गळ्याचा काळेपणा कसा दूर करावा

1) लिंबू आणि गुलाबजलचा एक चमचा घ्या आणि मिक्स करा. मग या मिश्रणाला कापसाच्या मदतीने आपल्या काळ्या गळ्याला आणि मानेला लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. ही पद्धत सगळ्या प्रकारच्या त्वचा प्रकारावर फायदा देते.

2) ताजा लिंबू आणि शुध्द मध एकत्र करून गळ्याला आणि मानेला लावा. 20-25 मिनिट तसेच राहू दया आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. या पद्धतीचा वापर केल्याने तुमची मान आणि गळा स्वच्छ होईल.

3) 1 लिंबू पिळून त्यामध्ये चिमुटभर हळद मिक्स करा. मग त्याला गळ्याला आणि मानेला लावा. 20 मिनिट झाल्या नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. ही पद्धत नियमित वापरल्याने गळा साफ होईल.

4) टमाटरच्या रसामध्ये काही थेंब लिंबूरस मिक्स करा आणि गळ्याला लावा. जेव्हा हे सुकेल तेव्हा ते स्वच्छ करा. ही पद्धत तुम्ही दिवसातून 2 वेळा करू शकता.

Leave a Comment