बाळाचे वात्सल्याने संगोपन करा

१) सकस आहार बाळाला मिळाला की, त्याची सर्वांगीण वाढ होते, असे नाही. बाळाला प्रेम, वात्सल्यही हवे असते. आईवडिलांचे प्रेम त्याला मिळणे आवश्यक असते.

२) आपण एका कोवळ्या जिवाला वाढवितो आहोत. या दृष्टीने हळुवार मानाने, हिडीसफिडीस ण करता, ण कुरबुरता, प्रेमाने त्या जिवाची काळजी घ्यायला हवी.

३) दाया, नर्सेस यांच्यापेक्षा आईची माया त्याला मिळायला हवी. वयाची दोन ते पाच वर्षांचा काळ बाळाच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत नाजूक असा असतो आणि या वयोगटाच्या मुलांचे संगोपन जर नीट काळजीपूर्वक झाले नाही तर पुढे पालकांच्या दृष्टीने त्यांचे संगोपन करणे कठीण होते.

४) आपल्या बाळाने भविष्यात मोठे व्हावे खूप शिकावे, सुशील असावे, जगातील अनेक बऱ्यावाईट गोष्टींना तोंड देण्यासाठी संकटांना पेलण्यासाठी त्याने धैर्यवान व्हावे, त्याचबरोबर त्याने प्रेमळही असायला हवे आणि दणकट धडधाकट प्रकृतीचे राहायला हवे, अशी प्रत्यक माता- पित्याची इच्छा असते.

५) पण त्यासाठी पालकांनी विशेषतः आईने ते जगात येण्यापूर्वीपासूनच ते त्याच्या वाढीच्या वयापर्यंत त्याची अतिशय काळजी घ्यायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *