टक्कल वर घरगुती उपाय-(Home Remedies To Cure Baldness)

आपण सुंदर दिसण्या साठी काहि ना काही उपाय करत असतो. टक्कल पडणे ही एक नैसर्गिक समस्या आहे जसे म्हतारेपण याच्यावर आपण नियंत्रण ठेऊ शकत नाही, पण जर याची लक्षणे आपल्यात वेळेच्या आधीच दिसत असतील तर हि एक गंभीर समस्या आहे. जर आपले केस वेळेच्या आधीच गळायला लागले असतील तर हि एक गंभीर समस्या आहे. जर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील आणि आपल्याला शारीरिक कमजोरी जाणवत असेल तर हि म्हातार पणाची लक्षणे आहेत आणि जस जसे आपले वय वाढत जाते तसे आपले केस कमी व्हायला लागतात.

टक्कल वर घरगुती उपाय.

जर आपले केस वेळेच्या आधी गळायला लागले असतील तर हि एक गंभीर समस्या आहे. दुषित भोजन आणि प्रदूषण हे कारण देखील टक्कल पडण्यासाठी असू शकतात. आपल्या शरीरात पोष्टिक तत्वांच्या कमी मुळे केस गळायला लागतात. म्हणून आपल्याला टक्कल पडण्याच्या समस्येवरील उपचार जाणून घेणे आवश्यक आहे आणि याच्यावर घरगुती उपचार देखील आहेत.

टक्कल पडण्याच्या समस्येवर उपचार कठीण आहेत, कारण जे लोक या समस्यांचा सामना करत आहेत त्यांनी आपले केस पुन्हा उगवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. पण केस गळणे हि एक नैसर्गिक समस्या आहे जी आपल्या वाढत्या वयानुसार हि वाढत जाते. जर आपण देखील या समस्येवर उपचार केले असतील आणि तरी देखील काहीच फरक पडत नसेल  तर हि एक मोठी समस्या आहे. आपले केस मुळापासून निघाले असतील तर ते पुन्हा उगवणे कठीण आहे.

पण आयुर्वेदात प्राचीन शास्त्रात या समस्येवर खूप उपचार आहेत. ज्यांचा आपण वापर करून टकले पणा दूर करू शकतो. याच्यावर कोणते कोणते उपाय आहेत हे जाणून घेऊयात.

टक्कल वर घरगुती व आयुर्वेदिक उपाय.

आपल्या प्राचीन शास्त्रात अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार उपलब्ध आहेत, जर आपल्याला देखील केस गळण्याची समस्या दूर करायची असेल तर आयुर्वेदातील उपचार करू शकता आणि हे उपाय सोपे व सरळ असतात. तसेच हे उपचार खूप कमी खर्चिक असतात आणि हे उपचार आपण घरी बसून करू शकता व नैसर्गिक रूपाने आपण आपले केस परत उगवू शकता. त्याचप्रकारे याच्यात आपला वेळ देखील वाचेल आणि पैसा वाया जाणार नाही. ह्या उपचारामुळे आपले केस नैसर्गिकरित्या येतील आणि आपले केस काळे व घनदाट होतील.

मेथीचा उपयोग- मेथीचा वापर जास्त करून जेवणा मध्ये केला जातो याच्यात खूप सारे पौष्टीक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. दही देखील आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे. मेथी आणि दही एकत्र मिसळून याचा उपयोग करत असाल तर आपल्याला याचा फायदा होईल. यासाठी मेथी कमीत कमी १२ तासानसाठी पाण्यात भिजून ठेवा आणि नंतर मेथीला बारीक वाटून घ्या आणि हि वाटलेली मेथी दहित मिसळून एक पेस्ट तयार करा आणि हि पेस्ट आपल्या केसांच्या मुळावर लावा. एक तासा साठी तसेच ठेवा आणि नंतर केस धुऊन घ्या आपल्याला फायदा होईल. कारण मेथी आणि दही मध्ये निकोटीनिक एसिड आणि प्रोटीन चंगल्या मात्रेत असतात जो आपल्या केसांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांना पोषित करतो ज्यामुळे केसांची वाढ होते.

उडीत डाळ पण आपल्या टक्कल पडण्याच्या समस्येवर लाभदायक आहे. कारण डाळिंन मध्ये खूप प्रकारचे पोषक तत्व असतात. जे आपल्या केसांना आणि शरीराला निरोगी ठेवतात. उडीत डाळीचा उपयोग करण्यासाठी डाळीचे साल काढून उकडून घेऊन ती वाटून घेतली पाहिजे आणि रात्री झोपताना हा लेप आपल्या केसांना लावा आणि रात्रभर लाऊन ठेवा आणि फडक्याने झाकून ठेवा. असे आपण आठवड्यातून चार ते पाच वेळा करत असाल आपली केस गळण्याची समस्या दूर होते.

या समस्येवर (मुलेठी) जेष्ठमध एक रामबाण उपाय आहे. जेष्ठमध चा उपयोग करण्यासाठी जेष्ठमध वाटून घेऊन यात दुध आणि केसर मिसळून एक पेस्ट तयार करा आणि हि पेस्ट झोपायच्या आधी आपल्या डोक्यावर चांगल्या प्रकारे रात्रभर लाऊन ठेवा आणि फडक्याने झाकुन ठेवा. झाकुन ठेवल्यामुळे आपले इतर कपडे खराब होणार नाहीत. सकाळी उठल्यावर केस चांगल्या प्रकारे धूउन घ्या हा लेप आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावत असाल तर आपली टक्कल पडण्याची समस्या दूर होईल व केस गळणे हि थांबेल.

आवळा, ब्राम्ही तसेच भृंगराज या तिघांना आयुर्वेदात केसांसाठी सर्वश्रेष्ठ मानले जाते कारण हे आपल्या केसांचे गळणे थांबवतात आणि आपले केस उगवायला मदत करतात. आवळा, ब्राम्ही व भृंगराज हे केवळ केसांसाठी फायदेमंद नाही तर इतर आजारांवर देखील गुणकारी आहेत. केसांमध्ये लावण्यासाठी या तिघानाही एकत्र करून वाटून घ्या आणि हे मिश्रण एका लोखंडी कढई मध्ये फुगण्यासाठी रात्रभर ठेवा आणि सकाळी हे चुरगळून लेप बनवा आणि आपल्या केसांमध्ये १५ मिनीटान साठी लावा असे एका आठवड्यात दोन वेळा करा असे केल्याने केस गळती थांबेल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

One thought on “टक्कल वर घरगुती उपाय-(Home Remedies To Cure Baldness)

  • July 28, 2020 at 2:31 pm
    Permalink

    Majhe hairs hair dryer mule patal jhalee ahe Kahi upay ahe Ka tyna parat day karnysathi

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *