बाळाला रोज तेल लावून आंघोळ घालावी का ?

१) बाळाला रोज आंघोळ घातली पाहिजे. आंघोळ घालताना बाळाच्या अंगाला तेल लावायला हरकत नाही पण नाकात, कणात, गुदद्वारात तेल सोडणे चुकीचे आहे.

२) आंघोळ घालताना खूप गरम पाणी वापरू नये. त्याला सहन होईल असे कोमट पाणी वापरावे. बाळाचे अंग पोट रगडू नये, हात, पाय हलक्या हाताने चोळावेत.

३) दूध, हळद डाळीचे पीठ एकत्र करून अंगास लावावे व नंतर पाण्याने किंवा साबणाने अंग स्वच्छ धुवावे. बाळाच्या त्वचेवर जी लव असते ती चोळून काढण्याचा प्रयत्न करू नये. आंघोळ झाल्यावर मऊ स्वच्छ फडक्याने बाळाचे अंग टिपावे. जोराने पुसू नये.

४) आंघोळीनंतर बाळाला काजळ घालण्याचे काहीच कारण नाही. काजळाने डोळे मोठे होतात, डोळे स्वच्छ राहतात हे सारे चुकीचे आहे.

५) उलट काजळ घातल्याने काजळाने किंवा अस्वच्छ बोटांमुळे जंतूदोष निर्माण होऊ शकतो. काजळ लावल्यामुळे दृष्ट लागत नाही, अशाही भोळ्या समजुतीने काजळ लावले जाते तेही चुकीचे आहे.

Leave a Comment