कोल्ड्रिंक पिण्याचे फायदे आणि तोटे -(Advantages and Disadvantages of drinking cold drinks)

कोल्ड्रिंक प्यायला सगळ्यांनाच आवडते, खासकरून गरमीच्या दिवसात सगळेच कोल्ड्रिंक पितात. कोल्ड्रिंक सगळ्याच दुकानांमध्ये उपलब्ध असतात. गरमीच्या दिवसांत कोल्ड्रिंक पिल्याने आपल्याला खूप बरे वाटते. हल्ली कोल्ड्रिंक ची अनेक उत्पादन बाजारात मिळतात उदा. पेप्सी, कोकाकोला, स्प्राईट, माझा, लिम्का ई. कोल्ड्रिंक आपण मोठ्या आवडीने पितो आणि गर्मी च्या दिवसात कोल्ड्रिंक पिल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. कोल्ड्रिंक चे जसे काही फायदे आहेत तसेच कोल्ड्रिंक जास्त प्रमाणत पिल्याने त्याचे तोटे देखील होतात.

कोल्ड्रिंक चे काही फायदे

कोल्ड्रिंक मध्ये ४ मिलीग्राम सोडियम, २ मिलीग्राम पोटयाशीयम, १० ग्राम कार्बोहाड्रेट, ९ ग्राम साखर आणि ०.१ ग्राम प्रोटीन आणि ८ मिलीग्राम  caffeine ची मात्रा असते हे आपल्यासाठी चांगले असते. कोल्ड्रिंक नेहमी प्यायचे नाही कधीकधी प्यायचं, जर कोल्ड्रिंक आपण नेहमी पीत असाल तर पुढे जाऊन त्याचे तोटे देखील होतात.

कोल्ड्रिंक मध्ये caffeine असते जे आपल्या शरीराची मज्जासंस्था ठीक ठेवण्यात मदत करते, आपल्या फुफ्फुसान मध्ये Fatty Acid तयार होऊन देत नाही, आपल्याला ताजेतवाने ठेवते.

कोल्ड्रिंक मध्ये सोडियम असते जे मानवी शरीरातील काही कार्ये नियमन करतो, शरीरातील पाणी धरून ठेवते, स्नायू cramp कमी करते, शरीरात इलेक्ट्रोलाइट ला नियंत्रित करतो, सोडियम या भागात जरुरी असते.

कोल्ड्रिंक मध्ये कार्बोनेट पाण्याचा वापर होतो हे पोटात होणाऱ्या ग्यासवर उपयोगी असते.

जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक पिण्याचे नुकसान    

कोल्ड्रिंक मध्ये एसिड असते आणि हे आपल्या दातांसाठी नुकसान पोचवणारे असते, यातील फोस्फोरिक एसिड आपली हाड कमजोर करतात, कोल्ड्रिंक जास्त पिल्याने वजन जास्त वाढते, कोल्ड्रिंक मुळे वजन वाढल्या मुळे आपण जाडे होतो. नेहमी नेहमी सेवन केल्याने आपल्याला caffeine ची लत लागेल जास्त सेवन केल्याने आपला स्वभाव चिडचिडा होईल, जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर कोल्ड्रिंक पिऊ नका, सतत प्यायल्याने आपल्याला ग्यास ची समस्या होईल निद्रानाश सारखी समस्या होईल, इतर अन्नपदार्थांच्या तुलनेत यात २०० पट साखरेचा वापर केला जातो. कोल्ड्रिंक च्या सततच्या सेवनाने आपल्याला मायग्रेन, Memory Loss, emotional disorder, कमी दिसणे, कमी ऐकू येणे, श्वाश घ्यायला त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

1 thought on “कोल्ड्रिंक पिण्याचे फायदे आणि तोटे -(Advantages and Disadvantages of drinking cold drinks)”

Leave a Comment