर करते. एवढेच नाही लसूण  आणि मध खाल्याने आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते, जर आपल्याला डायरिया सारखी समस्या असेल तर लसणाची पेस्ट करून त्यात मध मिक्स करून रोज एक चमचा हे मिश्रण खाल्याने हि समस्या दूर होते त्याच बरोबर आपली पचन क्रिया मजबूत होते.

लसून चाऊन थोडावेळ दातात धरल्यामुळे दाताचे दुखणे बंद होते. काही लसणाच्या पाकळ्या घ्या त्यात ५० ते ७० मिलीग्राम पाणी घेऊन ते वाटून घ्या त्यात १० ते १५ ग्राम मध मिसळून सकाळी सकाळी याचे सेवन करा हे आपल्या शरीराला फायदेमंद आहे तसेच आपल्या केसांची मजबुती देखील वाढवतात,

लसून खाल्याने आपली योन शक्ती वाढते, कारण लसणा मध्ये Vitamin- E, Vitamin  B6 आणि मिनरल्स असतात ज्यामुळे प्रजनंन शक्ती वाढण्यास मदत होते, लसून आणि मध मिक्स करून खाल्याने आपला सेक्स शक्ती वाढेल. लसूण आणि मध यामध्ये दालचिनी मिसळून खाल्याने गाठिया रोग, खोकला, दात दुखणे, केसांचे गळणे, पोटाचे आजार आणि शरीरात वाढलेल्या चरबी चे प्रमाण नियंत्रणात ठेवते.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

भूक वाढवण्याचे उपाय व भूक न लागण्याचे कारण(Loss of Appetite Treatment)

भूक वाढवण्याचे उपाय:- आजकालच्या जीवनात प्रत्येकजण तणावग्रस्त जीवन जगत आहे, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शरीराला उर्जा मिळणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी योग्य वेळी आहार घेणे गरजेचे आहे, आपल्याला भूक लागत नसेल किवा आपण योग्य पद्धतीने वेळेवर जेवत नसाल तर ही गंभीर समस्या आहे. कारण शरीराला योग्य पोषक तत्वे आहारातून मिळतात, योग्य वेळेवर आहार न घेणे किंवा कमी आहार घेणे यामुळे वजन घटणे  किंवा शारीरिक कमजोरी अशक्तपणा या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

लोक जाणूनबुजून आपल्या आहारावर दुर्लक्ष करतात , पण अशी बरीच कारण आहेत ज्यामुळे लोक आपला आहार योग्य वेळेवर घेऊ शकत नाहीत, कोणाला आपल्या कामामुळे योग्य वेळेवर आहार घेता येत नाही तर कोणाला आपल्या पोटाच्या समस्येमुळे आहार घेता येत नाही. मित्रांनो भोजन हे आपल्या साठी सर्वात महत्वाचे आहे.

अजून आणखी काही करणे आहेत ज्याच्या मुळे  आपल्याला योग्य तो आहार घेता येत नाही बदलेल्या जीवनशैली मुळे  मुलामध्ये भुकेचे प्रमाण कमी झाले आहे आई वडलांची डॉक्टर कडे ही तक्रार असते कि आमचा मुलगा/मुलगी इतर मुलांपेक्षा कमी जेवतो, योग्य आहार न घेतल्यामुळे मुलांना वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.

आपल्यला भूक न लागण्याची समस्या आपण घरगुती पद्धतीने सोडूवू शकतो, सफरचंदा मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात त्याच बरोबर आपली भूक देखील वाढण्यास मदत करतात.  सकाळी व संध्याकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खा किंवा सफरचंदाचा जूस प्या यामुळे आपल्या रक्ताचे शुद्धीकरण होते व आपल्याला भूक लागल्याची जाणीव होते.

भूक वाढवण्यासाठी खालील साधे उपाय करा 

खजुराची चटणी बनवा त्यात लिंबाचा रस मिसळून रिकाम्या पोटी ही चटणी खा, असे केल्याने आपल्याला भूक लागेल

वेलची ही थंड असते वेलची आपल्या शरीरात गारवा निर्माण करते, वेलची चे दाणे एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या हे पाणी थंड झाल्यावर प्या. हे पाणी औषधा सारखे काम करते ज्यामुळे आपली भूक वाढण्यास मदत होते.

आयुर्वेदामध्ये भाज्यांचे महत्व सांगितलेले आहेत. एक वाटी टोम्याटोचा रस घ्या त्यात एक चमचा आल्याचा रस व गाजराचा रस मिळवा. हे मिश्रण प्यायल्याने  आपली भूक वाढेल.

एक चमचा ओवा व चिमुटभर काळा मीठ वाटीभर पाण्यामध्ये मिसळून ते मिश्रण उकळून घ्या थंड झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्या व हे मिश्रण प्या काही दिवस हे मिश्रण दिवसातून एकदा प्या असे केल्याने आपली भूक वाढेल.

एक चमचा मधामध्ये थोडी काळी मिरी मिक्स करून दिवसातून २ – ३ वेळा हे मिश्रण चाटत जा यामुळे देखील आपली भूक वाढेल.

लिंबू कापून घेऊन त्यावर काळ मीठ लाऊन ते खाल्यामुळे यामुळे आपली भूक न लागण्याची समस्या दूर होईल.

आणखी काही भूक वाढवण्याचे सोपे उपाय आहेत जसे एक ग्लास पाणी उकळून त्यात चिंच मिळवा चिंच मऊ झाल्यावर चिंच त्याच पाण्यात मिसळून घ्या व उरलेली चिंच काढा या चटणीत चिमुटभर मीठ, चीमुठ्भर काळी मिरी पावडर टाकून मिक्स करून घ्या आणि हया मिश्रणात पुन्हा पाणी मिसळून घ्या या पाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्याला भरपूर भूक लागेल हा एक आयुर्वेदिक उपाय आहे.

पुदिन्याची चटणी व मधाचे मिश्रण आपली भूक वाढवते तसेच आपले पोट निरोगी ठेवते .पुदिना आपल्या शरीरामध्ये गारवा निर्माण करतो व आपल्या शरीराला रोगांपासून वाचवतो, आणि पोटा संबंधी समस्या दूर करतो, पुदिन्याची चटणी एक वाटी मधात मिळउन खाल्याने अपली भूक कमी लागण्याची समस्या दूर होईल

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!