त्वचेची काळजी कशी घ्यावी

1) त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक योग्य आहार , पुरेशी झोप , भरपूर पाणी , सौम्य व्यायाम व शांत स्वभाव याची आवश्यकता असते . त्वचा मुलायम व सुंदर दिसण्याची जणू चार सूत्रे आहेत.

2) रोजच्या रोज क्लिन्झिंग , टोनिंग , मॉइश्चरायझिंग आणि कंडीशनिंग ची गरज असते .

3) त्वचेची निगा म्हणजे त्वचेची स्वच्छता दररोज करायला हवी . यामध्ये मेकअप काढणे , रोमछिद्रे स्वच्छ करणे , मृतपेशी काढून टाकणे हे करावे लागते . टोनिंग केल्याने त्वचेला नवीन चैतन्य प्राप्त होते . रक्तप्रवाह सुरळीत चालल्यामुळे त्वचा कांतिमान दिसते . मॉइश्चरायझर केल्याने त्वचेचा ओलसरपणा कायम ठेवला जातो . तर कंडीशनिंगमुळे त्वचेतील आम्लाचा समतोल राखला जाऊन इतर असमतोल दुरुस्त होण्यास मदत होते .

4) आपण बऱ्याचदा पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्याचा मसाज करून घेतो , परंतु रोज घरच्या घरी जर सकाळच्या वेळीस मॉइश्चरायझर व रात्रीच्या वेळेस कंडीशनर लावताना मसाज केल्यास त्वचेवरील छिद्रे निरोगी राहून उत्सर्जित ग्रंथीच्या कार्यात वाढ होते . यामुळे अपोआपच त्वचा स्वच्छ राहते . मसाज प्रत्येक छोटया पेशीला चैतन्य देते . रक्तप्रवाह व्यवस्थित होऊन स्नायू मुलायम होतात . त्वचा घट्ट , सतेज व मुलायम बनते .

5) मसाज करताना चेहऱ्याच्या खालच्या बाजूने सुरुवात करून वरच्या बाजूने बाहेरच्या दिशेने करावी . डोळ्याभोवती अतिशय नाजूक हाताने मसाज करावी .

Leave a Comment