बाळाच्या टाळूची काळजी कशी घ्यावी ?

१) टाळू लवकर भरून यावी म्हणून टाळूवर तेल ओतून बोटांनी ते तेल टाळूवर जिरवण्याची प्रथा आहे ती चुकीची आहे. तसे करण्याचे काहीच कारण नाही.

२) कारण मेंदुची वाढ पूर्ण झाल्यावर मग टाळूची हाडे आपोआपच जुळून येतात. साधारणपणे एक ते दीड वर्षात ती जुळून येतात. ती जुळून आली नाही, खोल गेली किंवा टाळूला सूज आली तर डॉक्टरांना त्वरित दाखवावे.

३) बाळ झोपत नसले, रडत असले तर त्याला काय झाले असावे ?

४) त्याला किडा मुंगी चावली असेल किंवा डास, ढेकूण चावले असावेत. बाळाने कपडे ओले केले असतील तरीही ते रडत किंवा पोट दुखण्यामुळेही रडू शकते. रडण्याचे कारण नीट शोधावे व उपाय करावेत.

Leave a Comment