महिलांना नाकाचे सौदर्य खुलविण्यासाठी अलंकार

१. आपल्या धर्मामध्ये कान टोचणे (कर्णवेध) हा एक संस्कार सांगितला आहे. त्यामुळे कान या अवयवाला विविध ठिकाणी भोके पाडून त्यामध्ये वेगवेगळे अलंकार घालण्याची प्रथा येथे फार प्राचीनकाळापासून चालू आहे. परंतु नाक टोचणे ही गोष्टच आपल्या धर्मात नव्हती. त्यामुळे प्राचीनकाळी नाकासाठी अलंकार ही प्रथा येथे कधी नव्हती.

२. नाक टोचून त्यात नथ, चमकी, सुंकले वगैरे दागिने घालणे ही बाब आपल्याकडे तशी अलीकडच्या म्हणजे गेल्या हजार एक वर्षांपासून सुरू झालेली आहे. ही प्रथा अथवा चाल येथे मुसलमान धर्मीय आक्रमकांनी आणली.

३. बुलाक – आपल्या धर्मामध्ये कान टोचणे (कर्णवेध) हा एक संस्कार सांगितला आहे. त्यामुळे कान या अवयवाला विविध ठिकाणी भोके पाडून त्यामध्ये वेगवेगळे अलंकार घालण्याची प्रथा येथे फार प्राचीनकाळापासून चालू आहे. परंतु नाक टोचणे ही गोष्टच आपल्या धर्मात नव्हती. त्यामुळे प्राचीनकाळी नाकासाठी अलंकार ही प्रथा येथे कधी नव्हती.

– नाक टोचून त्यात नथ, चमकी, सुंकले वगैरे दागिने घालणे ही बाब आपल्याकडे तशी अलीकडच्या म्हणजे गेल्या हजार एक वर्षांपासून सुरू झालेली आहे. ही प्रथा अथवा चाल येथे मुसलमान धर्मीय आक्रमकांनी आणली.

४. बेसर- हाही बुलाक अलंकाराचेच जरा वेगळे रूप असणारा मुस्लीम अलंकार असून तोसुद्धा बुलाकप्रमाणेच दोन्ही नाकपुडय़ांच्या मधल्या भागात अडकवला जातो.

५. मुरकी – चमकीप्रमाणेच परंतु चमकीच्या वर दिसणारा मोती अथवा रत्नखडा याऐवजी चंद्राकाराच्या कोंदणात बसवलेले रत्न व कोंदणाला जडविलेले मोती, अशा रूपाकारातली ही चमकीच, असे म्हणणे योग्य ठरते.

– या मुरकीच्या खालच्या बाजूला मळसूत्र असते व त्याच्या योगाने ही मुरकी एका जागी घट्ट (स्थिर) राहू शकते. ही मुरकी नेहमीप्रमाणेच कानामध्येही घालण्याची पद्धत आहे. या मुरकीलाच काही ठिकाणी ‘मोरणी’ असेही म्हणतात.

Leave a Comment