नाकाची काळजी

१. आजकाल हवेतील प्रदूषणामुळे नाकांच्या विकारांमध्ये खूपच वाढ झालेली दिसून येते. नाकावाटे आपण श्वसन करतो आणि त्यातूनच आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी लागणारा प्राणवायू आपण शरीरात घेतो आणि शरीरात तयार होणारा कार्बन डाय ऑक्साइड वायू बाहेर टाकत असतो. त्यामुळे नाक किवा घ्राणेंद्रियाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

२. नाक चोंदल्यास कानात कापसाचे बोळे घालावेत. गरम पाण्याच्या पिशवीने कपाळ शेकावे. साजूक तुपाचे थेंब नाकात घातल्यानेही नाक मोकळे होते.

३. अतिउष्णतेमुळे वारंवार सर्दी होण्याचे प्रमाणही वाढते. तीव्रता अधिक असल्यास रुमालावर निलगिरी तेलाचे थेंब टाकून हुंगायला दिल्यास बरे वाटते. उष्णतेमुळे होणारी सर्दी असेल, तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढावावे.

४. या दिवसांत नाकामध्ये माळीण होण्याचे प्रमाण वाढते. माळीण म्हणजे नाकपुडीच्या आत येणारे फोड. यामुळे वेदना होतात, तसेच श्वसनालाही त्रास होतो. प्रामुख्याने हा उष्णतेचा विकार आहे. साजुक तुपाचा एखादा थेंब रात्री झोपताना नाकात सोडल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो. अतिउष्णतेमुळे गोळणा फुटणे म्हणजे नाकातून अचानक रक्त येण्याची समस्या उद्भवते.

५. मान खाली करून मस्तकावर आणि कपाळावर गार पाणी मारल्यास रक्त वाहणे थांबते. गादीवर डोके थोडे वरच्या बाजूला कलते करून दोन तीन मिनिटे झोपल्यासही रक्त वाहणे थांबते.

६. नाक स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करताना पाण्याने हलकासा हबका मारा.

७. नाकात कोणतीही वस्तू गेल्यास डॉक्टरांकडे जाऊन ती काढून घ्या.

८. नाकातून आलेले रक्त प्राथमिक उपचारांनी थांबत नसल्यास डॉक्टरांकडे तातडीने जा.

९. नाकामध्ये कोणतेही औषधी द्रव्ये परस्पर घालू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *