नाकाचे सौदर्य टिकवण्यासाठी

१. इतरांपेक्षा सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही जशी तुमच्या चेह-याची काळजी घेता तशीच काळजी नाकाची देखील घेणे आवश्यक आहे.

२. नाकाचा आकार कसाही असो पण त्याची योग्य काळजी घेऊन तुम्ही त्यास सुंदर आणि सुडौल ठेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला नाकाचे सौंदर्य टिकवण्यासाठी काय केले पाहिजे आणि काय करू नये याबद्दलच्या काही खास टिप्स.

३. तेल पुसण्यासाठी वापरा टिशू पेपर : नाकाच्या कोप-यांवर व वरील त्वचेवर खुप जास्त प्रमाणात तेल जमा होत असते. यामुळे नाकावर ब्लॅकनेस, पिंपप्ल या समस्या उत्पन्न होऊ शकतात. या समस्या उद्भवू नये यासाठी नाकावर तेल जमा होऊ देऊ नका. तेल पुसण्यासाठी सोबत नेहमी टिशू पेपर ठेवावा.

४. मेहअप कढल्यानंतर नाकाला लावा ऑलिव्ह ऑईल : रात्री झोपताना चेह-यावर केलेला मेकअप काढल्यानंतर नाकावर ऑलिव ऑईल, मलाई अथवा दह्याने मालिश करावी. असे केल्याने नाकाचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल व ते अधिक आकर्षक दिसेल.

५. दुस-या व्यक्तीचा रूमाल वापरणे टाळा : नाक पुसण्यासाठी दुस-या व्यक्तीचा रूमान वापरणे अथवा सौंदर्य प्रसाधने वापरणे टाळा. दुस-यांच्या वस्तु वापरल्याने नाकाला इन्फेक्शन होऊ शकते.

६. उन्हापासून करा संरक्षण : उन्हामुळे चेह-यासोबत नाकाचे सौंदर्यदेखील काळे पडू शकते त्यामुळे बाहेर पडताना चेह-यासोबत नाकालादेखील सनस्क्रीन लोशन लावावे.

७. ब्लॅक हेड्स : धुळीमुळे नाकाच्या शेंड्यावर ब्लॅक हेड्स तयार होत असतात ते हाताच्या नखांनी काढण्याऐवजी ब्लॅक हेड रिमूव्हरचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *