मकरासन

1) या आसनात पोटावर ताण पडत असल्याने आणि शेवटी आकार मगरी प्रमाणे होत असल्याने यालामकरासन असे नाव देण्यात आले आहे.

2) असे करावे आसन: सर्वात आधी पोटावर झोपावे. नंतर दोनही हात कमरे जवळ आणावेत आणि दोनही पाय जोडावेत. आता नंतर दोनही हातांना वर उचलत त्यांचा आकार कात्रीप्रमाणे करावा. हात वर करताना पायात मात्र अंतर ठेवावे.

3) हे आसन करताना काळजी घ्या: – दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवताना पाय जमिनीला स्पर्श करत असावेत ही काळजी घ्या. हाताचा आकार कात्री सारखा करताना डोक्याला हातांमध्ये ठेवावे आणि श्वास आताबाहेर सोडावा.

4) आसनाचे फायदे: या आसनांत पोटावर अधिक जोर पडणार असल्याने पोटाचा व्यायाम तर होतोच, परंतु याच सोबत रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. या आसनांत फुफ्फुसाच्याही व्यायाम होत असल्याने दमा असलेल्या रुग्णांना यात चांगला फायदा होतो.

Leave a Comment