अडुळसा | Adulsa Benefits In Marathi

• वर्षभर हिरवागार असणारा, दोन – तीन मीटर उंच वाढणारा अडुळसा कुंपण म्हणून लावता येतो.

• उष्ण, दमट हवामानात; तसेच समुद्रकाठच्या प्रदेशात या वनस्पतीची वाढ चांगली होते. व्यवस्थित पाणी दिले तर ही वनस्पती कोठेही वाढते.

• त.पावसाळ्याच्या सुरवातीला दीड वीत लांबीच्या जाड काड्या किंचित तिरक्या करून जमिनीत लावाव्यात किंवा अगोदर छोटी रोपे तयार करून मग साधारणपणे एक मीटर अंतरावर लावावी साधारणतः दोन ते तीन आठवड्यात काडी रुजते, पूर्ण वाढ व्हायला दीड – दोन वर्षे लागतात. रोपांची चांगली वाढ झाली, की त्यापासून भरपूर पिवळी पाने मिळतात.

उपयोग –

1) अडुळशाची पिकलेली पाने औषधात वापरली जातात.

2) पाने व फुलांत “व्हॅसिनीन’ नावाचे द्रव्य असते. हे द्रव्य सर्व प्रकारच्या खोकल्यावर, घशाच्या आजारांवर, दम्यावर उपयोगी असते.

3) खोकल्यासाठीच्या सिरपमध्ये अडुळसा असतोच.

4) कोरडा खोकला असल्यास अडुळशाच्या पानांचा चमचाभर रस मधासह घेतल्यास आराम मिळतो.

5) अडुळशाच्या पिकलेल्या पानांचा काढा कोणत्याही प्रकारच्या खोकल्यावर उपयोगी असतो.

Leave a Comment