चिंतन करायच्या पद्धती-( How to do Meditation )

Meditation करण्याच्या पद्धती जाणन्या आधी आपण Meditation म्हणजे काय ते जाणून घ्या आणि हे आपल्या साठी का फायदेमंद आहे? Meditation कसे करायचे, श्वास कसा घ्यायचा, जीवन कसे जगायचे, प्रेम कसे करायचे. आपल्याला प्रश्न  येऊ शकतो कि आपण हसायला किंवा रडायला शिकतो का? नाहीतर कसे हसायचे किंवा कसे रडायचे? हे आपल्याला कोणी शिकवलेले नसते, याच विषयावर एक महान योगशास्त्री असं सांगतात कि ध्यान आपला स्वभाव आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण हे कुठेतरी हरून बसलोय.

Meditation करण्याची पद्धत आणि याचे फायदे हे जाणून घेणे आवश्यक आहे. Meditation हे कोणतीही व्यक्ती एका प्रयत्नात शिकू शकत नाही. Meditation करणे हे खूप संयमाचे आहे आणि जर आपल्याला सुरवातीला जमत नसेल तर निराश होऊ नये, कारण एका दिवसात आपण कोणतेही काम शिकत नाही. आपल्याला याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. काही काळ प्रयत्न केल्यावर आपला ध्यान लागतो, हळू हळू आपल्याला याचे फायदे होतील. म्हणून Meditation फक्त १ – २ दिवस करून मधेच सोडू नका जर आपल्याला शक्य असेल तर दिवसातून फक्त १५ – २० मिनिट करा. या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जी जन्मजात यशस्वी असते, सगळ्यानाच यश आणि अपयशाला सामोरे जावे लागते.

मिळवणे-गमावणे, सुख-दुख हे जीवनात येत जात राहतात, काही लोक याचा मोठ्या हिमतीने सामना करतात. तर काही घाबरून हार मानतात. जास्त करून शाळेतील लहान मुलांना परीक्षेच्या वेळी टेन्शन येत, त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येतात, काही लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हार मानतात आणि काही जण खंबीर पणे समस्यांचा सामना करतात. लोक अस का करतात? एकाच परिस्थिती मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने व्यवहार करतात. विज्ञान नुसार ज्यांचे हृदय कमजोर असते त्यांचे रोगप्रतिकार शक्ती कमजोर असते. त्यामुळे अशे लोक टेन्शन, आजारात किंवा इतर परिस्थितीत लवकर चिंताग्रस्त होतात आणि हार मानतात. अशा लोकांसाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे Meditation आहे. Meditation म्हणजेच ध्यान, हे केवळ आध्यत्म सोबत जोडलेले नाही तर विज्ञाना सोबत देखील जोडलेले आहे. Meditation काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. Meditation म्हणजे ध्यान हि एक प्रकारे योग क्रिया आहे. ज्याच्यात माणूस आपले मन एका चेतनेच्या विशिष्ठ अवस्थेत आण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच आपले ध्यान केंद्रित करतो. Meditation चे मुख्य उद्धिष्ट हे लाभ प्राप्त करणे असते, Meditation करणे म्हणजे आपल्या अंतर मनाला शांती देणे, आंतरिक ऊर्जा किंवा जीवन शक्ती चे निर्माण करणे जे आपल्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद आणतो.

तणाव, डिप्रेशन, एल्जामार, Diabetes, उच्च रक्तदाब यांन सारख्या आजारांना नियंत्रित करण्याचा व लढण्यासाठी योग आणि Meditation चे महत्वपूर्ण योगदान असते. Meditation चे फायदे बऱ्याच लोकांना माहित नसतात पण याचे खूप फायदे आहेत. जे आपल्याला अनेक मानसिक व शारीरिक आजारांपासून बरे करतात. धुम्रपान आणि नशा करण्याच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी मदत करतो. आपल्या मनात उद्भवणारे नकारात्मक विचार दूर करतो. Meditation मुळे  आपल्या शरीरात कोर्टीसोल नावाच्या हार्मोन चे विमोचन योग्य मात्रेत होते, ज्यामुळे आपले मन शांत राहते तसेच तणाव आणि टेन्शन पासून दूर ठेवतो.

Meditation मुळे स्मरणशक्ती तल्ल्ख  होते, डोकेदुखी होत नाही, जीवनाचे उददेश समजण्यासाठी मदत मिळते, चिंतेपासून दूर ठेवते, आत्मज्ञानाची प्राप्ती होते, आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो व तो सकारात्मक होतो, यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

Meditation हे योगा मधील एक भाग आहे. योगा मध्ये श्वासाला महत्वाचे स्थान आहे. श्वासा मुळे आपले वय वाढते व कमी होते, श्वासावर नियंत्रण मिळवल्यामुळे सर्व अवयवांना नियंत्रित करता येते. श्वास या  क्रिये मुळे आपले ध्यान केद्रित आणि सक्रीय करण्यास मदत मिळते. ध्यान करता वेळी जेंव्हा आपले मन अस्थिर होते तेंव्हा श्वसन क्रियेवर ध्यान केंद्रित केल्यामुळे हळू हळू मन स्थिर होते. यामुळे आपले ध्यान केंद्रित होते.

ध्यान करता वेळी मोठा श्वास घेऊन हळू हळू सोडण्याने शारीरिक आणि मानसिक लाभ मिळतो. डोळे बंद करून आतील बुबुळ स्थिर करा, जीभ अजिबात हलऊ नका, एकदम स्थिर ठेवा, जर आपल्याला कोणताही विचार आला तर तो विचार सोडून आणि ध्यानस्त व्हा. हे जबरदस्ती करू नका, आपले लक्ष केंद्रित करा, बाहेरील आवाजाकडे दुर्लक्ष करा व ओम…… च्या आवाजावर ध्यान केंद्रित करा. याच प्रकारे शरीरात पण एक आवाज येत असतो तो ऐकण्याचा प्रयत्न करा तसेच डोळ्यांच्या समोरील पसरलेल्या काळोखाला बघण्याचा प्रयत्न करा.

Meditation करण्याच्या आधी एखादी शांत जागा शोधा, प्रकृती आणि हिरवीगार झाडांची कल्पना करा आपण एखाद्या टेकडीवर बसलो आहोत आणि थंडगार हवा सुटली आहे अशी कल्पना करा, आपले इष्टदेव आपल्या समोर आहेत अशी कल्पना करा, आपले ध्यान सुरवातीला भटकू नये यासाठी आपण कल्पना करतो. Meditation करता वेळी एखादी शांत जागा शोधा आपल्या मनात कोणतेही विचार येऊन देऊ नका, आपले शरीर सैल सोडा, आणि शरीरात कंपन होऊ दे आणि त्याचा अनुभव करा कि हि उर्जा आपल्या पायातून वर वाहत आहे हि प्रक्रिया २० मिनिटांपर्यंत करा यामुळे आपला ध्यान बाहेरच्या गोष्टी सोडून फक्त एका गोष्टीवर केंद्रित होईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment