त्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

1) नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे . चनाडाळीचे रोजचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे .

2) दुध पावडर १ टेबल स्पून , मध २ टेबल स्पून , १ चिमुटभर हळद पावडर आणि अर्धे लिंबू एकत्र करून चेहरा , मान , उरल्यास हाताला चोळून लावावी . वाळल्यानंतर धुऊन टाकावी .

3) कोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी . त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे . हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे .

4) ओली हळद व मोहरी वाटून दररोज Black हेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावे . हळू-हळू Black हेडस कमी होतात

5) ओटचे पीठ , चंदनाचे चूर्ण , १ टेबल स्पून ओट व १/४ टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावे . थोडया वेळाने धुऊन टाकावे . कच्च्या बटाट्याचे पातळ चकत्यांसारखे कापून चेहऱ्यावर पसरून बारा-पंधरा मिनिटे शांत पडावे . नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा . चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो . ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी ही कृती उपयोगी आहे .

6) १ टेबल स्पून ग्लिसरीनमध्ये हर्बल तेल किंवा आवळा तेल ५ ते १० थेंब टाकून चेहऱ्यावर लावावे . मुलायम मऊ त्वचा होण्यासाठी असे नियमित करावे . तोंड धुतल्यावर गुलाब पाणी चेहऱ्याला लावावे . त्वचा मृदू होते . ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी ही कृती लाभदायक आहे .
• १ लिंबू , १ अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे . साधारण वीस मिनिटांनी धुवावे .
• त्वचा मृदू , मुलायम , स्निग्ध व सतेज राहण्यासाठी दह्याने मसाज करावा .

7) त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त ठरते . त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्चरायझर टिकवणे असे म्हणतात . घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्चरायझर करून त्वचेला चमक आणता येते .

8) बाजारात जोजोबा नावाचे तेल मिळते , त्याचे चार-पाच थेंब , तेवढेच खोबऱ्याचे तेल व गुलाबपाणी एकत्र करावे . चेहरा धुतल्यावर वरील मिश्रण चेहऱ्यावर लावावे . त्वचेला आर्द्रता तर मिळतेच , शिवाय एक मोहक , दीर्घकाळ रेंगाळणारा सुगंध मिळतो .

Leave a Comment